Monday 1 March 2021

Zee Yuva - Dr Don

 डॉक्टर डॉनच्या सेटवर 'बोरं पावरी चल रही है'

झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मिडीयावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय.
डॉक्टर डॉनच्या सेटवर कलाकारांची धमाल हि चालूच असते. ऑनस्क्रीन हे कलाकार जेवढा कल्ला करतात तितकंच ऑफस्क्रीन देखील त्यांची मस्ती चालू असते. सध्या सोशल मीडियावर चालत असलेल्या 'पावरी चल रही है' या ट्रेंडला अनुसरून देवदत्त नागे याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सेटवरच्या आवारात असलेल्या बोराच्या झाडावरून डॉक्टर डॉनची टीम बोरं काढतेय. यावर देवदत्त नागेने "ये हम है, ये हमारी शूटिंग कि पोरं है, और ये हमारी बोरं कि पावरी चल रही है" असं म्हणत देवदत्तने हा व्हिडीओ शेअर केला आहे. नुसतं मालिकेतूनच नाही तर हे कलाकार प्रत्येक माध्यमातून प्रेक्षक आणि चाहत्यांच मनोरंजन करत असतात असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांमध्ये एकच हास्याची लहर उठली आहे. या धमाल व्हिडिओवर प्रेक्षक-चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

No comments:

Post a Comment