झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिं ग क्वीनच्या निमित्ताने सध्या गं गा हे नाव भरपूर चर्चेत आहे. या कार्यक्रमात सूत्रसंचालनात अद्वैतला साथ देणारी ‘गंगा’ तृतीयपंथी असून मराठी मालिका विश्वात पहिल्यांदा एका तृतीयपंथी व्यक्तीला सूत्रसंचालनाची संधी मिळाली आहे.गंगाचं खरं नाव प्रणीत हाटे आहे. झी युवा च्या व्यासपीठामु ळे गंगा आज महाराष्ट्राच्या घरा घरात पोहोचली आहे. मात्र तिचा प्र णित ते गंगापर्यंतचा प्रवास नक् कीच सोपा नव्हता. गंगा ला लहा नपणापासून जे भोगावं लागलंय ते खरं तर विकृत आणि असंवेदनशील आहे डान्सिंग क्वीनच्या मंचावर बो लताना तिने आपला हा खडतर प्रवास बोलून दाखवला. आपला हा प्रवास सांगताना ती खूप भावूक झालेली प हायला मिळाली.
“हाटे कुटुंबात पहिला मुलगा जन् माला आला तो मीच. जन्माला मुलगा आला पण तो आत्मा एका मुलीचा हो ता. मला लहानपणापासून एक सुंदर मुलगी होण्याची इच्छा होती. मा झ्या वागण्याबोलण्यात ते दिसा यचं त्यामुळे मी बाहेर कधी मुलां मध्ये खेळायला जायची तेव्हा हा बायल्या आहे असं सगळेच चिडवायचे . माझ्यासोबत कोणीही राहायचंही नाही. शाळेत जेव्हा मला टॉयले टला जायचं असायचं तेव्हा मधल्या सुट्टीत मला जायला मिळायचं ना ही . तेव्हा क्लास सुरु असतानाच जावं लागायचं., तेव्हाही गेल् यानंतर माझी फार वाईट अवस्था व् हायची कारण क्लास सुरु असताना टॉ यलेटला जाण्यासाठी हात वर केला की अजून दोन तीन मुले मुद्दाम हा त वर यायचे आणि माझ्या मागे या यचे आणि ... हे सर्व त्या वया त खरंच खूप तणाव निर्माण करणा रं होतं. पण मी ते कधी घरच्यां ना जाणवू दिलं नाही. कारण मला मा झ्यासोबत हे नेमकं काय सुरु आहे हेच मला माहिती नव्हतं,” हे सर्व सांगताना गंगाच्या डोळ्यातून अ श्रू वाहत होते. फक्त आपण जे का ही वागत आहोत त्याला बायल्या म् हणतात इतकंच कळत होतं. मोठा झा ल्यावर एका कार्यक्रमात मी साडी घालून नृत्य केलं तेव्हा तर मा झ्यावर तू फक्त साडी घालण्याच् या लायकीचा आहे अशा कमेंट माझ् यावर करण्यात आल्या. आज झी युवा च्या व्यासपीठावर मी मानाने सां गते , हो मी साडी नेसण्यास तयार आहे. कारण माझ्यात तेवढी हिंमत आहे, आज माझ्या कुटुंबाचा आणि युवा डान्सिंग क्वीन च्या व्या सपीठाचा पाठिंबा मिळाल्याने गं गा आज इतक्या खंबीरपणे उभी आहे. मात्र भारतात असे कित्येक प् रणित आणि गंगा आहेत ज्यांना ना त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा ना ही ना समाजात मान दिला जात ना ही अशी खंतही गंगा ने बोलून दा खवली.
झी युवा वाहिनीवर दर बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता ला गणाऱ्या युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमात पहिल्यांदा एका तृ तीयपंथीला तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर शो होस्ट करण्यासारखं मानाचं स्थान दिले आहे . झी यु वाने आज नवीन विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे , महाराष्ट्रा तील प्रेक्षक या नवीन विचारला यो ग्य ती साथ देतील अशी झी युवा या वाहिनीची अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment