Thursday 25 March 2021

Zee Yuva - Tuza Maza Jamtay

 

पम्मी आणि आशुच्या झकास फोटोवर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव
मंजुळा हि भूमिका साकारल्यानंतर तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रतिक्षा जाधव आता झी युवा वरील लोकप्रिय मालिका तुझं माझं जमतंय मध्ये पम्मीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. नुकतीच या मालिकेत प्रतिक्षाची एंट्री झाली. तिच्या या भूमिकेवर देखील प्रेक्षक फिदा आहेत. या मालिकेतील आशु, पम्मी आणि शुभू या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. पम्मीची आशु आणि शुभूसोबत ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी छान आहे टीकेची त्यांची मैत्री ऑस्क्रीन सुद्धा घट्ट आहे. आशु म्हणजेच मोनिका आणि प्रतीक्षा यांची सेटवर खूप छान गट्टी जमली आहे. म्हणूनच प्रतिक्षाने तिच्या सोशल मीडियावरून तिचे आणि मोनिका हिचे काही फोटोज आपल्या सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. त्यांच्या या झकास फोटोवर प्रेक्षक आणि चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्यांची हि मैत्री प्रेक्षकांना देखील खूप भावली आहे.  

No comments:

Post a Comment