Monday, 18 December 2023

मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'वळू' अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी!

 

अतुल कुलकर्णीडॉ. मोहन आगाशेदिलीप प्रभावळकरगिरीश कुलकर्णीनंदू माधवअमृता सुभाषवीणा जामकरसतीश तारेचंद्रकांत गोखले आणि निर्मिती सावंत यांच्या अफलातून भूमिका!

 

मुंबई: महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट वळू’ आता २२ डिसेंबर २०२३ पासून अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते उमेश कुलकर्णी’ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून 'रोटरडॅम', आशियाईवॉर्साकार्लोवी वेरीरेकजाविक -आइसलँडला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सह पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २००८ मध्ये वळू’ चित्रपटास सर्वोत्तम दिग्दर्शन आणि सर्वोत्तम छायांकन असे पुरस्कार मिळाले आहेत.

कुसवडे गावात वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेनुसार गावकऱ्यांनी देवाला वाहिलेला डुरक्या’ नावाचा वळू गावात धुमाकूळ घालतो. तेव्हा डुरक्याला पकडण्यासाठी गावातले सरपंच( डॉ. मोहन आगाशे)  फॉरेस्ट ऑफिसर स्वानंद गड्डमवारांना (अतुल कुलकर्णी) बोलावतात. डुरक्याला पकडण्याच्या या धुमाकुळात गावात काय काय धमाल घडते हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकार अतुल कुलकर्णीमोहन आगाशेभारती आचरेकरगिरीश कुलकर्णीवीणा जामकरदिलीप प्रभावळकरनिर्मिती सावंतनंदू माधवरेणुका दफ्तरदारमंगेश सातपुतेअमृता सुभाषसतीश तारेचंद्रकांत गोखलेज्योती सुभाषश्रीकांत यादवअश्विनी गिरी आहेत. प्रख्यात छायाचित्रकार सुधीर पलसाने यांनी 'वळू'चा ७० एमएम कॅनव्हास चित्रित केला असून कलादिग्दर्शन रणजित देसाई यांचे तर अत्यंत आकर्षक पार्श्व संगीत मंगेश धाकडे यांनी दिले आहे.

मराठी चित्रपटांचा चेहरा बदलणारा आणि अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करताना एक वेगळा उत्साह असून ओटीटीवर चित्रपटास नक्कीच भरभरून प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

No comments:

Post a Comment