Friday, 13 December 2019

'नेहा खान'च्या अदांनी रंगणार 'युवा डान्सिंग क्वीन'चा मंच!!

शिकारी चित्रपटातील सगळ्यांची लाडकी अभिनेत्री नेहा खान आता 'युवा डान्सिंग क्वीन' या स्पर्धेच्या निमित्ताने 'झी  युवा' वाहिनीवर दिसणार आहे. याबद्दल तिच्याशी गप्पा  केल्या असता ती म्हणाली;
१. पहिल्या परफॉर्मन्ससाठी तू कुठला नृत्यप्रकार आणि गाणं निवडणार आहेस?
मी 'भोर भये पनघट पे' या माझ्याच गाण्यावर  नृत्य  सादर करणार आहे.  बॉलीवूड स्टाईलने हे सादरीकरण मी करेन. 
२. किती कालावधीनंतर तू पुन्हा एकदा नृत्य सादरीकरण करणार आहेस? पुन्हा नृत्याच्या मंचावर येण्याची आतुरता किंवा काही विशिष्ट भावना मनात आहे का?
जवळपास एक वर्षानंतर मी डान्स सादर करणार आहे. त्यामुळे आतुरता, भीती, धाकधूक अशा संमिश्र भावना माझ्या मनात आहेत. 
३. सोनाली आणि मयूर या दोघांपैकी, तुझा अधिक लाडका परीक्षक नक्की कोण आहे?
काही जणांना गोड खायला आवडतं, तर काहीजण तिखट खाणं पसंत करतात. मी मात्र, गोड आणि तिखट या दोन्ही  प्रकारच्या खाण्याची चाहती आहे, असं मी म्हणेन. अर्थात, सरळ सांगायचं झालं तर, दोघेही परीक्षक माझ्यासाठी तेवढेच लाडके आहेत.
४. एवढ्या मोठ्या मंचावर तुला परफॉर्मन्स द्यायचा आहे. याची तुझ्या मनात काही धाकधूक आहे का?
मला काही प्रमाणात स्टेज फिअर आहे, हे मी मान्य करते. पण, कोरिओग्राफी इतक्या उत्तमरित्या होते आहे, की माझी ही धाकधूक कमी होईल याचा विश्वास वाटतोय. 
५.  तुझ्या डान्स रिहर्सल दरम्यान होणाऱ्या गमतीजमती आणि तुझ्या कोरिओग्राफरबद्दल आम्हाला थोडंसं सांग. 
ओंकार सर आम्हाला नेहमीच खूप प्रोत्साहन देत असतात. आम्हाला  कंटाळा येऊ  नये, सरावातखंड  खंड पडू नये याची पुरेपूर काळजी ते घेतात. एखाद्या मुलाची आईवडिलांनी काळजी घ्यावी, तेवढ्या आपुलकीने ते आमच्याशी वागतात. आम्ही कुठेही कमी पडत असलो, एखादी स्टेप शिकण्यात अधिक अडचण येत असली, तर स्वतः  जातीने लक्ष घालून आम्हाला मदत करतात. 
आम्ही रिहर्सलदरम्यान खूप मजा करत असतो. कधी कधी मी आरशासमोर उभी राहून तयारी करत असताना कुणीतरी माझा विडिओ सुद्धा काढतं. मग माझं मलाच ती तयारी पाहताना हसू येतं. पण, या अशा घटना घडत असल्याने, रिहर्सलच्या  दरम्यान खूप सतर्क राहावं लागतं. 

No comments:

Post a Comment