Thursday, 19 December 2019

पूर्वाच्या भुवयांची किमया पाहून सारेच भारावून गेले!!!

        'लागिरं झालं जी' या मालिकेतील जयडी, म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदे, यानिमित्ताने घराघरात पोचली. प्रेक्षकांनी रोज पडद्यावर पाहिलेली ही खलनायिका, खऱ्या आयुष्यात मात्र जयडीसारखी अजिबातच नाही. तिचं व्यक्तिमत्व अत्यंत ग्लॅमरस आणि आकर्षक असं आहे. बिनधास्त, बेधडक अशी पूर्वा, आता 'झी युवा' वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' या सेलिब्रिटींच्या नृत्य स्पर्धेत सहभागी झाली आहे. 'बोल्ड अँड ब्युटीफुल' या व्याख्येत चपखल बसणारी पूर्वा शिंदे 'युवा डान्सिंग क्वीन'च्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळाली. तिच्या धमाकेदार परफॉर्मन्सचं सगळ्यांनीच विशेष कौतुक केलं. परीक्षकांवर तिच्या नृत्याची खास छाप पडलेली पाहायला मिळाली. आपल्या नयनरम्य नृत्याचा जलवा दाखवत तिने मंचावर अक्षरशः धुमाकूळ घातला.
        पूर्वाने नृत्याचे कुठलेही शिक्षण घेतलेले नाही. ती मुळात एक हाडाची अभिनेत्री आहे. तिने आपल्या डान्समधून उपस्थितांची मने तर जिंकलीच, पण तिच्या अभिनयाचा आविष्कार सुद्धा प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळाला. आपलं अभिनय कौशल्य तिने दाखवलं, ते 'आयब्रो डान्स'मधून! तिच्या भुवयांची किमया बघून सुद्धा सर्वजण भारावून गेले होते. विशेषतः परीक्षक मयूर वैद्य तिची ही कला पाहून खूपच प्रभावित झाले. त्यांनी स्वतः मंचावर येऊन तिचे कौतुक केले. एवढेच नाही तर, मयूर वैद्य आणि पूर्वा शिंदे यांच्यात 'आयब्रो डान्स'ची जुगलबंदी रंगली होती. याआधी 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात सुद्धा तिची ही कला पाहायला मिळाली होती. केवळ भुवयांच्या साहाय्याने तिने केलेला हा अनोखा डान्स बघून सर्व प्रेक्षक भारावून गेले.
'युवा डान्सिंग क्वीन'मध्ये अनुभवायला मिळणार असलेल्या अनेक सरप्रायझेसपैकी हे एक झकास सरप्राईज पहिल्या आठवड्यात पाहायला मिळाले आहे. अशाच मजेदार अनुभवांचा खजिना आणि दर्जेदार नृत्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी, अवश्य पाहत रहा, 'युवा डान्सिंग क्वीन', बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर!! 

No comments:

Post a Comment