~ भारत सरकारचे माननीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. ~
मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने "थॅलेसेमिया, वे फॉरवर्ड" या विषयावर एका विशेष सत्राचे आयोजन आज केले होते. या उपक्रमाने हॉस्पिटलचा व्यापक दृष्टिकोन अधोरेखित केला आहे, जो आरोग्य देखभालीमध्ये प्रमुख योगदान देणाऱ्या संस्थांसोबत भागीदारीला प्रोत्साहन देण्यात तंत्रज्ञान, विशेषज्ञता, मजबूत पायाभूत संरचना आणि धोरणात्मक गुंतवणुकीला पूरक आहे. उपक्रमाचा उद्देश आनुवंशिक रक्त आजार थॅलेसेमियाच्या उपचारांमध्ये होत असलेल्या प्रगतीबाबत माहिती देणे आणि थॅलेसेमिया रुग्णांच्या मदतीसाठी बनवण्यात आलेल्या सरकारी योजनांबाबत जागरूकता वाढवणे हा होता. यावेळी सन्माननीय पाहुणे, भारत सरकारचे माननीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीने आरोग्यसेवा वाढवण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांदरम्यानचा सहयोग अधोरेखित केला.
यावेळी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या चेअरपर्सन श्रीमती टीना अंबानी यांनी थॅलेसेमिया प्रकल्पाचा पुढील मार्ग अधोरेखित करत सांगितले, "आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न फक्त आघाडीच्या वैद्यकीय देखभाल सेवा प्रदान करण्यावर केंद्रित नाहीत तर आघाडीच्या निवारक उपायांवर आणि सामुदायिक आउटरीच कार्यक्रमांवर देखील आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. क्षमता असतात तिथे जबाबदारी देखील येते. प्रत्येक मुलाला सर्वोत्तम उपचार प्रदान करण्यात स्वतःच्या सर्व क्षमता उपयोगात आणणे ही आमची जबाबदारी मानतो. संपूर्ण क्षेत्र आणि आतील भागांमध्ये विस्तार करताना, आमची मुळे पसरत जातील, आम्ही सेवांना अधिक खोलवर पोहोचवू शकू. आरोग्य देखभालीची व्याप्ती वाढवण्याचा आमचा संकल्प सातत्याने मजबूत होत आहे. आमच्या प्रत्येक कामामागचा सिद्धांत 'प्रत्येक आयुष्य महत्त्वाचे आहे' याचा केंद्रबिंदू हा संकल्प आहे."
थॅलेसेमियामुळे गंभीर ऍनिमिया, थकवा आणि शरीरात वेगवेगळी गुंतागुंत या समस्या निर्माण होऊ शकतात, त्यासाठी संपूर्ण आयुष्यभर रक्त संक्रमण आणि तपशीलवार मेडिकल उपचारांची गरज भासते. भारतात थॅलेसेमियाचे प्रमाण वाढत आहे, दरवर्षी १०,००० पेक्षा जास्त मुले या आजारासह जन्माला येतात. थॅलेसेमिया कायमस्वरूपी बरा करू शकेल असा एकमेव उपाय म्हणजे स्टेम सेल ट्रान्सप्लान्टेशन, ज्याला बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन असे देखील म्हणतात. एलोजेनिक बीएमआय म्हणून ओळखली जाणारी ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि हे उपचार करण्याची विशेषज्ञता जगभरात खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहे.
भारत सरकारचे माननीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, "आजचा दिवस माझ्यासाठी खूप समाधानाचा आहे. माझ्या मतदारसंघात ८० हून अधिक थॅलेसेमिया रुग्ण आहेत आणि नागपुरात लाखोंच्या संख्येने आहेत. रक्ताच्या नात्यातील विवाहाचे धोके जाणवून देणे, विशेषत: वंचित समुदायांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील थॅलेसेमियाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा पुढाकार एक स्तुत्य पाऊल आहे. या सहयोगी प्रयत्नात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांचे मी कौतुक करतो."
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल कोल इंडिया सीएसआर-फंडेड हेमेटोपोइटिक स्टेम सेल ट्रान्सप्लान्ट (एचएससीटी) प्रोग्रामचे समर्थन करते आणि अशा थॅलेसेमिया रुग्णांची मदत करते ज्यांच्याकडे प्रोग्रामचा खर्च कव्हर करण्यासाठी पुरेशी आर्थिक संसाधने नसतात. यावर्षी जून महिन्यात हॉस्पिटलने आपला कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) प्रोजेक्ट, थॅलेसेमिया बाल सेवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी कोल इंडियासोबतचा करार वाढवला. याचा उद्देश वंचित समुदायातील मुलांवर थॅलेसेमिया आणि अप्लास्टिक ऍनिमियाचे रोगनिवारक उपचार करणे हा आहे. त्यामुळे वंचित समुदायांमधील थॅलेसेमिया आणि अप्लास्टिक ऍनिमियाने आजारी जास्तीत जास्त मुलांपर्यंत जीवन रक्षक बीएमटी (BMT) उपचार पोहोचवण्यात मदत मिळत आहे.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने आशा, देखभाल आणि निरोगी समाज निर्माण करण्याचे वचन देणाऱ्या उपक्रमांचे नेतृत्व करण्याची बांधिलकी दृढतेने जपली आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रमांचे समर्थन करून वंचितांना सर्वोत्तम आधुनिक आरोग्य देखभाल प्रदान करण्यात हे हॉस्पिटल नेहमी पुढे राहिले आहे. या हॉस्पिटलने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम (RBSK) आणि महाराष्ट्र सरकारसोबत मिळून आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांसाठी १२६ पेक्षा जास्त यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी केल्या आहेत.
'हीलिंग लिटिल हार्ट्स' उपक्रमाच्या माध्यमातून हे हॉस्पिटल जन्मजात हृदयरोगांनी आजारी, आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गातील मुलांवरील उपचारांमध्ये मदत प्रदान करत आहे. हॉस्पिटलचे क्लबफूट क्लिनिक आवश्यक उपचार प्रदान करण्यात देखील महत्त्वाची भूमिका निभावत आहे आणि या मुलांना क्लबफूटमुळे मोबिलिटीमध्ये काही समस्या येऊ नयेत याची काळजी घेत आहे.
No comments:
Post a Comment