भारतात 5G सुरू करण्याच्या प्रक्रियेत सरकार स्थानिक कंपन्या आणि स्टार्ट-अपना प्रोत्साहन देऊ इच्छित आहे: दळणवळण विभागाचे सचिव के राजाराम
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव समारोपाचे भाषण करणार
"5G ऑपरेशन्स आणि दूरसंचार सुधारणांमध्ये गुंतवणुकीच्या संधी" या विषयावरील दूरसंचार गुंतवणूकदारांची गोलमेज परिषद आज सकाळी मुंबईत सुरू झाली. परिषदेचे उद्घाटन डिजिटल कम्युनिकेशन्स आयोगाचे अध्यक्ष आणि दूरसंचार विभागाचे (DoT) सचिव के राजारामन यांनी केले.
केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव दिवसअखेर बँकिंग प्रमुख आणि उद्योगातील सहभागींसोबत चर्चेच्या एका फेरीत सहभागी होतील. त्यानंतर ते समारोपाचे भाषण करणार आहेत.
5G तंत्रज्ञान विकसित करणे हा सरकारने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, असे उद्घाटन सत्रात बोलताना के राजारामन यांनी सांगितले. परिषदेचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला. दूरसंचार क्षेत्रात अधिक गुंतवणूक आणण्यासाठी आणि नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आपण एकत्र कसे काम करू शकतो हे पाहण्याचा विचार आहे, असे ते म्हणाले. अलीकडील अनेक सुधारणांमुळे दूरसंचार क्षेत्रातील उच्च खर्च कमी झाला आहे. सरकार भारतात 5G सुरू करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक कंपन्या आणि स्टार्ट-अपना प्रोत्साहन देऊ इच्छित आहे, असे ते म्हणाले. 5G साठी आवश्यक तंत्रज्ञानाचा साठा देशात तयार होईल याची ग्वाही देण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. “स्थानिक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविध घटकांची चाचणी घेण्यासाठी जोरदारपणे पुढे येऊन प्रयोग करावेत जेणेकरून आपण स्थानिक चॅम्पियन तयार करू शकू असे त्यांनी सांगितले. या संदर्भात, त्यांनी भारत @2047 च्या व्हिजनच्या अनुषंगाने देशात तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करण्याचे आवाहन केले. दूरसंचार क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीने सरकारने काय करण्याची गरज आहे याबद्दल त्यांनी संबंधितांना त्यांचे विचार मांडण्याचे आवाहन केले. 3GP मानकांच्या अनुषंगाने कमी मोबिलिटी लार्ज सेल तंत्रज्ञानामध्ये योगदान देण्यामध्ये संशोधन समुदायाने उत्कृष्ट कार्य केले आहे. आम्ही या तंत्रज्ञानावर काम करणार्या विविध स्टार्टअपना देखील समर्थन देत आहोत. त्यांनी स्टार्टअप्स आणि प्रारंभिक टप्प्यातील कंपन्यांना दूरसंचार उद्योगातील या रोमांचक टप्प्यात सामील होण्याचे आवाहन केले.
“उद्योगातून अधिक गुंतवणूक आणण्यासाठी युनिव्हर्सल सर्विस ऑब्लिगेशन फंड (USOF )कडचा संशोधन आणि विकास निधी सीड फंड म्हणून काम करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) ने एक सहयोगी प्लॅटफॉर्म तयार केला आहे जिथे उद्योग गुंतवणुकीचा फायदा तंत्रज्ञान स्टॅक तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो ज्याचा उपयोग उद्योगांना बाजारापर्यंत पोहोचण्यासाठी करता येईल”, असे ते म्हणाले.
दूरसंचार विभाग सचिवांनी सर्व दूरसंचार उद्योग भागधारकांना देशी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूकदारांना त्यांची विक्री करण्यासाठी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. इंडियन मोबाईल काँग्रेसमध्येही 6G वर तांत्रिक सत्र होणार आहे, असेही ते म्हणाले.
दूरसंचार विभागाचे आंतरराष्ट्रीय समन्वय उपमहासंचालक आर.के. पाठक यांनी ‘सध्याची स्थिती आणि 5G साठी भविष्यातील रोडमॅप’ या विषयावर सादरीकरण केले. नागरिकांना 100 मेगा बाइटस प्रतिसेकंद मिळवण्यास 5G सक्षम करेल, यावर सादरीकरणात भर होता.
भारतात 5G रोल-आउटबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे:
i) भारतावर 5G चा एकत्रित आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो; विविध क्षेत्रांमध्ये माहिती- तंत्रज्ञानाचा वेगवान विस्तार करून भारतामध्ये एक मोठे सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकते.
ii) सरकारने आत्मनिर्भर भारत 5G न्यू रेडिओ (NR) स्टँड अलोन एंड-टू-एंड नेटवर्कची कल्पना केली आहे.
iii) 5G अतिउच्च कनेक्टिव्हिटी, डायनॅमिक कंटेंट आणि संगणकाला जोडण्याचे वचन देते, वैयक्तिक बुद्धिमत्तेला चालना देणार्या ॲप्लिकेशन्सचे क्षेत्र उघडून गोष्टींच्या अमर्यादित सहकार्यासाठी सुविधा देते.
दूरसंचार विभागाचे अतिरिक्त सचिव व्ही एल कांथा राव यांनी स्वागतपर भाषण केले. दूरसंचार क्षेत्रातील विशेषत: 5 जी क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधींबद्दल परिषदेत चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या योग्य परिश्रमानंतर ज्यांच्याकडे कल्पना आहेत आणि जे गुंतवणूक शोधत आहेत अशा उद्योगातील कंपन्यांना त्यांच्याशी जोडण्यासाठी दूरसंचार विभाग काम करेल. त्यामुळे या कंपन्या तंत्रज्ञान तयारीच्या टप्प्यातून गेल्या आहेत हे समजेल असे राव यांनी सांगितले. अनेक निवडक स्टार्ट-अप्स आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी त्यांच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक केले.
No comments:
Post a Comment