Monday 26 September 2022

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते 'बीवायपी, व्हीआयपी आणि मी' पुस्तकाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन!


दिलीप प्रभावळकर यांनी घेतली अनोख्या शैलीत लेखक विजय पाध्येंची मुलाखत!

सोहळ्यास जयश्री खाडीलकरअशोक समेळअजित भुरेभरत दाभोळकर यांचीही विशेष उपस्थिती!

मागील ६३ वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे सर्वेसर्वा विजय पाध्ये उर्फ बाबा यांनी लिहिलेल्या 'बीवायपीव्हीआयपी आणि मीया पुस्तकाचे प्रकाशन एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये जाहिरातअभिनय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत 'बीवायपीव्हीआयपी आणि मी'चे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत जयश्री खाडीलकर पांडेअशोक समेळअजित भुरेभरत दाभोळकर आणि विवेक मेहेत्रेही मंचावर हजर होते. त्यासोबतच प्रेक्षागृहात विजय पाध्ये यांचे बंधू श्रीराम दिलीप प्रसिद्ध अभिनेते संजय मोनेअतुल परचुरेप्रसाद कांबळीउदय धुरतदिलीप जाधवविजय गोखलेअनुराधा राजाध्यक्षसुधीर जोगळेकरअनिल हर्डीकरयोगिता प्रभूचंद्रकांत राऊतअक्षर शेडगेमनसेचे नितीन सरदेसाईजयेंद्र साळगांवकररामदास पाध्येसत्यजीत पाध्ये अश्या अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. उद्वेली प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

'बीवायपीव्हीआयपी आणि मी'चा प्रकाशन सोहळा हा जाहिरात क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या विजय पाध्ये नामक यशस्वी उद्योजकाचा जणू कौतुक सोहळाच ठरला. उपस्थित सर्वच मान्यवरांनी विजय पाध्ये यांच्यावर स्तुतीसुमने उधळत 'बीवायपीव्हीआयपी आणि मीया पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. दिलीप प्रभावळकर यांनी मुलाखत घेत विजय पाध्ये यांचे अंतरंग उलगडण्याचा केलेला प्रयत्न उपस्थितांची दाद मिळवणारा ठरला. यावेळी प्रभावळकर म्हणाले कीजाहिरात क्षेत्रात यशाच्या शिखरावर विराजमान होऊनही माणुसकीचा धर्म न विसरलेल्या विजय पाध्ये यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे. माझा खूप जुना मित्र असलेल्या विजयचे 'बीवायपीव्हीआयपी आणि मीहे पुस्तक यशस्वी जीवनाचा मंत्र सांगणारे आहे. मितभाषी असलेला विजय हा खरा जगमित्र आणि अजातशत्रू आहे. 'बीवायपीव्हीआयपी आणि मीया पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी खास पुण्याहून इथे आलो. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केलेले विजयचे अनेक मित्र आहेत. या पुस्तकात त्या सर्वांचे किस्से आहेत. विजयचा जनसंपर्क अफाट असूनत्यातूनच त्याने या पुस्तकाचे लिखाण केले आहे. जाहिरात क्षेत्रातील व्यवसाय कशाप्रकारे सचोटीने करायला हवा हे विजय पाध्ये यांनी मराठी माणसाला दाखवून दिले आहे. त्याच जोडीला विविध क्षेत्रांतील माणसे कशी जोडायची हेदेखील विजयने दाखवून दिल्याचे प्रभावळकर म्हणाले.

या सोहळ्यात प्रभावळकरांनी घेतलेल्या मुलाखतीत विजय पाध्ये म्हणाले कीमृदू स्वभाव ही दादांची शिकवण तर आहेचपण आपला स्वभावच मृदू आहे. माणसे जोडण्यासाठी समोरच्याचे ऐकायला हवेवाद घालून प्रश्न सुटत नाहीत. व्यवसायात कित्येकदा तडजोडही करावी लागली. नेहमी समोरच्या व्यक्तीचा विचार करत असल्याने तडजोडीचा कधीच त्रास झाला नाही. समोरच्याचा इगो जपलातर तो आपल्या प्रेमात पडतो. तांबे आरोग्य भुवनच्या बापू तांबेंनी व्यवसायात संयम शिकवला. दादांकडून खरे बोलायलामावशीकडून व्यवहार सांभाळायलामनोहर जोशींकडून वेळ पाळायला आणि विद्यालंकार क्लासेसच्या देशपांडे यांच्याकडून फायलींगसोबतच वेळेचे नियोजन करायला शिकलो. नंदी ब्रँड अगरबत्तीने जेव्हा बीवायपीला एक नवी ओळख मिळवून दिलीतेव्हा अमिन सयानींसारख्या दिग्गजांनीही कौतुक केले होते. या सर्व गोष्टीं सांगताना जाहिरातींमधील काही गिमिक्सही विजय पाध्ये यांनी उघड केली. जीवलग मित्र अभिनेते विनय आपटे यांच्यावर संकट कोसळल्यावर आपल्या संतापाचा विस्फोटही झाल्याचा किस्साही विजय पाध्ये यांनी सांगितला. राहून गेलेल्या गोष्टींमध्ये स्विमिंग कधीच केले नसून कधीच भपकेदार कपडे घातले नसल्याचे सांगितले.

विजय यांनी २६ जानेवारी २०१८ रोजी या पुस्तकाचे लेखन सुरू केले. ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर पांडे म्हणाल्या कीपाध्ये यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एक ग्रंथच आहे. त्यांना मिळालेले यश हे त्यांचे वडील दादांनी त्यांच्यावर केलेल्या संस्काराचे यश असल्याचेही खाडीलकर म्हणाल्या. अशोक समोळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले कीविजय यांनी लिहिलेले पुस्तक जगण्याचा फॅार्म्युला सांगणारे आहे. यासोबतच हे पुस्तक माणुसकीचा धर्म जपणाऱ्या व्यक्तींच्या ऐश्वर्याचे दर्शन घडवणारे असल्याचे अशोक समेळ म्हणाले. अॅडमॅन भरत दाभोळकर यांनी शाब्दिक फटकेबाजी करत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. ते म्हणाले कीबी. वाय. पाध्ये ही एकत्र कुटुंबावर चालणारी संस्था आहे. या कुटुंबाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. हे केवळ पुस्तक नसून एक एनसायक्लोपीडिया किंवा डिक्शनरी असल्याचे मतही दाभोळकर यांनी व्यक्त केले. अजित भुरे यांनी दिवंगत अभिनेते विनय आपटेंच्या आठवणीना उजाळा देताच सभागृहातील वातावरण काहीसे भावूक झाले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले. आभार प्रदर्शनाचे काम बागेश्री पाध्ये पंडित यांनी केले. रुपये ६५० मूल्य असलेले 'बीवायपीव्हीआयपी आणि मीप्रत्येक मराठी माणसाने एकदा वाचायलाच हवे.

No comments:

Post a Comment