Wednesday, 18 November 2020

Zee Yuva | Tuz Maz Jamtay | रोशन आहे मिश्किल चकली - अपूर्वा नेमळेकर

तुझं माझं जमतंय हि मालिका नुकतीच झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि सुरुवाती पासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून टीव्ही माध्यमात पुनरागमन केलं त्यामुळे तिला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळतंय याचा आनंद प्रेक्षकांना आहे. अपूर्वा सोबतच रोशन विचारे आणि मोनिका बागुल या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेचं शूटिंग नगरमध्ये चालू आहे. 
दिवाळी हा सण सध्या महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरा केला जातोय. लाडू, चकली, शंकरपाळी, अनारसे या दिवाळीच्या फराळातील काही पदार्थांची नावं जरी घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं. पण असा एक पदार्थ असतो जो आपला सगळ्यात जास्त फेव्हरेट असतो. रोशन या अपूर्वाच्या सह कलाकाराला कुठल्या फराळातील पदार्थाची उमप देशील असं विचारलं असताना अपूर्वा म्हणाली, "तुझं माझं जमतंय या मालिकेत रोशन माझा सह-कलाकार आहे. एकत्र काम करताना आमच्या लक्षात आलं की, आमचे स्वभाव खूप सारखे आहेत. रोशनच्या स्वभावात एक लोभस मिश्कीलपणा आहे. म्हणून फराळातील चकलीची उपमा मला त्याला द्यावीशी वाटते. दिवाळीतील गोड पदार्थात चकली हा एकच सर्वांचा लाडका तिखट पदार्थ असतो. तसाच रोशन सेटवर सर्वांचा लाडका आहे."

No comments:

Post a Comment