‘झी युवा’ या वाहिनीने तरुणाईच्या मनोवृत्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. ‘सुरवातीला फ्रेशर्स , बनमस्का , लव्ह लग्न लोचा सारख्या युवा मालिका होत्या . फुलपाखरू सारखी मालिका जी युवा पिढीच्या गळ्यातला ताईत बनली होती. मुक्ता बर्वे , वंदना गुप्ते आणि इतर नावाजलेले चेहरे असलेला बहुचर्चित 'रुद्रम' सारखा प्रयोग. मराठीतील पहिला वाहिला 'रिऍलिटी शो' संगीत सम्राट , गर्ल्स हॉस्टेल आणि एक घर मंतरलेले सारख्या उत्तम हॉरर मालिका , अप्सरा आली आणि युवा डान्सिंग क्वीन सारखे डान्सिंग रिऍलिटी शोज अशी बरीच मेजवानी झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांना दिली आहे . सध्या सुरु असलेल्या युवा डान्सिंग क्वीन , मेहफिल , ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण , साजणा आणि प्रेम पोईंजन पंगा आणि आल्वेज युवा टाइम बँड प्रेक्षकांना आवडत आहे
झी युवा वाहिनी नेहमीच प्रेक्षकांसाठी नवीन आणि फ्रेश मालिका आणण्याचा प्रयत्न करत असते . त्यामुळे लवकरच प्रेक्षकांना एक फ्रेश विनोदी धमाकेदार मालिका वाहिनीवर पहायला मिळणार आहे. ही मालिका अतिशय मॉडर्न असून ती मुंबई शहर , त्यातील गुन्हेगारी , महाविद्यालयीन माहोल त्यातील धमाल आणि एक अनपेक्षित मनोरंजक प्रेमकहाणी अशा विषयावर आधारित असेल . यात अतिशय नावाजलेले चेहेरे आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतील . ही मालिका जानेवारी मध्ये शूट व्हायला सुरु होईल आणि लवकरच झी युवा वाहिनीवर प्रक्षेपित होईल. तर आता झी युवा आपल्या प्रेक्षकांसाठी काय नवीन मसाला घेऊन येत आहे हे पाहायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील.
No comments:
Post a Comment