Wednesday, 24 May 2023

मनोरंजन विश्व बातमी व छायाचित्रे : ‘शेरलॉक होम्स सर्वांना आवडतो कारण तो आपला मित्र बनतो!’- संदीप खरे (शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत स्टोरिटेलच्या ऑडिओ बुक्समध्ये!)

 शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत स्टोरिटेलच्या ऑडिओ बुक्समध्ये!

शेरलॉक होम्स सर्वांना आवडतो कारण तो आपला मित्र बनतो!

संदीप खरे

युवा पिढीतील लोकप्रिय गीतकार-कवी संदीप खरे सर्वपरिचित आहेत. सोपी पण अर्थवाहीतसेच आजच्या पिढीच्या थेट परिचयाची भाषा आणि अभिव्यक्ती हे संदीप खरे यांच्या गीतांचे वैशिष्ट्य आहे. चकवा’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘हाय काय नाय काय’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘‘मोरया’ असे २५ चित्रपट. संगीतकार सलील कुलकर्णी यांच्यासोबत आयुष्यावर बोलू काही’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ असे लोकप्रिय सादर करणारे संदीप खरे आता स्टोरिटेलवर उन्हाळी सुट्टीनिमित्त अनोखा खजिना घेऊन येत आहेत. 'शेरलॉक होम्स'च्या गाजलेल्या रहस्यकथा आता स्टोरीटेलवर त्यांच्या आवाजात ऐकता येणार आहेत. दीर्घकाळ जगभरातील वाचकांना भुरळ घालणाऱ्या या अजरामर कथा मराठीत ऑडिओबुकच्या स्वरूपात आणताना आलेल्या अनुभवांबद्दल संदीप खरे यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न १) लहान मुलांसह सर्वक्षेत्रातील व्यक्तींसाठी तुम्ही खूप काम केलंयलिहिलंयकविता गाणी सगळं केलं आहेया सगळ्यामध्ये शेरलॉक होम्सचं वाचनहा प्रवास नेमका कसा सुरु झालं?

संदीप खरे : शेरलॉक होम्स हे इतकं अद्धभुत व्यक्तिमत्व आहेत्याने माझ्या आयुष्यात खूप लहानपणीच प्रवेश केला आहे. भालबा केळकर यांनी अनुवादित केलीली शोरलॉक होम्सची सर्व पुस्तके मी लहानपणी वाचली आहे. आणि जेव्हा हा प्रोजेक्ट करायचा असं मला स्टोरिटेलने सांगितले तेव्हा खूप आनंद झाला. कारण मला आठवतंय कि या कथा मी वाचून दाखविल्या आहेतपण त्या स्टुडिओमध्ये नाहीत तर स्टुडिओ बाहेर. बालपणाच्या काळात आपण जे जे वाचतो त्यामध्ये 'फास्टर फेणेअसो वा 'टारझनअसो. त्यावयात असताना माझ्यावर शेरलॉक होम्सने एक वेगळीच छाप उमटवली होती. आणि हे फक्त माझ्या बाबतीतच घडले असे नाहीतर जगभरातील सगळ्यांवर या कथांनी मोहिनी घातली होती. हे सगळं अद्धभुत म्हणावं तसं शेरलॉक होम्सने जगावर पकड घेतलीत्यांच्या कथांची भाषांतरे जगातल्या सगळ्या भाषांमध्ये झाली. आणि ती इतकी लोकप्रिय झाली आहेत कि मी या 'ऑडिओबुक्स'मध्ये सुरुवातीला शेरलॉक होम्सबद्दल लिहिलं गेलं आहे ते सुद्धा वाचलं आहे. तेही ऐकण्यासारखं आहे. हे पात्र इतकं अजरामर झालंय कि ते खरोखरच होतं आणि अजूनही आहे असंच लोकांना वाटतंय. आजही लंडन येथील '२२१ बेकर्स स्ट्रीट'ला त्याचं क्रिएट घररुम आहे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे त्यांनी मला तेव्हापासूनच झपाटलं आहे.

प्रश्न २) 'शेरलॉक होम्सया पात्राकडे तुम्ही कसं पहाता?

संदीप खरे : मी शेरलॉक होम्स लहानपणी वाचत असताना मला या व्यक्तिरेखेने पार झपाटलं होत आणि नेमके त्याचवेळी  टीव्हीवर 'ग्रॅनडाही मालिका (Granada TV Series) सुरु झाली होती. यात जेरेमी ब्रेट (Jeremy Brett) ह्या अभिनेत्यानी 'शेरलॅाक होम्स'ची भूमिका साकारली होती. अजूनही शेरलॉक होम्स म्हटलं कि तोच माझ्या डोळ्यासमोर येतो. ज्यांनी ही सिरीज पाहिली असेल त्यांना 'स्टोरीटेलवरही 'ऑडिओ बुक्स'ची सिरीज ऐकताना हे नक्की जाणवेल कि मी जे मराठीत वाचलंय त्याचा प्रभाव मात्र या मालिकेतील व्यक्तिरेखेचा आहे. जेरेमी ब्रेट यांनी साकारलेल्या शेरलॉक होम्सच्या बोलण्याची ढबत्याची एक्सेंट्रिक म्हणजे अतिशय हुशार असलेली माणसे जशी तंद्री लागल्या सारखी किंवा सणकू पद्धतीची असतात तशी ती शेरलॉक होम्सची प्रतिमा माझ्या मनात कोरली गेली आहे. मालिकेत दाखविलेली लंडन मधील लोकेशन्सबग्गीदगडी पेव्ह रोडकॉस्च्युम्सअसं सारं वातावरण मला फार लोभस वाटतं. आणि या सोबत त्यातील रहस्य आणि त्यांची शेरलॉक होम्सने चतुराईने केलेली उकल यामुळे या व्यक्तिरेखेच्या आपसूक प्रेमात पडायला होते.

प्रश्न ३) मूळ शेरलॉक होम्स मधील गंमत अनुवादित कथांमध्ये कशी आली आहे?

संदीप खरे : कुमार वयोगटातच साधारणतः आपण वाचायला लागतो. या लहान वयात अद्भुत कथा सगळ्यांनाच वाचायला आवडतात आणि त्या आवडीने वाचल्याही जातात. 'शेरलॉक होम्स'च्या मूळ कथांचे प्राध्यापक भालबा केळकर यांनी केलेले अनुवाद तसं पाहिलं तर अतिशय सोप्या सहज भाषेमध्ये आहे. त्यामुळे ओरिजनल कथांप्रमाणेच मराठीतील अनुवाद - भाषांतरही खूप इंटरेस्टिंग झालाय आणि तुम्ही एकदा हे स्टोरीटेलवर ऐकायला - वाचायला लागला की कधी पकड घेतली जातेतुम्ही त्या कथेत केव्हा रमता हे कळत नाही. आम्ही लहान असताना  'शेरलॉक होम्स'चे 'पकडा पकडी'चे हे शहरी खेळसुट्टीच्या काळात गावातही खेळले जायचे. तू कुठून आलायसतुझ्या बुटाच्या वरती असलेले मातीचे डागम्हणजे तू बागेतून आला आहेसअसे खेळात तर्क लावून 'शेरलॉक होम्स'चे खेळ आम्ही मुले खेळत होतो. आणि हीच गंमत या अनुवादित कथांमध्ये असल्याने तीच धम्माल या कथा ऐकताना येते.  

प्रश्न ४) बालपणी तुमच्यावर शेरलॉक होम्सच्या कथांनी नेमकी कोणती छाप उमटवली होती?

संदीप खरे : मराठी मीडियम मध्ये शिकलो आहे. त्यामुळे तसे इंग्लिश ते सुद्धा त्यांच्या एक्ससेन्ट(accent) कळणे  शक्यच नव्हतं. आणि तरीही मी शेरलॉक होम्स यांच्यावरील इंग्रजी मालिकेचे पाऊण तास - एक तासाचे एपिसोड पूर्ण खिळून पहात बसलेला असे. बरं ते वय असं नव्हतं की ज्या प्रकारची रहस्य या कथेत सांगितलेत आणि ज्या प्रकारे त्याची उकल शेरलॉक होम्स करतो ते  कळावं इतकं माझं वय नव्हतं. परंतु त्या मालिकेत दाखवलंय तसं त्यावेळेसचे ते लंडनत्या सगळ्या त्याच्या बग्याते सगळे त्यांचे दगडी रोडकॉस्च्युमधुकं मला टेरिफिक आवडायचंअजूनही आवडते. यातील शेरलॉक होम्सची चतुराईत्याची रुबाबदार छबीतीक्ष्ण नजरअफाट बुद्धिमत्ता यामुळे त्याची माझ्यावर बालपणात पडलेली छापयामुळे  नकळत सुट्टीच्या काळात त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जायचा.

प्रश्न ५) शेरलॉक होम्सचं वैशिष्ट्य काय सांगाल?

संदीप खरे : शेरलॉक होम्स आजही सर्वांना आवडतोआवडत राहतो आणि त्याचे कारण म्हणजे तो माणूस झालामित्र झाला जसं हॅरी पॉटर आजच्या मुलांचा मित्र झाला तसेच शेरलॉक होम्सबद्दल म्हणता येईल. शेरलॉक होम्स (Sherlock Holmes) हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. होम्स हे व्यवसायाने खाजगी गुप्तहेर आहेत. अविश्वसनीय चातुर्य असलेले होम्स आधुनिक विज्ञानरसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक्षणाचे वापर करून अनेक अवघड गुन्हे सोडवत असे. शेरलॅाक होम्सच्या या कथा जगप्रसिद्ध असून तो आणि त्याचा सहकारी डाॅ. वाॅटसन हे जगभरातील गुप्तहेरकथा वाचकांच्या आणि कुमार वाचकांच्या गळ्यातील अजरामर काळासाठीचे ताईत बनले आहेतअसे म्हणणे वावगे ठरणार नाही.

प्रश्न ६) स्टोरीटेलवरील शेरलॉक होम्सच्या या ऑडिओ बुक्सचे सादरीकरण करताना काळानुरूप तुम्ही कोणते वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला आहे का?

संदीप खरे : अनेकजण असं करतात की सुरुवातीला कथा वाचून घेतात आणि मग सुरुवात करतात. मला अपवाद करावासा वाटला अशासाठी की ते 'रहस्यरहस्यरहस्य आहे ना ते मलाही खेचत जातं. मला जर का ते ऑलरेडी माहित असेल तर कदाचित शिळेपणा येऊ शकेल. म्हणून मी मुद्दामून खूप खोलात जाऊन त्याचा अभ्यास वगैरे केला नाही. कथा जरी त्याकाळची असली तरी ती क्लिष्ट भाषा नक्कीच. त्यामुळे मला नाव वाचताना फार गंमत येत गेली. एखादा रहस्यमय सिनेमा बघावातशी कथा सादर केली आहे. यात संवाद भरपूर आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेचा आवाज त्याच्या स्वभावानुसार दिला असून त्यातून मुळात कथा सांगितली आहे.

'स्टोरिटेल'वरील संदीप खरे यांच्या आवाजातील 'ऑडिओ बुक्स' ऐकण्यासाठी लिंक
https://www.storytel.com/in/en/narrators/98934-Sandeep-Khare

No comments:

Post a Comment