मुंबई २० नोव्हेंबर २०१९ : प्रत्येक नात्याचा पाया प्रेम आणि विश्वास असतो. नवरा - बायकोच्या नात्यामध्ये याच दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये शिवा आणि सिध्दीचे नाते आणि त्यांचा लग्नानंतरचा प्रवास जरा वेगळाच आहे असे म्हणायला हरकत नाही... लग्न झाले तेंव्हापासूनच दोघांनाही या लग्न बंधनामधून सुटका हवी आहे... पण, सिद्धी घरातील काही जिवाभावाच्या माणसांकडे बघून अजूनही लष्करेंच्या घरामध्ये रहाते आहे... आता मात्र शिवा – सिद्धीच्या नात्याला निर्णायक वळण मिळणार आहे यात काही शंका नाही... लवकरच रुद्रायत गावामध्ये प्रसिध्द अशी सुरमारीची स्पर्धा रंगणार आहे... या सुरमारीच्या स्पर्धेत जो कोणी विहीरीतून नारळ पहिले बाहेर काढेल त्या व्यक्तीची सत्ता गावामध्ये रहाते अशी परंपरा आहे... या स्पर्धेत दरवर्षी आत्याबाईंसाठी शिवा विहीरीमधून नारळ बाहेर काढत आला आहे आणि यावर्षीदेखील आत्याबाईंना त्याच्याकडून हीच अपेक्षा आहे... सगळे नीट सुरू असताना सुरमारीच्या स्पर्धेत शिवावर जीवघेणा हल्ला होणार आहे आणि हे सिध्दीला कळताच ती शिवाचा जीव वाचविण्यासाठी विहीरीमध्ये उडी मारणार आहे... सिध्दी आणि शिवाचे नाते एका नाजुक वळणावरून जात असतानाच, शिवाबद्दल मनामध्ये इतका राग - द्वेष असताना सिध्दी असे का करणार ? सिध्दी – शिवाच्या नात्यामध्ये काय बदल घडतील ? शिवा आणि सिध्दीच्या आयुष्यात इतके सगळे घडले असताना प्रेमाचा, मैत्रीचा रंग येऊ शकेल ? शिवा - सिद्धीच्या नात्यातील दरी या घटनेनंतर कमी होईल ? नक्की बघा जीव झाला येडापिसा पुढील आठवड्यामध्ये सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
जीव झाला येडापिसा मालिकेचे चित्रीकरण, मालिकेतील पात्र, रिअल लोकेशन्स यामुळे जीव झाला येडापिसा ही मालिका प्रेक्षकांना आपलीशी आणि वास्तवादी वाटते आहे. सुरमारीच्या या दृश्यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमने खूप मेहेनत घेतली आहे... सुरमारी या खास स्पर्धेचे शूट तब्बल ३ दिवस सुरू होते... यासाठी शिवाबरोबरच सिध्दीने देखील खास तयारी आणि सराव केला... या अनुभवाबद्दल बोलताना सिध्दी म्हणजेच विदुला चौघुले म्हणाली, “जेंव्हा आम्हाला ही कथा संगितली तेंव्हा मला याची कल्पना देण्यात आली होती की मालिकेमध्ये सिध्दी देखील पाण्यामध्ये उडी मारते... मी स्वत: स्टेट लेव्हलची स्वीमर आहे, त्यामुळे पाणी दिसले की आतून एक इच्छा होते पाण्यामध्ये उडी मारण्याची... जेंव्हा अशोक सुरमरीच्या स्पर्धेची तयारी करत होता, जेंव्हा त्याचे पाण्यामध्ये उडी मारण्याचे शॉट असायचे तेंव्हा वाटायचे कधी येणार तो दिवस आणि मी कधी मारणार आहे पाण्यात उडी... सुरमरीच्या स्पर्धेची चर्चा सुरू झाली तेंव्हा माझ्याजागी डमी उभा करायचा अशी चर्चा सुरू होती... पण मीच सांगितले की मी हे करू शकते... आम्ही या सुरमारीच्या स्पर्धेचे अन्डरवॉटर शूट केलं. खूप मज्जा आली इतके नक्की आम्हाला खात्री आहे प्रेक्षकांनादेखील नक्की आवडेल”.
No comments:
Post a Comment