Friday, 6 December 2019

साधना सरगम यांच्या सुरांनी सजणार झी युवाची " मेहफिल "

नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या आवाजाने गाजवणाऱ्या प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्याबरोबर सुमधुर गाण्यांची आणि दिलखलास गप्पांची 'मेहफिललवकरच आपल्याला झी युवा या वाहिनीवर पहायला मिळणार आहे.  सोमवार  डिसेंबरपासून सुरू होणार असलेली 'मेहफिलआठवड्यातून दोनदा म्हणजे सोमवार आणि मंगळवार रात्री :३० वाजता झी युवावर प्रक्षेपीत होईल . यात क्रांती रेडकर ही लोकप्रिय अभिनेत्री या शो ची होस्ट असून ती साधनाजींशी संवाद साधेलसाधना सरगम यांचा चित्रपटगीतांचा तीन दशकांचा प्रवास त्यामागील कहाण्या याबद्दल साधनाजीकडून ऐकायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.'युवा सिंगर एक नंबरया कार्यक्रमाच्या घवघवीत यशानंतर, 'झी युवावाहिनी हा नवाकोराफलातून सिंगिंग रिऍलिटी कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेतरीही या कार्यक्रमाला स्पर्धेचे कुठलेही स्वरूप देण्यात आलेले नाहीदर आठवड्यातसंगीत क्षेत्रातील सेलिब्रिटी या मैफिली आपल्या भेटीला येणार आहेदरवेळी थीम सुद्धा नवी असणार आहेया भागात साधनाजींबरोबर मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र , जुईली जोगळेकर , राहुल सक्सेना , अभिजीत कोसंबी अलोक कातदरे , अमोश मोहिते यांचीही सुमधुर गाणी पहायला मिळतील .    
या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात नव्वद च्या दशकात अनेक चित्रपटांमधील गाणी गाणाऱ्या साधना सरगम यांच्या गाण्यातील जादू अनुभवण्याची संधी 'झी युवा'वर मिळणार आहेविविध राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित साधनाजीत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या आवडीची निरनिराळी गाणी या मंचावर सादर करतीलसोमवारी आणि मंगळवारी रात्री जेवणाच्या वेळी रंगणार असलेली ही मेहफील , दिवसभराच्या थकव्याचा 'स्ट्रेस बस्टरठरेलहे मात्र नक्कीसाधनाजींचे सारे चाहतेमेहफीलच्या या भागाचा मानापासून आनंद लुटतील.
'झी युवावाहिनीवरील या मेहफिल मध्ये सहभागी झालेल्या साधना रगम यांनी सांगितले की , " 'झी युवावाहिनीवरील ' मेहफिल'  सारख्या संगीतावर आधारित उत्कृष्ट कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा खरंच आनंद आहेपहिल्या भागासाठी मला विचारले गेले हा मी माझा सन्मा समजते.या मंचावर माझी जुनी लोकप्रिय गाणी गात असतानामाझ्या अनेक आठवणीही ताज्या झाल्यामाझी निवडक आवडती गाणी मी  या कार्यक्रमाच्या द्वारे प्रेक्षकांसमोर सादर केलेली आहेतझी युवाचे प्रेक्षक या गाण्यांचा मनमुरादपणे आनंद लुटतीलयाची मला खात्री आहे."

No comments:

Post a Comment