अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडीशन मार्गदर्शन कार्यशाळा मिनी थिएटर पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई येथे शनिवार १८/०१/२०२० रोजी सकाळी ११.०० ते ४.०० यावेळेत ‘सर्वांसाठी विनामूल्य’ आयोजित करण्यात आलेली आहे. सदर कार्यशाळेमध्ये
१. श्री. विवेक देशपांडे – दिग्दर्शक (सिरीयल फेम संभाजी, जयमल्हार, आभाळमाया)
२. श्री. अमोल गोळे – कॅमेरामन (चित्रपट नशीबवान, रंगापतंगा, स्टॅन्डली का डब्बा)
३. चैत्राली डोंगरे – कास्टिंग डिरेक्टर व सहकार्यवाह अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ (चित्रपट दगडी चाळ, तालीम, प्रियंका चोप्रा प्रस्तुत फायर ब्रँड)
४. सौ. आदिती देशपांडे अभिनेत्री (चित्रपट फेम जोगवा) व निर्माती (नॉट ओन्ली मिसेस राऊत)
५. श्री. अभय राणे – अभिनेते (सिरीयल अग्निहोत्र, संभाजी )
यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे. चित्रपटसृष्टीत करीअर करणाऱ्या नवोदितांसाठी ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरणार असून ऑडीशन कशी द्यावी ? ऑडीशनच्या नावाखाली होणारी सर्व प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. तरी सर्वांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment