सर्वांची लाडकी 'झी युवा' वाहिनी, प्रेक्षकांसाठी नेहमीच आकर्षक असे, निराळ्या ढंगाचे कार्यक्रम घेऊन येत असते. संगीताचा कार्यक्रम म्हणजे स्पर्धा, हे समीकरण बाजूला सारून, असाच एक आगळावेगळा, झकास कार्यक्रम वाहिनीने सध्या आपल्या भेटीला आणला आहे. 'मेहफिल'च्या माध्यमातून, संगीतक्षेत्रातील कलाकारांशी गप्पा मारणे आणि अर्थातच त्यांच्या कलेचा आस्वाद घेणे शक्य झाले आहे. क्रांती रेडकर यांच्या अप्रतिम सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढते. दर आठवड्याला एक नवा कलाकार, 'मेहफिल'मधून आपल्या भेटीला येतो. हा आठवडा रंगला, तो 'नवीन पोपट हा' फेम आनंदजी शिंदे यांच्या सोबतीने!!
मेहफिलच्या मंचावर आनंदजी अवतरल्यावर 'नवीन पोपट हा' हे गाणं सादर झालं नसतं तरच नवल! मराठी संगीत विश्वातील हे एक 'एव्हरग्रीन' गाणं आहे. आजच्या काळात सुद्धा, सर्व युवा वर्ग या गाण्यावर थिरकत असलेला पाहायला मिळतो. कार्यक्रमाच्या सेटवर सुद्धा हेच पाहायला मिळालं. या धमाकेदार गाण्याच्या अनेक आठवणी सुद्धा आनंदजींसाठी महत्त्वाच्या आहेत. गप्पांमध्ये ते या आठवणींमध्ये रमून गेलेले पाहायला मिळाले.
याविषयी बोलताना, आनंदजी म्हणाले;
"मी आजवर ज्यावेळी 'नवीन पोपट हा' हे गाणं गायलं आहे, त्यावेळी सगळ्यांनाच गाण्यावर थिरकताना पाहिलेले आहे. वाद्यवृंदातील कलाकार सुद्धा या गाण्याची साथ करत असताना डोलत असतात. पण, मी जेव्हा पहिल्यांदा हे गाणे सादर केले, त्यावेळी लोकांचे विचार निराळे होते. मी अशाच पठडीतील गाणी गाणारा गायक आहे, असा शिक्का लागला. त्यामुळे माझी इतर गाणी हिट होणार नाहीत असं अनेकांचं म्हणणं होतं. अर्थातच, तसं झालेलं नाही, हे आज आपण सगळेच पाहत आहोत."
अशाच दर्जेदार कलाकारांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या गप्पा ऐकण्यासाठी पाहत रहा, 'मेहफिल', सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर!!!
No comments:
Post a Comment