Friday 27 November 2020

Zee Yuva | Tuz Maz Jamtay | फावल्या वेळात सेटवर रोशनला आवडतं 'घोड़े बेचकर सोना'

तुझं माझं जमतंय हि मालिका नुकतीच झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि सुरुवाती पासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून टीव्ही माध्यमात पुनरागमन केलं त्यामुळे तिला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळतंय याचा आनंद प्रेक्षकांना आहे. अपूर्वा सोबतच रोशन विचारे आणि मोनिका बागुल या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेचं शूटिंग नगरमध्ये चालू आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वच कलाकार आपल्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. आपले फोटोज आणि व्हिडीओजसोबतच कलाकार चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतात. पम्मी म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अपूर्वा सेटवर ऑफ कॅमेरा काय चालू असतं हे दाखवतेय आणि मेकअप रूममध्ये मालिकेतील नायक म्हणजेच अभिनेता रोशन विचारे हा झोपला आहे. दिवसभर शूटिंग केल्यानंतर सेटवर फावल्या वेळात कलाकार एक पॉवर नॅप घेतात. त्यामुळे अपूर्वा रोशनच्या नॅपबद्दल चाहत्यांना व्हिडीओमध्ये म्हणाली याला म्हणतात 'घोड़े बेचकर सोना'. 'तुझं माझं जमतंय' या मालिकेच्या सेटवर हे सर्व कलाकार करत असलेली मजा मस्ती प्रेक्षकांना सोशल मीडियाद्वारे पाहायला मिळतेय.

No comments:

Post a Comment