Thursday 30 January 2020

Zee Yuva | Yuva Dancing Queen | गंगा वाढवतेय 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचाची शान

'झी युवा' वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्वैत आणि गंगा करत आहेत. अद्वैतप्रमाणेच गंगाचा सुद्धा मोठा चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. तृतीयपंथी असलेल्या गंगाला 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. गंगाची स्वतःची नवी ओळख निर्माण होऊ लागलेली आहे. याविषयी तिच्याशी केलेली ही खास बातचीत;
१. नृत्यकलेविषयी तुझं मत काय? नृत्यकला तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे?
नृत्यकला माझ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. नृत्यकलेमुळेच मला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. कुणालाही प्रणितबद्दल फार गोष्टी माहीत नव्हत्या. पण, प्रणित नावाचा एक डान्सर आहे, हे सगळ्यांना माहीत होतं. नृत्यामुळे मला स्वतःची ओळख निर्माण करता आली, म्हणूनच नृत्यकला माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. 
२. 'झी युवा'सोबत काम करण्याची संधी तुला कशी मिळाली?
याआधी अनेकवेळा मी वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी ऑडिशन दिलेली होती. यावेळी मात्र एक मजेशीर किस्सा घडला. 'ट्रान्सजेंडर सूत्रसंचालक हवा आहे' असा एक मेसेज मला आला. त्यात वाहिनीचा किंवा कार्यक्रमाचा उल्लेख मात्र केलेला नव्हता. मी यावेळी सुद्धा प्रयत्न करायचा असं ठरवलं, आणि पोर्टफोलिओ पाठवून दिला. मला लगेचंच स्क्रिप्ट कळवली गेली आणि भेटायला बोलावण्यात आलं. सगळ्याच घडामोडी अगदी वेगाने घडल्या आणि ही संधी मला मिळाली. 
३. 'युवा डान्सिंग क्वीन'मधील दोघांपैकी, तुझा अधिक आवडता परीक्षक कोण आहे?
मयूर आणि सोनाली, या दोघांचीही तुलना केली जाऊ शकत नाही. दोघांनीही खूप नाव मिळवले आहे. मयूर माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे, असे मी म्हणेन. सोनाली मंचावर अवतरली, की सगळ्यांचं भान हरपून जातं. दोघांचीही निराळी शैली आहे. माझ्यासाठी खरंतर दोघेही खूप जवळचे आणि लाडके आहेत. 
४. सूत्रसंचालक म्हणून या मंचावर तू वावरते आहेस. स्पर्धकांसोबत तुझी कशाप्रकारे गट्टी जमली आहे? तुझा सर्वात आवडता स्पर्धक कोण आहे?
सर्व स्पर्धकांसोबत माझं खास नातं आहे. सगळ्या स्पर्धकांची ओळख मी स्वतः करून दिलेली आहे, हे तुम्हाला माहीत असेल. स्पर्धेदरम्यान आमच्यातील नातं अधिक फुललं आहे. एखाद्या स्पर्धकासोबत टॉम आणि जेरीचं नातं, एखादीची खूप काळजी करणं, काहींसोबत खूप गोड मैत्री, अशी वेगवेगळी नाती सगळ्यांसोबत जोडली गेली आहेत. त्यामुळे, स्पर्धकांमधून एक फेवरेट निवडणं सुद्धा अशक्य आहे.  
५. अद्वैत दादरकरसोबत काम करण्याचा तुझा अनुभव व त्याच्याविषयी काही गोष्टी आम्हाला सांग. 
अद्वैत दादरकर 'युवा डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमाची जान आहे, असं सगळेच जण म्हणतात. माझंही याबाबतीत दुमत नाही. सूत्रसंचालक म्हणून काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. एवढ्या मोठ्या मंचावर, एका मोठ्या कलाकारासोबत मला काम करायला मिळत आहे, हे माझे भाग्य आहे. अद्वैतकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्याची विनोदबुद्धी अप्रतिम आहे. सूत्रसंचालक म्हणून कार्यक्रम  खुलवण्याची खुबी त्याच्याकडे आहे. 

बुधवार ते शुक्रवार, रात्री ९.३० वाजता, 'झी युवा'वर तुम्हाला माझे आणि अद्वैतचे खुमासदार सूत्रसंचालन अनुभवता येईल.

1 comment:

  1. HELLO GET OUT OF FINANCIAL MESS WITH THE HELP OF drbenjaminfinance@gmail.com

    I have been in financial mess for the past months, I’m a single mum with kids to look after. My name is REBECCA MICHAELSON, and am from Ridley Park, Pennsylvania. A couple of weeks ago My friend visited me and along our discussion she told me about DR BENJAMIN OWEN FINANCE of drbenjaminfinance@gmail.com that he can help me out of my financial situation, I never believed cause I have spend so much money on different loan lenders who did nothing other than running away with my money. She advised, I gave it a try because she and some of her colleagues were rescued too by this Godsent lender with loans to revive their dying businesses and paying off bills. so I mailed him and explain all about my financial situation and therefore took me through the loan process which was very brief and easy. After that my loan application worth $278,000.00USD was granted, all i did was to follow the processing and be cooperative and today I am a proud business owner sharing the testimony of God-sent Lender. You can as well reach him through the Company WhatsApp +19292227023 Email drbenjaminfinance@gmail.com

    THANK YOU VERY MUCH

    ReplyDelete