Friday 7 May 2021

&TV | मातृ दिनानिमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील मालिकांमध्‍ये पाहा आई-मुलांचे आंबट-गोड नाते

आई सत्‍यता, प्रेम व प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे. तिची जागा इतर कोणीच घेऊ शकत नाही आणि याच कारणास्‍तव एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार या नात्‍याशी खूप जुडलेले आहे. मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील कटोरी अम्‍मा (हिमानी शिवपुरी) व दबंग राजेश (कामना पाठक) आणि मालिका 'और भई क्‍या चल रहा है?'मधील सकिना मिर्झा (आकांशा शर्मा) व शांती मिश्रा (फरहाना फतेमा) पडद्यावरील व पडद्यामागील त्‍यांच्या अनोख्या व हळव्‍या मातृत्‍व नात्‍यांच्‍या महत्त्वाबाबत सांगत आहेत. हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्‍मा म्‍हणाल्या, ''कटोरी अम्‍मा हट्टी, बिनधास्‍त महिला आहे, जिची स्‍वत:ची अनोखी मोहकता आहे. इतर आईसारखीच ती हप्‍पूप्रती (योगेश त्रिपाठी) खूप दयाळू व प्रेमळ आहे आणि नेहमीच त्‍याच्‍या आरोग्‍याची काळजी घेते. हप्‍पूच्‍या गालावर अम्‍माजीची चपराक बसली नाही तर काहीसे वेगळेच वाटते, पण म्‍हणतात ना, आईच्‍या रागामध्‍ये देखील प्रेम सामावलेले असते. जशी कटोरी अम्‍मा हप्‍पूची काळजी घेते, अगदी तसेच मी योगेशची काळजी घेते. आणि अगदी प्रामाणिक मुलाप्रमाणे तो देखील त्‍वरित माझे ऐकतो आणि त्रुटींना दूर करतो. आमच्‍यामध्‍ये असलेले नाते अगदी वास्‍तविक जीवनातील आई-मुलासारखेच आहे. आम्‍ही एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि एकमेकांची काळजी घेतो. हीच बाब आमच्‍या नात्‍याला खूपच खास बनवते.'' कामना पाठक ऊर्फ दबंग राजेश म्‍हणाल्‍या, ''मातृत्‍वासारखी उत्तम भावना नाही. मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'ने मला आई असण्‍याच्‍या ख-या भावनेचा अनुभव घेण्‍याची संधी दिली आहे. राजेश ही धाडसी महिला आहे, जिचे व्‍यक्तिमत्त्व अत्‍यंत प्रबळ आहे आणि ती तिच्‍या कुटुंबाची काळजी व इतर जबाबदा-या सुलभपणे पार पाडते. मालिकेमधील तिच्‍या आईच्‍या भूमिकेशी कोणीही संलग्‍न होऊ शकतो. पडद्यामागे देखील मी अगदी आईसारखीच वागते, जेथे मी सतत मुलांसोबत ते सेवन करत असलेले अन्‍न व पाण्‍यावर नजर ठेवते. आर्यन (ऋतिक), झारा (चमची) व आश्‍ना (केट) यांच्‍यासोबत माझ्या काही संस्‍मरणीय आठवणी आहेत. आम्‍ही एकत्र काम करताना नृत्‍य करतो, गाणी गातो आणि खूप धमाल करतो. मी आईच्या भूमिकेचा खरा आनंद घेत आहे. यामुळे मला अधिक संवेदनशील व्‍यक्‍ती बनण्‍यामध्‍ये मदत झाली आहे.'' आकांशा शर्मा ऊर्फ सकिना मिर्झा म्‍हणाल्‍या, ''माझी भूमिका सकिना अत्‍यंत प्रेमळ आहे, जी तिची मुले झोया व इनाम यांच्‍या सहवासाचा आनंद घेते. जान है जान! आईची भूमिका साकारण्‍याची संधी जीवनातील मूलभूत कौशल्‍ये शिकवते. मी नेहमीच उत्‍साही व्‍यक्‍ती राहिली आहे आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेते. आईची भूमिका साकारण्‍यामधून मला माझ्या अंतर्गत क्षमतांची जाणीव झाली आहे. यामुळे मी माझी कृती व शब्‍दवापरांच्‍या बाबतीत खूपच दक्ष झाले आहे. मला माहित आहे की, एक आई म्‍हणून माझा नेहमीच मुलांवर प्रभाव पडतो.'' फरहाना फतेमा ऊर्फ शांती मिश्रा म्‍हणाल्‍या, ''मिश्रा कुटुंबामध्‍ये ३ उत्‍साहित तरूण आहेत, जे वातावरण पूर्णत: उत्‍साहपूर्ण करतात. त्‍यांची निरागसता व उत्‍साहीपणा माझी आई म्‍हणून भूमिका दहा पट सुलभ करतात. शांती ही शिस्‍तबद्ध महिला आहे. तिने तिच्‍या कुटुंबासाठी नियमावली तयार केली आहे. तिची मुले नेहमी तिचे म्‍हणणे ऐकतात, ज्‍यामुळे ती एक आदर्श आई आहे.'

No comments:

Post a Comment