सोनाली कुलकर्णी करणार 'युवा डान्सिंग क्वीन' च्या नृत्यांगनांचे परीक्षण!!!
तरुणाईच्या दिलाची धडकन, सगळ्यां ची लाडकी हिरकणी, म्हणजेच सोना ली कुलकर्णी, ही उत्तम अभिनेत् री आणि नर्तिका म्हणून आपल्याला ठाऊक आहेच.'झी युवा' वाहिनीवरी ल 'युवा डान्सिंगक्वीन' या कार् यक्रकामधून आता ती परिक्षकाच्या नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी मा रलेल्या या गप्पा
१. 'झी युवा'सोबत तू पुन्हा एकदा का म करते आहेस. तुझ्या भावना काय आहेत?
एखाद्या टीमसोबत पुन्हा एकदा का म करायची संधी मिळते तेव्हा खूप छान वाटतं. आपण चांगलं काम के लेलं असल्याची ती पावती असते. 'झी युवा'सोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 'अप्सरा आली' या कार्यक्रमापेक् षा निराळा असा हा कार्यक्रम करण्या ची संधी मिळणार आहे. एका वेगळ् या प्रयोगाचा मी भाग आहे याचा म नापासून आनंद आहे.
२. 'हिरकणी'नंतर पुन्हा एकदा तू प् रेक्षकांसमोर येणार आहेस. आता तु ला परिक्षकाच्या खुर्चीत बसायचे आहे. या भूमिकेविषयी काय सां गशील?
'युवा डान्सिंग क्वीन'बद्दल मी खूप उत्सुक आहे. अभिनय क्षेत्रा तून आपल्या सगळ्यांसमोर आलेल्या तारका, आता डान्सर म्हणून पाहा यला मिळणार आहेत. त्यांच्या 'री ल लाईफ'सोबतच, 'रिअल लाईफ' सुद्धा यातून पाहा यला मिळेल. वेगवेगळ्या रुपात दि सणाऱ्या या तारकांचा नृत्याविष् कार पाहणं, नक्कीच आवडेल. या सर्व स्पर्धकांकडून मलाही खूप काही शिकायला मिळेल अशी आशा आहे. परी क्षक म्हणून काम करायचा अनुभव म स्तच असेल, याची खात्री वाटते.
३. परीक्षण करत असताना, नेमके को णते मुद्दे तुझ्या दृष्टीने महत्त्वा चे असणार आहेत?
स्पर्धक त्यांच्या प्रवासात काय काय प्रयोग करतात, त्यांच्यात कशी सुधारणा होते हे माझ्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. सगळ्याच जणी उत्तम डान्सर्स आहेत. काहीं नी नृत्य शिकलेलं नाही, त्यांना या प्रवासात शिकायला मिळेल या ची खात्री आहे. स्पर्धक काय काय नवीन घेऊन येतात, याकडे सुद्धा माझं लक्ष असेल. जे स्पर्धक, या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहि ल्यांदाच मंचावर नृत्य सादर करणा र आहेत, त्यांचा 'अंडरडॉग ते स् टार' असा होणार असलेला प्रवास सु द्धा माझ्यासाठी महत्त्वाचा असे ल.
४. मयूर वैद्य तुझ्याबरोबरीने प रीक्षण करणार आहे. त्याच्यावि षयी काय सांगशील?
मयूर वैद्य हा माझा खूप लाडका मि त्र आहे. त्याच्यासोबत याआधी मी काम केलेलं आहे. तो एक अत्यंत गोड व्यक्ती आहे, हे आपल्याला स गळ्यांनाच माहीत आहे. सध्या शू टिंगला सुरुवात झालेली आहे. एकत्र काम करायला आम्हाला खूप मजा ये ते आहे. अर्थात, मयूर कथ्थकचा गु रू आहे, त्यामुळे त्याच्याकडून कथ्थक शिकायला सुद्धा मला खूप आ वडेल. शूटिंग सुरू झाल्यापासूनच इतकी मजा येत असल्याने, मयूर सो बत काम करत असताना आणखी काय काय अनुभवायला मिळेल याची मला उत् सुकता आहे.
५. या कार्यक्रमाची संकल्पना खा स आणि वेगळी आहे. त्याविषयी तु झं मत काय आहे?
स्पर्धकांना एकमेकींना वोटआऊट क रण्याची संधी या कार्यक्रमात मि ळणार आहे. ही या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची खासियत ठरेल. स् पर्धकांमध्ये चुरस आणि स्पर्धा तर असतेच, याशिवाय त्यांना एकमे कांकडून शिकायला मिळते, त्यांच् यात मैत्री होते. केवळ एखादा स् पर्धक आपल्यापेक्षा उजवा आहे, म्ह णून त्याला बाहेर काढण्याचा प् रयत्न न करता, खिळाडूवृत्तीने या वोटआऊटचा वापर त्या कशा करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. या सगळ्यामुळे पुढे नक्की के घडेल, हे परीक्षक म्हणून पाहणं सुद् धा रंजक ठरेल. आपण सगळेजण मिळून हा फॉरमॅट कसा हाताळू हे बघण् याची मला आता खूप स्तसूक्त आहे. याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट् यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतील. हा कार्यक्रम प्रेक्षकांनी अवश् य पहावा.
No comments:
Post a Comment