मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'!! नुकताच हा सोहळा नेहमीप्रमाणे दणक्यात पार पडला आहे. इतक्या मोठ्या, शानदार सोहळ्यात उपस्थित असणारी सेलिब्रिटी मंडळी हा सगळ्यांच्याच चर्चेचा विषय असतो. विशेषतः त्यांचा रेड कार्पेटवरील वावर, हा अनेकांसाठी मन मोहून टाकणारा क्षण असतो. 'झी टॉकीज' वाहिनी आयोजित करत असलेल्या, 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या सोहळ्याला मिळत असलेलं ग्लॅमर पाहता, रेड कार्पेटकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले असते. यंदा सुद्धा रेड कार्पेटची शान तशीच आगळी होती. यात भर टाकण्याचं काम केलं, ते कोठारे पतीपत्नी यांनी!! आदिनाथ आणि उर्मिला कोठारे त्यांच्या खास पोशाखात अवतरले आणि सारेच अचंबित झाले.
उर्मिला आणि आदिनाथ कोठारे ही मराठी सिनेसृष्टीतील जोडी सगळ्यांचीच लाडकी आहे. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९' या सोहळ्यात या जोडीने आपल्या सगळ्या चाहत्यांची मनं अधिक जिंकून घेतली. ऑफ शोल्डर गाऊनमध्ये उठून दिसणारी आणि सौंदर्याची निराळी छाप पाडणारी उर्मिला, नेहमीप्रमाणे ग्लॅमडॉल वाटत होती. तिचा वावर अगदी सहजसुंदर होता. तिची नवी हेअर स्टाईल सुद्धा उठून दिसत होती. केसांची कमी केलेली लांबी आणि सोनेरी व बर्गंडी छटांनी भरून रंगलेले केस यामुळे तिचा चेहरा अधिकच खुलून दिसत होता. तिच्यासोबत झकास एंट्री घेतली, ती आदिनाथ कोठारे याने! मँडेरीन सूटमध्ये त्याचा रुबाब अधिकच झळकत होता. डोळ्यावर मिरवणारा गॉगल सुद्धा त्याच्या हॅन्डसम लुकमध्ये भर टाकत होता. छानपैकी कोरलेल्या मिशा, मुलींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेशा दिसत होत्या. थोडक्यात काय, तर उर्मिलाच्या खास पोशाखासमोर आपणही फिके ठरणार नाही, याची पुरेपूर काळजी त्याने घेतली होती.
No comments:
Post a Comment