India is not only agricultural country but also the country known for many scripts- Achyut Palav
Noted cartoonist and Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray inaugurated the exhibition of depicting four-decade-old calligraphic journey of Achyut Palav, credited with making calligraphy known in India and abroad, and also released his book “‘Letterospective” in English at Jehangir Art Gallery, Kalaghoda at Fort in South Mumbai. Besides Thackeray and Palav, Anil Gala of Navneet Publications was present.
The exhibition begins with calligraphic painting showing Suvichar”(good thoughts) and it ends with calligraphic painting of zero. The boards, banners, hoardings, nameplates, paper, canvass, walls of interior can be seen in this exhibition. Besides the documents, coins and tools received while studying Modi” language (an ancient variation of the Devanagari) are on display in the exhibition.India is not only agricultural country but is known also for its many scripts.
With a view to expose the creative and artistic form of these scripts and to ensure dialogues, the “Boru Akasharayan” (an optical character recognition engine for Indian languages using “Boru”(wooden writing instrument) was created. With an aim to expose visitors to different Indian and global scripts, a focus is on “Aksharyan 2020”. For this, 13 feet tall “3 D Boru” has been created and traditional “Borus” have been branded as “Aksharyan” and linked to main scripts (Devnagari, Gurumukhi, Gujarathi, Kannada, Telugu, Malyalam, Urdu, Bengali)
The exhibition shows the beginning of this art form in India, its progress till now not only in India and abroad and the people’s response.
While speaking about Achyut Palav’s four-decade-old calligraphic journey Raj Thackeray said that “I have seen his four decade old journey from close quarter. Today whatever he is, is because of his efforts and consistency. The work he has done till now is unparalleled. The work done on computer cannot be compared with the work done by hand. The original is original”. Thackeray gave him well wishes for his future endeavours. He also said that “my hand writing is good and credit for that goes to my father and uncle Balasaheb Thackeray. Even by grandfather used to sign in “Modi” language.
Achyut Palav said that the exhibition has been organised to make people known my four-decade-old journey in calligraphic. The intention behind the release of book “‘Letterospective” is that it should be useful to future generation. The artists should introduce variety in work and reach it up to people. I always try to do this and make attempt to do new experiments in calligraphy. I have presented calligraphy with a fusion of music, dance, rain and wind. The calligraphy gave me recognition not only in India but also abroad. I would like to advise present generation that the success is not easy and constant efforts are needed to achieve success. The success is assured if one works with dedication. India is not only agricultural country but is also known for its many scripts.
Palav’s journey with calligraphy began when Parel’s Dr Shirodkar High school entrusted him the responsibility to write “Suvichar” (Best Thoughts) on the school board in 1973. As the days advanced, “Calligraphy” became more matured and he was credited with taking calligraphy to a broader spectrum of people in India and abroad. In 40 years span from 1973 to 2019, he created different letterings, scripts in different mediums. He founded “Achyut Palav School of Calligraphy” and also organised several editions of “Callifest”, the festival which gives a forum to calligraphists. He also began felicitating the calligraphers with “Callihunt” award.
Till now he has published over 10 books related to the calligraphy. Several countries including Netherlands, Germany, London, China, Dubai, Algeria, Korea, France and Russia, have taken note of his workshops, lectures and demonstrations.
His calligraphic work finds place in many libraries and museums including: Stiftung Archives,Germany, Klingspor Museum, Germany, The Academy of Arts (German: Akademie der Künste), Berlin, Armenian Consulate, Societe General, Paris, France and Contemporary Museum of Calligraphy, Moscow, Russia.
The exhibition will be open for all between 11 AM and 7 PM till 27 January 2020 at Jehangir Art Gallery, Kalaghoda. Besides, there will be live demonstration by Achyut Palav between 11 AM and 11.30 AM on 26 January, Republic Day.
भारत देश हा नुसता शेती प्रधान नसून लिपी प्रधानही आहे – अच्युत पालव
भारतातच नव्हे तर परदेशात भारतीय सुलेखन कलेची ओळख करून देणारे प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या चार दशकातील कॅलिग्राफी प्रवासाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व `लेटरोस्पेक्टिव्ह' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या हस्ते जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे करण्यात आले. या प्रसंगी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, अच्युत पालव आणि नवनीत प्रकाशनचे अनिल गाला उपस्थित होते.
या प्रदर्शनाची सुरुवात सुविचारच्या कॅलिग्राफी पेंटिंग ने केलीअसून शेवट शुन्य या कॅलिग्राफी पेंटिंगने केली आहे. या प्रदर्शनात फळा, बॅनर, होर्डिंग, नेमप्लेट पासून ते पेपर, कॅनव्हास, इंटेरिअरमधल्या भिंती अशा अनेक माध्यमांबरोबर मोडी लिपीचा अभ्यास करताना मिळालेली कागदपत्रं काही नाणी आणि सुलेखनासाठी वापरलेली साधने असे बरेच काही या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहे. भारत देश जसा शेतीप्रधान आहे तसा लिपीप्रधान सुद्धा आहे. या लिप्यांचे सुंदर आणि कलात्मक रूप जगभर पोहोचविण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी या बोरूरुपी अक्षरयानाची या प्रदर्शनात निर्मिती केली आहे. यानिमित्ताने जगाशी संवाद साधून भारतीय लिप्यांचे रुप जगाला पाहावयास मिळण्यासाठी `अक्षरयान २०२०' ही संकल्पना प्रदर्शनात वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. यासाठी "१३ फुटांचा ३डी बोरू"ची निर्मिती करून प्रदर्शनात ठेवण्यात आला असून पुर्वापार अक्षरे लिहिण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या बोरूला अक्षरयानाची उपमा देऊन देशातील मुख्य लिप्या (देवनागरी, गुरुमुखी, गुजराती, कन्नड, तेलुगू, मल्याळम, उर्दु, बंगाली) जोडण्यात आल्या आहेत. यात ते त्यांच्या कलेची सुरुवात व आजवरचा प्रवास तसेच भारतातच नव्हे तर परदेशात हि लोकांनी या कलेला दिलेला प्रतिसाद या सर्वच गोष्टीचा उलगडा या वेळी केला आहे.
यावेळी राज ठाकरे अच्युत पालवांच्या चार दशकातील कॅलिग्राफी प्रवासाबद्दल बोलताना म्हणाले, अच्युत पालवांचा आजवरचा प्रवास मी जवळून पाहिला आहे. आज जे ते आहेत ते त्यांच्या मेहनत आणि चिकाटीमुळेंच, त्यांनी आजवर जे काम केले आहे त्याला तोड नाही. कम्प्युटरच्या कामाला हातांच्या कलाकृतीची सर नसते, ओरिजनल ते ओरिजनल असते. अशा शब्दात राज ठाकरे यांनी त्यांचे वर्णन करत त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. तसेच ते म्हणाले माझेही अक्षर सुंदर आहे त्यामागे माझे वडील व माझे काका बाळा साहेब ठाकरे यांचा हात आहे. माझ्या आजोबांची सही ही मोडिलिपीतच होती.
अच्युत पालव यावेळी म्हणाले, माझा आजवरच्या चाळीस वर्षाचा कॅलिग्राफीचा प्रवास लोकांपर्यंत पोहचावा यासाठी मी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. लेटरोस्पेक्टिव्ह पुस्तकाचे प्रकाशन करण्यामागचा उद्देश हाच आहे की, पुढील पिढीला कॅलिग्राफीचा ठेवा उपलब्ध व्हावा. कलाकारांनी आपल्या कलेमध्ये नेहमी विविधतता आणून लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे व यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो त्यासाठी मी कॅलिग्राफी मध्ये नवनवीन प्रयोग करत असतो. मी कॅलिग्राफी आणि संगीत, डान्स, पाऊस, वारा इत्यादींचे फ्युजन करून कॅलिग्राफी सादर केली आहे. या कलेने मला भारतातच नवे तर परदेशात ही नवी ओळख करून दिली. मी आजच्या पिढीला सांगू इच्छितो की, यश पटकन मिळत नसते त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. चिकाटीने काम केल्यावर यश निश्चित मिळतेच, तसेच ते पुढे म्हणाले की, भारत देश हा नुसता शेती प्रधान देश नसून लिपी प्रधानही आहे.
या कलेची सुरुवात १९७३ साली परेलच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये फळ्यावर सुविचार लिहिण्यापासून झाली व नंतर ती उत्तरोउतर प्रगल्भ होत गेली .१९७३ ते २०१९ या ४० वर्षाहून अधिक काळ वेगवेगळी अक्षरं, लिप्या वेगवेगळ्या माध्यमातून मांडली, त्यांनी अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीची स्थापना केली व सुलेखन महोत्सवाच्या आवृत्त्यांचे आयोजन केले. कॅलिफेस्ट भारतीय लिप्यांचा उत्सवाचे आयोजन करून भारतातील सुलेखनकारांना एक व्यासपीठ देऊन "कॅलीहट " हा पुरस्कार देऊन सुलेखनकारांचा गौरव करण्यास सुरुवात केली. त्यांची आजपर्यंत १० पेक्षा अधिक पुस्तक प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या कार्यशाळा, व्याख्याने आणि प्रात्यक्षिके याची दाखल नेदर्लंड्स, जर्मनी, लंडन, चीन, दुबई, अल्जेरिया, कोरिया, फ्रान्स रशिया आदी देशांमध्ये घेतली आहेत. त्यांची कॅलिग्राफी पेन्टिंग स्टीफटंग संग्रह, जर्मनी, क्लिंग्सपोर म्युझियम, जर्मनी अकेडेमिक डेर कुएन्स्टे, बर्लिन, अमॅनियन वाणिज्य दूतावास, सोसायटी गॅनराले पॅरिस, फ्रान्स आणि युरोपियन समकालीन संग्रहालय ऑफ कॅलिग्राफी, रशिया इथे संग्रहित आहेत.
हे प्रदर्शन दिनांक २१ ते २७ जानेवारी २०२० या कालावधीत सकाळी ११ ते ७ या वेळेत जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे. तसेच भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते ११:३० या वेळेत अच्युत पालव स्वत: प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.
No comments:
Post a Comment