स्वप्निल जोशी, हा मराठी सिनेसृ ष्टीतील एक चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची चॉकलेट बॉ यची छबी आपल्याला सगळ्यांनाच ठा ऊक आहे. पण, हाच हँडसम हिरो, आप ल्या अभिनयाचे निरनिराळे पैलू सु द्धा त्याच्या विविध चित्रपटां मधून दाखवून देतो. त्याच्या दर् जेदार अभिनयाची झलक असलेल्या सि नेमांपैकीच एक, म्हणजे 'मोगरा फु लला' हा सिनेमा! येत्या रविवारी , म्हणजेच ८ डिसेंबरला हा सिने मा 'झी टॉकीज'वर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 'मोगरा फुलला' या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, दुपारी १ २ आणि संध्याकाळी ६ वाजता या वा हिनीवर होणार आहे. स्वप्निल जो शीचा अप्रतिम अभिनय आणि उत्कृष् ट कौटुंबिक कथा अशी दुहेरी मे जवानी असलेला हा चित्रपट प्रेक् षकांचे भरपूर मनोरंजन करणारा आहे. झी टॉकीज प्रेक्षकांसाठी ने हमीच खास आणि वैशिष्ट्यपूर्ण चि त्रपटांचा खजिना घेऊन येत असते. 'मोगरा फुलला' हा चित्रपट सुद् धा याच खजिन्याचा पेटीतील आणखी एक सुंदर अलंकार आहे.
हल्लीच्या काळात लुप्त होत जाणा री एकत्र कुटुंबपद्धती, हा या चि त्रपटाचा गाभा आहे. आपल्या सगळ् यांचाच हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. एकत्र राहणाऱ्या या मो ठ्या कुटुंबाची गोड कहाणी, प् रसंगी येणारे ताणतणाव आणि सर्वा त महत्त्वाचं म्हणजे, आई व मुला मधील मतभेदावर प्रकाश टाकणारी ही गोष्ट आहे. प्रत्येक आईला, ति चं एक मूल हे सर्वाधिक प्रिय अस तं. आईचं विश्व त्याच्याभोवती खि ळलेलं असतं. अशावेळी, लग्नानंतर , त्या मुलाची बायको घरी आल्या वर, परिस्थिती बदलते. आपला मु लगा आता काही प्रमाणात का होईना , पण आपल्यापासून दुरावणार, ही भावना आईच्या मनात येऊ लागते. आ पलं विश्व आता कुणाबरोबर तरी वा टून घ्यायचं, ही आईच्या मनाची घा लमेल, त्यातून बदलत जाणारे आई व मुलातील संबंध या सगळ्यावर हा चित्रपट भाष्य करतो. त्यातच, मु लगा प्रेमविवाह करणार, म्हणजे आ पल्यापासून आणखी दूर होणार ही भी ती सुद्धा आईच्या मनात आहे. म् हणून, तिचा मुलाच्या प्रेमाला अ सलेला विरोध सुद्धा या चित्रपटा त पाहायला मिळतो. आईसाठी तिचा मु लगा आणि बायकोसाठी तिचा नवरा म् हणजे हक्काचं माणूस! त्यामुळेच या दोन्ही स्त्रियांच्यात एकमे कांविषयी निर्माण होत असलेला कड वटपणा व त्यामुळे बिचाऱ्या पुरु षाची होणारी द्विधा मनःस्थिती; अशी परिस्थिती सुद्धा या चित् रपटाच्या कथानकात पाहायला मिळेल . स्वप्निल जोशीच्या उत्तम अभि नयामुळे या विषयाला योग्य न्याय मिळालेला आहे. या सगळ्या स्थि तीत, मुलाला त्याचं प्रेम मिळणा र का? की आणखी काही घडणार? हे ब घण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पहावा लागेल.
'मोगरा फुलला' या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्निल जोशीसोबत सं वाद साधला असता, त्याने त्याच् या आयुष्यातील एक छानशी 'मोगरा फुलला मुमेंट' शेअर केली आहे. त्या ने त्याच्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतलं, तो क्षण त्याच्या साठी आयुष्यात सगळ्यात आनंदाचा क्षण होता, असं तो आवर्जून सां गतो. त्याला मुलगीच हवी होती, हे डॉक्टरांना ठाऊक होतं. त्यामु ळे, त्याला मुलगी झाल्यावर, ती गोड बातमी देताना त्याच्याकडे पा र्टीची मागणी डॉक्टरांनी केली, हेसुद्धा त्याने आठवणीने सांगि तले. स्वनिलचं स्वप्न पूर्ण झा ल्याचं आनंद हॉस्पिटलमध्ये सुद् धा सगळ्यांना झाला होता. 'मोगरा फुलला'मधील आईसाठी जसा ति चा मुलगा खूप प्रिय आहे, तशीच मा झी मायरा सुद्धा माझ्यासाठी जीव की प्राण आहे, हेही सांगायला स्व प्निल विसरला नाही
No comments:
Post a Comment