Tuesday 23 March 2021

Zee Yuva - Dr. Don

 हा आहे देवाचा स्क्रिप्ट रिडींगचा इंटेन्स लुक

झी युवा वरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मिडीयावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय.
प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की एकीकडे मोनिका आणि विक्रांतच्या लग्नाची लगबग चालू आहे आणि दुसरीकडे देवाचा सगळे शोध घेत होते. मालिकेत देवाची रिएन्ट्री झाली आणि मालिकेने पुन्हा एक रंजक वळण घेतलं. देवा आणि मोनिका यांच्या प्रेमकथेचं पुढे काय होणार हे तर प्रेक्षकांना आगामी भागातच कळेल. पण देवा म्हणजेच देवदत्त नागे त्याच्या सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांसोबत कनेक्टेड आहे. मालिकेत रिएन्ट्री झाल्यावर त्याच्या स्क्रिप्ट रिडींगचा फोटो त्याने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. "स्क्रिप्ट... रिडींग बिटवीन द लाईन्स" असं त्याने कॅप्शन मध्ये म्हंटल आहे. त्याचा हा इंटेन्स लूक चाहत्यांना मात्र खूपच भावला आहे. देवाची रिएन्ट्री झाल्यावर मात्र चाहत्यांची उत्सुकता देखील वाढली आहे.    

No comments:

Post a Comment