Friday, 23 September 2022

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई भारतातील पहिले रुग्णालय आहे ज्याला महामारीनंतर प्रतिष्ठित स्मार्ट आयसीयू सर्टिफिकेशन मिळाले आहे.


आयसीयूमध्ये सर्वोत्तम आरोग्यसेवा प्रथांची अंमलबजावणी करण्याचासहा महिन्यांचातीन टप्प्यांचा दृष्टिकोन यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. ~

स्मार्ट आयसीयू सर्टिफिकेशन मिळवणारे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल हे नवी मुंबईतील पहिले रुग्णालय आहे. ~

23 सप्टेंबर 2022नवी मुंबई: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबई हे 3M India (थ्रीएम इंडिया) कडून महामारीनंतर स्मार्ट आयसीयू सर्टिफिकेशन देण्यात आलेले पहिले रुग्णालय ठरले आहे. हे सर्टिफिकेशन मिळवणारे हे नवी मुंबईतील पहिलेच रुग्णालय आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईतील क्रिटिकल केयरचे डायरेक्टर डॉ. भरत जिगयासी यांच्या नेतृत्वाखाली ३० पेक्षा जास्त हेल्थकेयर कर्मचाऱ्यांनी मिळून यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सहा महिने चाललेल्या प्रकल्पानंतर हे सर्टिफिकेशन देण्यात आले आहे. या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांकडून आयसीयूमध्ये अंमलात आणल्या जाणाऱ्या सर्वोत्तम प्रथांना प्रोत्साहन देऊन आणि ज्ञानमाहितीमध्ये सुधारणा घडवून आणून आरोग्यसेवेतून मिळणाऱ्या परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणण्यावर या प्रकल्पाचा भर होता.

रुग्णांची सुरक्षितता व काळजी या संदर्भात मिळणारे लाभ हा या प्रकल्पाचा एक मोठा परिणाम असून सर्टिफिकेशनमध्ये त्याची दखल घेतली जाते. केडीएएचनवी मुंबईसारख्या स्मार्ट आयसीयूमध्ये ज्यांचे पालन केले जाते त्या गुणवत्ता निर्देशांकांमुळे आयसीयू रुग्णांमध्ये ज्यामुळे सेकंडरी संसर्ग टाळता येतो अशा अनुपालनांचे कठोर पालन केले जाते. जेव्हा रुग्ण क्रिटिकल केयरमध्ये असतो तेव्हा त्याची रोगप्रतिकार क्षमता आधीच कमी झालेली असते त्यामुळे इतर संसर्ग होण्याची शक्यता वाढलेली असते.  रुग्णांच्या बाबतीत अशा समस्या उत्पन्न होण्यापासून बचाव करण्यासाठी स्मार्ट आयसीयूमध्ये सुरक्षा  उपायांना पुनःपरिभाषित केले जाते. या उपायांची अंमलबजावणी केली जात असल्याने रुग्णांची तब्येत जलद गतीने बरी होते व रुग्णालयात जास्त दिवस राहावे लागणे टाळले जाते. रुग्णांची सुरक्षितता व काळजी या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ घडवून आणल्याने रुग्णांना अतिरिक्त खर्च करावा लागण्याच्या घटना कमी झाल्या आहेत.

स्मार्ट आयसीयू असणे महत्त्वाचे असल्याच्या मुद्द्यावर भर देत केडीएएचनवी मुंबईचे क्रिटिकल केयरचे डायरेक्टर डॉ. भरत जिगयासी म्हणाले"याठिकाणी केडीएएच नवी मुंबईमधील आमची टीम आणि या प्रकल्पादरम्यान त्यांनी अतिशय निष्ठेने व धैर्याने केलेले काम याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. कोविड-१९ सुरु झाल्यापासून क्रिटिकल केयर आणि संसर्गापासून बचाव व त्यावरील नियंत्रण यांचे महत्त्व अधिक जास्त प्रकाशझोतात आले आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात इंटरनॅशनल इन्फेक्शन प्रिव्हेन्शन वीक पाळला जातोयासारख्या प्रकल्पांमधून मानक मार्गदर्शक सूचनांच्या आधारे बारकाईने लक्ष ठेवण्याची आणि प्रशिक्षणामार्फत सुधारणेची प्रक्रिया सुरु राहील. जागतिक निकषांच्या आधारे कौशल्य वृद्धी व आमच्या गुणवत्ता व्यवस्थांमध्ये सुधारणा घडवून आणणे आम्ही सुरु ठेवू."

या संपूर्ण प्रक्रियेचे नेतृत्व डॉ पूनम गिरीप्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आणि मॉडरेटरडॉ. अमृता एसचीफ नर्सिंग ऑफिसर आणि श्रीमती रेखा पाटीलनर्स एज्युकेटर यांच्या कोर टीमने केले.  सर्टिफिकेशनसाठीची मापदंड मार्गदर्शक तत्त्वे जागतिक आरोग्य संघटनासोसायटी फॉर हेल्थकेअर एपिडेमियोलॉजी ऑफ अमेरिका आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर क्लिनिकल एक्सलन्स यांसारख्या आरोग्य सेवा संस्थांनी आखून दिलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने हे सुनिश्चित होते की आयसीयू रुग्णांना उत्कृष्ट दर्जाची क्रिटिकल केयर आणि सेवा प्रदान करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. 

No comments:

Post a Comment