Monday, 9 December 2019

‘फत्तेशिकस्त’ ला शालेय विद्यार्थ्यांचा दमदार प्रतिसाद

आपले भविष्य घडविण्यासाठी आपला वर्तमान सुरक्षित असणे गरजेचे असते. आपला गौरवशाली इतिहास पुढच्या  पिढीपर्यंत पोहचवायचा असेल तर त्याचं जतन आणि संरक्षण ही आपली जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची, शौर्याची गाथा पुढच्या पिढीला समजावी यासाठी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्तेशिकस्त’ चित्रपट शाळांतील विद्यार्थ्यांना दाखविण्यात येत आहे. राज्यभरातील असंख्य शाळांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. चौथ्या आठवड्यात ही चित्रपटाची जोरदार घोडदौड महाराष्ट्रभरात सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील हणमंतवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेने इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवला. ठाणे शहरातील युवाशक्ती ग्रुपने स्वामी विवेकानंद आश्रमयेऊर येथील ७० मुलांना हा चित्रपट दाखवला. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूल शाळेत शिकणाऱ्या सुमारे ६०० मुलांना हा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच मंगळवारी १० डिसेंबरला मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड पुणे यांनी आपल्या ८७५ विद्यार्थ्यासाठी ईस्क्वेअर टॉकीज येथे चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन केले आहे. या शाळांप्रमाणे इतर शाळांनी देखील यासाठी पुढाकार घेतला आहे.
या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळखशिवछत्रपती व त्यांचे अनेक पैलू यांचे दर्शन तर घडतेच तसेच त्यांच्या युक्त्यात्यांचे बुद्धीचातुर्य असे वेगवेगळे गुण फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला मिळत असल्याच्या भावना विद्यार्थी चित्रपट पाहिल्यानंतर व्यक्त करतायेत.
मराठेशाहीचा इतिहास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेच त्यासोबतच खूप रोमांचकथरारक आणि अभिमानास्पद आहे. शिवाजी महाराजांनी अल्पशा सैन्यबळाच्या जीवावर अनेक लढाया यशस्वी केल्या. या गोष्टी विद्यार्थ्याना कळेल अशा भाषेत सांगत खरा इतिहास त्यांना समजवून सांगण्याचा आमचा प्रयत्न विविध शाळांनी दिलेला प्रतिसाद पाहता सफल झाल्याच्या भावना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी बोलून दाखवल्या. या चित्रपटाच्या निमित्ताने सुपरमॅन, स्पायडरमॅनबॅटमॅन यांना सुपरहिरो मानणाऱ्या आजच्या लहानग्यांना छत्रपती शिवाजी महराजांच्या रूपाने रिअल सुपरहिरो' अनुभवायला मिळत आहे.

No comments:

Post a Comment