Wednesday, 3 June 2020

Zee Marathi - New Show 'Gharat Basle Sare'


आता बदललेत वारे कुटुंबासोबत पाहूया ‘घरात बसले सारे’
/
रामदास पाध्ये घेऊन येत आहेत ‘घरात बसले सारे’
/
लॉकडाऊन मध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झी मराठीवर बोलक्या बाहुल्यांची धमाल मालिका घरात बसले सारे’
लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद आहेत्यामुळे मालिकांचे जुने भागजुन्या काही मालिकांचं पुनःप्रक्षेपण आणि पूर्वीचे पुरस्कार सोहळे यांचं प्रक्षेपण सध्या वाहिन्यांवर होत आहेपण आता प्रतीक्षा संपली कारण महाराष्ट्राची महावाहिनी झी मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे मर्यादित भागांच्या नवीन मालिका आणि रिऍलिटी शोजलॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाचे काही क्षण देण्यासाठी हे कार्यक्रम सज्ज झाले आहेत.
रामदास पाध्ये म्हटलं कि आपल्याला आठवतात ते बोलके बाहुले अर्धवट राव, आवडा अक्का आणि त्यांच्या गमती जमतीआता  हेच ‘अर्धवट राव आणि आवडा अक्का, त्यांचा मुलगा चंदन, सून सुनयना आणि नातू छोटू सिंग सोबत घेऊन येत आहेत एक नवा कोरा कार्यक्रम ‘घरात बसले सारे’. या कार्यक्रमाबद्दल बोलताना रामदास पाध्ये म्हणाले, "मी देश विदेशात या बाहुल्यांचे अनेक प्रयोग केलेपण डेली सोप मध्ये असा प्रयोग कधीच केला नव्हतापण आता मी माझ्या बोलक्या मित्रांसोबत (मी त्यांना बाहुले म्हणणार नाही कारण ते माझे मित्रच आहेतएक वेगळा प्रयोग करणार आहेया लॉकडाऊन मध्ये हा कार्यक्रम साकारताना माझ्या फॅमिलीची म्हणजेच अपर्णा पाध्येसत्यजित आणि ऋजुता पाध्ये यांची खूप मदत झालीसत्यजितने या बाहुल्यांना आवाज तर दिलाच पण त्याचसोबत या कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळलीतसंच ऋजुता पाध्ये यांनी या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाची जबाबदारी घेतली आहेया  मालिकेत चंदन आणि सुनयना यांच्यातील तू तू मै मै आणि त्यांच्या जीवनात घडण्याऱ्या मजेशीर गोष्टी या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळतीलया मालिकेचं खास आकर्षण म्हणजे छोटू सिंगचं रॅप सॉंग आणि त्याच्या गमती जमती असणार आहेत."
घरात बसले सारे हा बोलक्या बाहुल्यांचा धमाल कार्यक्रम  जून पासून संध्या वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

No comments:

Post a Comment