Thursday 9 March 2023

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईने १,००,००० नवी मुंबईकरांना जीवनरक्षक प्रथमोपचारांचे (सीपीआर) प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु केला

द रिव्हाइव्ह लाईफ कॅम्पेन उपक्रमामध्ये भाग घेणाऱ्यांना सीपीआर देण्याची योग्य पद्धत तसेच अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास प्राण कसे वाचवावेत हे शिकवले जाईल. ~ 

नवी मुंबई 9 मार्च 2023: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईने नवी मुंबईकरांसाठी सीपीआर प्रशिक्षण उपक्रम सुरु केल्याची घोषणा केली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण शहरातील १,००,००० लोकांना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीची हृदयक्रिया अचानक बंद पडल्यास सीपीआर देण्याचे प्रशिक्षण यामध्ये देण्यात येणार आहे. सुरुवातीला १ मार्च ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत सीपीआर प्रशिक्षण अभियान चालवले जाईल. कॉर्पोरेट ऑफिसेससार्वजनिक जागा आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये देखील प्रशिक्षणाचे आयोजन केले जाईल.

द रिव्हाइव्ह लाईफ कॅम्पेन हे या उपक्रमाचे नाव सदैव सज्ज राहण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्याप्रती व सामाजिक जबाबदारीचे भान राखण्याप्रती हॉस्पिटलची वचनबद्धता दर्शवते. या उपक्रमामध्ये कॉर्पोरेट कर्मचारीविविध गृहसंकुलांमधील रहिवासीऑटो-रिक्षा चालकपोलीसअग्निशामक दलाचे कर्मचारीनवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारीनवी मुंबई परिवहन विभागाचे कर्मचारीमहाविद्यालयीन विद्यार्थीमॉल्सरेल्वे स्थानकेसार्वजनिक उद्यानांमधील लोक अशा विविध गटांना सहभागी करून घेतले जाईल.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईचे संचालक व प्रमुख डॉ बिपीन चेवले यांनी सांगितले"अचानक हृदयक्रिया बंद पडल्याच्या अनेक घटना हल्ली कानावर येतात. हृदय विकारांमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ५०% मृत्यू हे हृदयक्रिया अचानक बंद पडल्याने होतात. अशावेळी इमर्जन्सी सीपीआर किंवा कार्डिओपल्मनरी रिसससिटेशनमुळे व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतात. आम्ही असे मानतो की सीपीआर हे अत्यावश्यक जीवन कौशल्य आहे आणि ते प्रत्येकाला आत्मसात असलेच पाहिजे. आणीबाणीच्या प्रसंगी मृत्यू होणे टाळण्याची क्षमता या कौशल्यामध्ये आहे. द रिव्हाइव्ह लाईफ कॅम्पेन उपक्रमामुळे नवी मुंबईकरांना आम्ही अशी कौशल्ये प्रदान करू शकू जी आणीबाणीच्या प्रसंगी जीव वाचवण्यासाठी आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक असतात."

उपक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे यासाठी हॉस्पिटलने एक टास्क फोर्स तयार केली आहे. सीपीआर प्रशिक्षणातील तज्ञांचा समावेश असलेल्या पाच टीम्स यामध्ये आहेत. इन-हाऊस प्रशिक्षण शिबिरे घेण्यासाठी एक टीम हॉस्पिटलमध्ये तैनात करण्यात येईल. इतर चार टीम्स विविध ठिकाणी जाऊन वयस्कांना सीपीआर देण्याचे प्रशिक्षण देतील तसेच नवजात बाळे व मुलांना सीपीआर देण्याबाबत व्याख्याने देतील.

प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या नोंदणीसाठी हॉस्पिटलने एक रजिस्ट्रेशन कमिटी देखील तयार केली आहे.  व्यक्तिशः येऊन किंवा ईमेलदूरध्वनीवरून किंवा ऑनलाईन देखील नोंदणी करता येईल. सर्व प्रशिक्षणार्थींना नीट प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षकमॅनीकिन्स आणि सत्रांची संख्या पुरेशी राहील याची काळजी देखील ही कमिटी घेईल.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबई येथील कन्सल्टन्टइमर्जन्सी मेडिसिन डॉ सुरज कुमार अग्रवाल यांनी सांगितले"सीपीआर प्रशिक्षण हे अतिशय महत्त्वाचे कौशल्य आहे ज्यामुळे आणीबाणीच्या काळात जीव वाचवले जाण्यात मदत मिळू शकते. हे अत्यावश्यक कौशल्य शिकून घेणे सोपे आहे. जास्तीत जास्त लोकांनी हे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.  याची गरज कधीकुठेकोणाला भासेल हे सांगता येणार नाही.  आणीबाणीच्या काळात सर्वात महत्त्वाची असते ती वेळसंकटात सापडलेल्या व्यक्तीला उपचार जितक्या लवकर मिळतील तितकी त्या व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता जास्त असते.  जेव्हा एखादी व्यक्ती बेशुद्ध पडतेश्वास घेता येत नाहीनाडीचे ठोके लागत नाहीत अशावेळी सीपीआर किंवा कार्डिओपल्मनरी रिसससिटेशन करून कायमस्वरूपी नुकसान होणे टाळता येऊ शकते."

द रिव्हाइव्ह लाईफ कॅम्पेनअंतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण निःशुल्क आहे. प्रशिक्षणार्थींनी आधी नोंदणी करून आपली जागा राखून ठेवावी असे आवाहन केले जात आहे. हॉस्पिटलला आशा वाटते कीया उपक्रमामुळे सदैव सुसज्ज राहण्याची संस्कृतीसामाजिक जबाबदारीचे भान निर्माण होईल व अनेक जीव वाचवले जाऊ शकतील.

अधिक माहितीसाठी व सीपीआर प्रशिक्षण उपक्रमात सहभागासाठी नोंदणी करण्यासाठी कृपया कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईतील या नंबर वर संपर्क साधा: +91 7208086846/ +91 8657434987

No comments:

Post a Comment