Wednesday, 15 March 2023

'चैत्र चाहूल' २०२३ चे सन्मान जाहीर! ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज शेख यांना 'रंगकर्मी सन्मान' तर 'चतुरंग'चे विद्याधर निमकर यांना 'ध्याससन्मान'!

'चैत्रचाहूल'चं हे सोळावं वर्ष. अॅड फिझ सादर करत असलेली 'चैत्रचाहूलया वर्षी विवेक व्यासपीठाच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. मराठी नववर्षाच्या शुभेच्छा मराठी संस्कृतीचा जागर करून द्याव्यात असं ठरवून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मराठीपणमराठी बाणा जपत मराठीची महती सांगणंत्यासाठी मराठी जनांना एकत्र आणणं आणि शुभेच्छांसह एकत्र आनंद साजरा करणं यासाठी ही "चैत्रचाहूल"!मराठी साहित्य-संगीत आदीचा आगळा मनोरंजक आविष्कार सादर करताना आम्ही सामाजिक भानही जाणीवपूर्वक राखले आहे. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात निरलस योगदान देऊन आपलं जीवन समृद्ध करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणंआम्हाला महत्त्वाचं वाटतं. एक ध्यास घेऊन आपलं जगणं समाजाला समर्पित करणाऱ्या व्यक्तींसाठी 'ध्याससन्मानआणि आपल्या कलेद्वारे भरीव योगदान देणाऱ्या कलावंतांना 'रंगकर्मी सन्मानदेऊन त्यांचा यथाशक्ती सन्मान   करणं हे चैत्रचाहूलचं वैशिष्ट्य आहे.

गेल्या पंधरा वर्षांत अरुण होर्णेकरसंजना कपूरगणपत म्हसगेचंद्रकांत काळेमाधुरी पुरंदरेअरुण काकडेकांचन सोनटक्केअविनाश गोडबोलेओमप्रकाश चव्हाणसुधीर नांदगावकर यांना 'ध्याससन्मानआणि मुक्ता बर्वेप्रदीप मुळेप्रसाद ओकविजय केंकरेविजयकुमार नाईकचंद्रकांत कुलकर्णीदत्ता पाटीलअजित भगतविश्वास सोहनी यांना 'रंगकर्मी सन्मानप्रदान करण्यात आले आहेत. तसेच सुलभाताई देशपांडेगुरू पार्वतीकुमारराजा मयेकरप्रा.मधुकर तोरडमलप्रा.शंकर वैद्यसुलोचना चव्हाण यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रताप करगोपीकरप्रा. वामन केंद्रेअभिराम भडकमकरप्रकाश खांडगेसुनील शानभागसंध्या पुरेचा या मान्यवरांचा यथोचित गौरव 'चैत्रचाहूल'च्या व्यासपीठावर करण्यात आला. या वर्षी 'ध्याससन्मानविद्याधर निमकर यांना तर 'रंगकर्मी सन्मानफैय्याज शेख यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक महेंद्र पवार यांनी दिली आहे.

 "चैत्रचाहूल" हा मराठी नववर्षाच्या स्वागताचा आनंदसोहळा बुधवार दिनांक २२ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. श्री. शिवाजी नाट्य मंदीरदादर येथे रसिकांच्या साक्षीने करण्यात येणार्‍या या दोन सन्मानांमुळे अधिकच आनंददायी होणार आहे.

No comments:

Post a Comment