Thursday 16 March 2023

स्व. सुषमा स्वराज पुरस्कार 'नूतन गुळगुळे फाऊंडेशन्स'च्या सौ. नूतन विनायक गुळगुळे यांना प्रधान!

सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिनींना स्व. सुषमा स्वराज यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दिव्यांगांच्या सेवेत स्वतःला झोकून देत राष्ट्रीय पातळीवर अविरत कार्यरत असलेल्या सौ. नूतन विनायक गुळगुळे यांचा त्यांच्या या भरीव कार्यानिमित्त नुकताच स्व. सुषमा स्वराज पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाने भाजपा महिला मोर्चा वसई-विरार शहर जिल्हा यांच्यावतीने नुकताच नालासोपारा येथे वसई विरार शहर जिल्हा अध्यक्षा सौ प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

स्व. सुषमा स्वराज पुरस्कार स्वीकारताना सौ. नूतन विनायक गुळगुळे म्हणाल्या, "अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्याभारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री आणि उत्कृष्ट संसदपटू स्व. सुषमा स्वराज यांच्या नावे मिळालेला पुरस्कार मला प्रेरणादाई असून, सुषमाजींनी अंगीकारलेली मूल्ये आणि आदर्श यांची जाणीव करून देत राहीलआणि स्वानुभवातून सुरु झालेले माझे दिव्यांग सेवेचे व्रत कितीही अडथळे आले तरी अखंड सुरु ठेवण्यासाठी प्राणवायू ठरेल'नूतन गुळगुळे फाऊंडेशन'चे स्वानंद सेवा सदन’ हे कोरोनामुळे पालक गमावलेल्या दिव्यांग’ बालकांकरिता आणि त्यांच्या एकल पालकांसाठीचे भारतातील पहिले वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र पालघर जिल्ह्यातल्या निसर्गरम्य अर्नाळा गावात उभारण्याचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सौ रीदाताई रशीद - प्रदेश उपाध्यक्षा महिला मोर्चा-प्रभारी वसई विरार जिल्हाश्री राजन नाईक जिल्हा अध्यक्ष वसई विरार शहरश्री महेंद्र पाटील – जिल्हा संगठन सरचिटणीसश्री जोगेंद्र प्रसाद चौबे – जिल्हा सरचिटणीस-प्रभारी जिल्हा महिला मोर्चामाजी सरपंच श्रीमती हेमलता बाळशी असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment