Monday, 4 November 2019

'अवांछित'च्या दुसऱ्या सत्रात कोलकाताचं विस्तीर्ण दर्शन!


अभिनेते किशोर कदम, मृणाल कुलकर्णी, मृण्मई गोडबोले अभय महाजन यांच्यासह डॉ. मोहन आगाशे आणि सुहास जोशी यांचा सहभाग!

पश्चिम बेंगॉलच्या सौंदर्याची भुरळ मराठी प्रेक्षकांना घालण्यासाठी दिग्दर्शक शुभो बासु नाग आणि निर्माते प्रीतम चौधरीसहयोगी निर्माते विकी शर्मा त्यांच्या 'फॅटफिश एन्टरटेन्मेन्टप्रस्तुत 'अवांछितया मराठी चित्रपटाद्वारे सज्ज झाले असून त्यांच्या या चित्रपटाचं पहिलं चित्रीकरण सत्र नुकतचं पूर्ण झालं होत. येत्या ७ नोव्हेंबर पासून या चित्रपटाचं दुसरं चित्रीकरण सत्र कोलकाताच्या विस्तीर्ण सौंदर्य संपन्न विविध ठिकाणी सुरु होत आहे. उत्तर कोलकातामधील लाहाबाडीसह दक्षिण कोलकातामधील विविध कॅफेटेरिया आणि ऑलिगोमध्ये पहिल्या सत्रात चित्रीकरण झालं आहे. मराठी भाषेत तयार होणाऱ्या 'अवांछितया चित्रपटाची सर्व लोकेशन्स चित्रपटाच्या कथेप्रमाणेच वैशिष्ट्येपूर्ण आहेत. कोलकातामधील डोळ्याचं पारणं फेडणारी विस्तीर्ण अशी बहुतांश सौंदर्यस्थळे प्रथमच मराठी प्रेक्षकांना वेड लावणार आहेत.
हरहुन्नरी कलावंत किशोर कदमसदाबहार सौंदर्यवती अर्थात अभिनेत्री  मृणाल कुलकर्णीयुवा अभिनेता अभय महाजनयुवा अभिनेत्री मृण्मई गोडबोलेजेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशेसुहास जोशीयोगेश सोमणसुलभा आर्यराजेश शिंदे यांच्यासह बंगाली अभिनेते बरून चंदाअसीम दासदिलीप दवेअरुण गुहा ठाकूरताराणा बासू ठाकुर या  प्रमुख बेंगॉली कलावंतांचाही अभिनय मराठी रसिकांना पहायला मिळणार आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने बेंगॉली - मराठी कलावंत पडद्यावर व मागेही एकत्र काम करीत आहेत. पन्नास हून अधिक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारे सुप्रसिद्ध बेंगॉली निर्माते प्रितम चौधरी हे 'अवांछितया चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असून त्यासोबतच बेंगॉली दिग्दर्शक शुभो बासु नाग यांचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. 'गणवेशया सुपरहिट मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर अतुल जगदाळे हे या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीसोबतच क्रिएटिव्ह प्रोडूसर बनले आहेत.
'अवांछित'मध्ये नव्या आणि जुन्या कोलकाताची रूपकात्मक कथा दिसणार असून ती वडील मधुसूदन गव्हाणे आणि मुलगा तपन गव्हाणे यांच्या नात्याप्रमाणे विभागली आहे. वृध्दाश्रमातल्या नोकरीत गुंतलेल्या मधुसूदन यांचं नकळत त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळेच आईने जीव गमावल्याची भावना मनात बाळगून तारुण्यात पदार्पण करणारा तपन त्यांच्याशी खटकून वागू लागतो. बापलेकातला दुरावा वाढत जातो. त्यांच्या नातेसंबंधांची वीण कधी घट्ट तर कधी सैल होत जाते.
दिग्दर्शक शुभो बासु नाग यांच्या मूळ कथेवर 'अवांछितबेतला असून त्यावर पटकथा व संवाद निर्मिती योगेश जोशी यांनी केली आहे. ओंकार कुलकर्णी यांनी रचलेल्या गीतांना संगीत व पार्श्वसंगीत राष्ट्रीय पारितोषिक विजेते लोकप्रिय बंगाली संगीतकार अनुपम रॉय यांनी दिले आहे. त्यांचं हे संगीत मराठी रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. या चित्रपसाठी विकी निर्माते प्रितम चौधरी यांच्यासोबत विकी शर्मा सहयोगी निर्माते असून अनु बासू हे प्रॉडक्शन डिझाईन करीत आहेत. त्यांच्या साथीनं अमित डे कलादिग्दर्शन करीत आहेत. वेशभूषाकार जयंती सेन यांनी स्टाईल व कॉश्च्युम डिझाईन करीत असून रंगभूषा प्रसेनजीत यांची आहे. या चित्रपटासाठी कार्यकारी निर्मिती डेबोलीन सेन पाहत असून प्रॉडक्शन मॅनेजर अरुण मन्ना आहेत.

No comments:

Post a Comment