११ अभिनेत्री आणि १ गाणं... नवीन सुरुवात करण्यासाठी ‘घे उंच भरारी’
‘लॉकडाऊन’ हा शब्द जरी उच्चारला तरी अनेकांच्या चेह-यावरील भाव क्षणात बदलतील इतका त्यांनी लॉकडाऊनचा अनुभव घरीबसल्या घेतला आहे. “जणू आयुष्यंच थांबलंय असं वाटायला लागलंय”, अशा काव्यात्मक भावना आपल्यापैकी अनेकांनी शब्दांत मांडल्या असतील. पण असेही काही जण आहेत, ज्यांनी लॉकडाऊनमध्ये अनेक स्वप्नं रंगवली, ती पूर्ण कशी करायची याचा विचार केला, काही जणांनी तर आपल्या अंगी असलेली कला जोपासली, प्रत्येकांमध्ये दडलेला कलाकार बाहेर आला, एक नवीन, फ्रेश सुरुवात कशी करता येईल याचे प्लॅनिंग सुरु केले, आयुष्य नव्या उमेदीने जगण्याची उमेद निर्माण केली अशा सर्वांसाठी रेडबल्ब म्युझिकचे ‘घे उंच भरारी’ हे नवीन प्रेरणादायक, फ्रेश गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
‘घे उंच भरारी’ हे केवळ एक गाणं नसून एक सेलिब्रेशन आहे... असं सेलिब्रेशन जे नवीन प्रवासाचा, उंच भरारी घेण्याचा, नवे स्वप्न पाहण्याचा आणि ते पूर्ण करण्यासाठी घेतलेला ध्यास याचा आनंद व्यक्त करेल. या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यातून आपल्या ११ मराठी अभिनेत्रींनी आपल्या सर्वांचा मूड चिअर अप करण्यासाठी एक छानसा प्रयत्न केला आहे. प्रार्थना बेहरे, सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, ऋतुजा बागवे, स्वप्नाली पाटील, प्राजक्ता माळी, संस्कृती बालगुडे, पल्लवी पाटील, भाग्यश्री लिमये, मयुरी देशमुख, सायली संजीव या अभिनेत्रींनी आपापल्या घरी राहून या गाण्याचे शूटिंग अतिशय सुंदर पध्दतीने केले आहे.
या गाण्याचा गायक आणि संगीतकार केवल वाळंज याने त्याच्या आवाजाने आणि संगीताने मनाला बेधुंद केले आहे. तसेच विपुल शिवलकर यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द एक वेगळीच एनर्जी देऊन जातात. रेडबल्ब मुव्हिज प्रा. लि. निर्मित या गाण्याचे एडिटिंग अभिषेक जावकर यांनी केले असून ही युनिक कन्सेप्ट देखील त्यांचीच आहे.
लॉकडाऊनमध्येही ११ अभिनेत्रींचा फ्रेश परफॉर्मन्स, मूड चार्ज अप करणारं गाणं-म्युझिक आणि विशेष म्हणजे आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, ध्येयाला सेलिब्रेट करायला लावणारं हे गाणं पाहून तुम्ही देखील म्हणाल... ‘घे उंच भरारी’!!!
Here's the link of video song- https://youtu.be/4Yu9_ NxCJAk
No comments:
Post a Comment