Monday, 27 January 2020

Shri Manish Desai assumes charge as Director General (West Zone), Ministry of I&B - माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्राचे महासंचालक म्हणून मनीष देसाई यांनी पदभार स्वीकारला

Senior Indian Information Service Officer Manish Desai today assumed charge as the Director General West Zone of the Ministry of Information and Boadcasting in the office of Press Information Bureau, Mumbai. Immediately prior to this he was holding the post of Registrar of Newspapers of India in New Delhi. 
 As DG West Zone, Manish Desai will lead the central government communication set up in the West Zone looking after the functioning of Press Information Bureau (PIB) and Bureau of Outreach Communication (BOC) offices in the states of Maharashtra, Goa, Gujarat, Rajasthan, Madhya Pradesh, and Chhattisgarh.
 An officer of 1989 batch of IIS, Manish Desai during his career spanning nearly three decades has worked in various media units of the Ministry of I&B, like DAVP, AIR News, Prasar Bharati, and the Indian Institute of Mass Communication.
Earlier, Shri Desai had worked for nearly a decade in PIB Mumbai as Director and Addl.Director General looking after government communication. He was also the DG, Films Division during 2016-18. 

मुंबई, 27 जानेवारी 2020 
भारतीय माहिती सेवा या सेवेचे ज्येष्ठ अधिकारी मनीष देसाई यांनी आज पत्र सूचना कार्यालय मुंबई येथे माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्राचे महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याआधी ते नवी दिल्लीत रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स ऑफ इंडिया म्हणजेच आरएनआय या पदी कार्यरत होते.
पश्चिम विभागाचे महासंचालक म्हणून मनीष देसाई पश्चिम भारतातल्या संपर्क यंत्रणेचे कामकाज बघतील. या अंतर्गत, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातल्या पत्र सूचना कार्यालय आणि ब्यूरो ऑफ आऊटरिच कम्युनिकेशन-बीओसी विभागाचे प्रमुख म्हणून ते काम पाहतील.
1989 च्या आयआयएसच्या तुकडीचे अधिकारी मनीष देसाई यांनी आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध कार्यालयांमध्ये जबाबदाऱ्या पार पाडल्या.  यात डिएव्हीपी, आकाशवाणी, प्रसार भारती आणि भारतीय जनसंपर्क संस्था यांचा समावेश आहे.
याआधी देसाई यांनी जवळपास एक दशक पीआयबी मुंबईचे संचालक आणि अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम पाहिले. 2016-18 या कालावधीत त्यांच्याकडे फिल्म्स डिव्हिजनच्या महासंचालक पदाचाही कार्यभार होता.

No comments:

Post a Comment