Tuesday, 17 December 2019

अण्णासाहेब देऊळगावकर जन्मशताब्दी निमित्त रंगणार अनोखा सोहळा


‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’चा पुढाकार  
अण्णासाहेब देऊळगावकर, १९४८ ते १९९८ या ५० वर्षांच्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्त्व. चित्रपट लेखकगीतकारनिर्मातावितरक अशा विविध क्षेत्रांत उत्तम यश त्यांनी मिळविले. ‘थापाड्या’, ‘माहेरची साडी', "दे दणादण', "लेक चालली सासरला', "धुमधडाकायासारख्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांसह सुमारे पन्नासहून अधिक मराठी चित्रपटांच्या कथासंवाद आणि पटकथा साकारणाऱ्या अण्णासाहेब देऊळगावकर यांचे २२ ऑगस्ट २०१९ ते २२ ऑगस्ट २०२० हे जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार  दि.२० डिसेंबरला दुपारी ४.०० वाजता प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरातील मिनी थिएटरमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे.  
याप्रसंगी अण्णासाहेब देऊळगावकर यांच्या जीवनपटाचा आढावा घेणारी कलायोगीची कर्तृत्वगाथा ही चित्रफित दाखवण्यात येणार आहे. तसेच मान्यवरांच्या मनोगतासह माया बाजार या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा यावेळी संपन्न होईल.
नारायण यशवंत देऊळगावकर अर्थात अण्णांचा जन्म २२ ऑगस्ट १९२० रोजी पुण्यात झाला. 'मायाबाजार', ‘पुढचं पाऊल', 'झाकली मूठ', 'पारिजातक', 'शिवलीला', 'औक्षवंत हो बाळ', ‘सुभद्रा हरण’, ‘सतीचं वाण’, ‘सासुरवाशीण’, ‘सतीची पुण्याई’, ‘खटय़ाळ सासू नाठाळ सून’, ‘नशीबवान’, आदि चित्रपटांना देखील अण्णांच्या लेखणीचा परीस्पर्श लाभला होता. त्यातील बऱ्याच चित्रपटांनी रौप्य महोत्सवी यश मिळवले. लक्ष्मीकांत बेर्डे, नितीश भारद्वाज, मोहन जोशी, अलका कुबल, सविता प्रभुणे, चंदू पारखी या कलाकारांना अण्णांनी त्यांच्या चित्रपटातून प्रथम चमकवले. मराठी चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र शासन, गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने चित्रभूषण पुरस्कारगदिमा पुरस्कारव्ही. शांताराम पुरस्कार असे नावाजलेले पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.

No comments:

Post a Comment