सद्य स्थितीला मराठी चित्रपटांची संख्या वर्षागणिक वाढत चालली आहे. त्याच बरोबर प्रसिद्धी तंत्राची मागणी सुद्धा वाढतेय. हिंदी आणि इतर चित्रपटसृष्टींशी स्पर्धा करत असताना मराठी चित्रपटसृष्टीला नव नव्या शक्यतांचा विचार करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी श्री. साईनाथ राजाध्यक्ष आणि श्री. रमेश शेट्टी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले 'उत्तुंग मराठी' हे नवे व्यासपीठ प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. दि. १० डिसेंबरला 'उत्तुंग मराठी' च्या प्रेक्षकार्पण सोहळ्याचे दिमाखदार आयोजन पार पडले.
सदर कार्यक्रमास मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अ.भा.म.चि. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर, अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेते विजय कदम, प्रदीप पटवर्धन, महेश कोकाटे, दिग्दर्शक मिलिंद कवडे, निर्माते सुनील फडतरे, प्रसिद्धी प्रमुख गणेश गारगोटे, कार्यकारी निर्माते रत्नकांत जगताप इत्यादी दिग्गजांनी या कार्यक्रमास हजेरी लावली.
ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी मराठी भाषेच्या उत्तुंगपणाची जोड सदर उपक्रमास देत, आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. वर्षा उसगावकरांनी ‘उत्तुंग मराठी’ च्या व्यवसायिकपणाचे कौतुक करत, अशा उपक्रमाच्या गरजेबद्दल आपले मत मांडले. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी महामंडळाचेच काम हि मंडळी करत आहेत आणि त्यांना माझ्याकडून आणि महामंडळाकडून अपेक्षित सहकार्य देण्याची ग्वाही दिली. पाटकर सरांनी श्री. रमेश शेट्टी यांच्या प्रयत्नांचे कौतूक करत त्यांच्या बद्दल असलेले व्यक्तिगत स्नेह सुद्धा प्रकट केले. अभिनेते विजय कदम यांनी सुद्धा आपल्या मिश्किल शैलीत उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
‘उत्तुंग मराठी’ तर्फे त्यांच्या उपक्रमाचे प्रोमोज सुद्धा यावेळेस दाखवण्यात आले. उत्तुंग मराठीच्या लोगो चे अनावरण आणि उत्तुंग मराठी स्फूर्तिगीत याचे सुद्धा प्रकाशन यावेळेस करण्यात आले. अनेक मंडळींना ‘उत्तुंग मराठी’ च्या कार्यकामाबद्दल उत्सुकता आहे आणि लवकरच मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी नवं नवीन उपक्रम उत्तुंग मराठीच्या युट्युब चॅनल वर दाखवण्यात येतील. अभिनेते संदीप पाठक आणि अभिनेत्री उर्मिला जगताप उत्तुंग मराठीचे ब्रँड अँबेसेडर आहेत.
No comments:
Post a Comment