Friday 7 May 2021

General: &TV | पवन सिंग म्‍हणाले, ''आलो होतो मिश्राची भूमिका साकारायला, पण मिळाली मिर्झाची भूमिका''

 एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'और भई क्‍या चल रहा है?'मधील रीअल व रील भूमिकेबाबत सांगताना पवन सिंग म्‍हणाले, 

एण्‍ड टीव्‍हीवरील नवीन हलकी-फुलकी प्रासंगिक विनोदी मालिका 'और भई क्‍या चल रहा है?'मध्‍ये स्‍थानिक कलाकार आहेत. स्‍थानिक परंपरेला सादर करणारी ही मालिका लखनौच्‍या वैविध्‍यपूर्ण व संपन्‍न संस्‍कृतीला दाखवते. अनेक लोकप्रिय चेह-यांपैकी एक पवन सिंग मालिकेमध्‍ये जफर अली मिर्झाची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे. त्‍यांच्‍यासोबत इतर कलाकार आहेत शांती मिश्राच्‍या भूमिकेत फरहाना फतेमा, सकिना मिर्झाच्‍या भूमिकेत आकांशा शर्मा आणि रमेश प्रसाद मिश्राच्‍या भूमिकेत अंबरिश बॉबी. त्‍यांच्‍या विनोदी अभिनयाच्‍या माध्‍यमातून ते सर्व प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करण्‍याची खात्री घेत आहेत. मनोरंजन क्षेत्रामध्‍ये पवन सिंग टेलिव्हिजनवर विविध भूमिकांमध्‍ये दिसलेले आहेत. पवन प्रेक्षकांच्‍या मनात आणखी एक संस्मरणीय भूमिका निर्माण करण्‍यास सज्‍ज आहेत. पवन यांच्‍यासोबत केलेल्‍या गप्‍पागोष्‍टीदरम्‍यान त्‍यांनी त्‍यांची भूमिका, मालिकेचे कथानक याबाबत प्रांजळपणे सांगण्‍यासोबत काही मजेशीर प्रश्‍नांची उत्तरे देखील दिली:

१. आम्‍हाला तुमच्‍या भूमिकेबाबत सांगा आणि तुम्‍हाला ही भूमिका कशाप्रकारे मिळाली?

मी जफर अली मिर्झाची भूमिका साकारत आहे, जो लखनवी नवाब आहे. तो त्‍याचा कट्टर शत्रू व जिवलग मित्रासोबत एका हवेलीमध्‍ये राहत आहे. मिर्झा हा खंबीर आणि वचन पाळणारा व्‍यक्‍ती आहे. त्‍याला स्वत:चा खूपच अभिमान आहे, पण जोपर्यंत त्‍याची प्‍यारी बेगम येत नाही तोपर्यंतच. त्‍यानंतर फक्‍त तिचेच वर्चस्‍व व तिच्‍याच मागण्‍या असतात. जगासाठी मिर्झा शेर आहे, पण त्‍याची बेगम येताच मिर्झा शांत मांजर होऊन जातो. तो तिला घाबरत नाही, पण तो तिच्‍याप्रती असलेल्‍या अतूट प्रेमामुळे तिचे म्‍हणणे ऐकतो. मिर्झाचा देखील स्‍वभाव बदलत असतो. ही भूमिका मिळण्‍याचा प्रवास खूपच रोमांचक आहे. मी सुरूवातीला मिश्राच्‍या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. आलो होतो मिश्राची भूमिका साकारायला, पण मिळाली मिर्झाची भूमिका! मालिकेच्‍या निर्मात्‍यांनी सांगितले की मी मिर्झाच्‍या भूमिकेसाठी योग्‍य ठरेन, कारण माझा लुक, शरीरयष्‍टी व दाढी अगदी भूमिकेला साजेसे होते. ऑडिशनदरम्‍यान मला एकामागोमाग एक सरप्राईज मिळत होते. प्रथम भूमिका बदलली आणि त्‍यानंतर भाषा. दिल्‍लीचा असल्‍यामुळे माझी भाषाशैली व उच्‍चार लखनवी भाषेपेक्षा वेगळे आहेत. मला भाषेच्या सफाईदारपणावर काम करावे लागले. मला वागणूक व स्‍वभाव, तसेच संवाद बोलण्‍याच्‍या पद्धतीसाठी अनेक दिवसांसाठी सराव करावा लागला. पण समस्‍या फक्‍त येथेच थांबल्‍या नाहीत, या सुसंस्‍कृत भाषेमध्‍ये विनोदाची भर करण्‍याचे देखील आव्‍हान होते. अथक मेहनत व सयंमानंतर माझा विश्‍वास आहे की मी नवाबाप्रमाणे भाषा बोलण्‍याच्‍या कलेमध्‍ये निपुण झालो आहे आणि त्‍यामध्‍ये विनोद देखील सादर करत आहे.

२. तुम्‍ही मालिकेमध्‍ये चहाच्‍या दुकानाचे मालक आहात. तर मग, वास्‍तविक जीवनामध्‍ये तुम्‍हाला चहा प्यायला आवडते का?

दिल्‍लीची चहा माझ्या नसानसांमध्‍ये सामावलेली आहे. अर्थातच, मला चहा प्यायला आवडते. चहा ही कोणत्‍याही डिशची परिपूर्ण सोबती आहे. ती जुळवून घेणा-या जोडीदारासारखी आहे, अगदी मिर्झा सकिनाला

सांभाळून घेतो तशी. चहा तुम्‍हाला स्‍फूर्ती देणारे पेय आहे, जे कधीच चुकीचे ठरू शकत नाही. चहा जितकी गोड, तितका गोडवा जीवनात वाढत जातो. तुम्‍ही कधी कोणा व्‍यक्‍तीला चहाबाबत तक्रार करताना पाहिले आहे का? मी पैज लावतो नक्‍कीच कोणी नाही! थंडगार वातावरणांमध्‍ये गरमागरम चहाचा घोट प्यायला मला खूप आवडते, ज्‍यामधून उबदारपणा देखील मिळतो.

३. तुम्‍ही सांगितल्‍याप्रमाणे, मालिकेमध्‍ये मिर्झाची पत्‍नी सकिनाचे नेहमीच वर्चस्‍व असते. तुमच्‍या वास्‍तविक जीवनातील देखील असेच आहे का?

फक्‍त विवाहित पुरूषालाच या प्रश्‍नाचे उत्तर माहित असेल. मी मिर्झाच्‍या भूमिकेमध्‍ये सहजपणे सामावून जाण्‍यामागील कारण म्‍हणजे मी वास्‍तविक जीवनामध्‍ये त्‍याच्‍यासारखाच आहे. मिर्झा आणि माझ्यामध्‍ये बरेच साम्‍य आहेत. आम्‍ही मिळणा-या प्रत्‍येक गोष्‍टीमध्‍ये आमच्‍या स्‍वातंत्र्याचा आनंद घेतो, आमच्‍या पत्‍नी नेहमीच केंद्रस्‍थानी असतात आणि आम्‍हा दोघांना चहा प्यायला आवडते. मी त्‍याच्‍या विनोदी संघर्षांशी संलग्न होऊ शकतो. तो ज्‍या पद्धतीने त्‍याच्‍या पत्‍नीला नाही म्‍हणून शकत नाही, त्‍यामधून मला त्‍वरित माझ्या वास्‍तविक जीवनाची आठवण येते. मला आठवते, लॉकडाऊनदरम्‍यान मी एकदा भांडी घासली होती आणि माझ्या पत्‍नीने मी ते काम सतत करत राहण्‍याची खात्री घेतली होती. ती दावा करते की, ती मी घासलेल्या भांड्यांमध्ये स्वत:ला पाहू शकते. एकतर ती गोड बोलून काम करून घेत असेल किंवा मी चांगला भांडी धुणारा असेन!

४. 'और भई क्‍या चल रहा है?' – हे संवाद सुरू करण्‍यापूर्वीचे वाक्‍य आहे. याबाबत तुमची एखादी मजेशीर घटना आहे का, ज्‍याबाबत तुम्‍हाला सांगायला आवडेल?

सामान्‍यत: कोणताही संवाद सुरू करण्‍यापूर्वी 'और भई क्‍या चल रहा है?' असे विचारले जाते. पण या नेहमीच्‍या प्रश्‍नाला दिल्या जाणा-या प्रतिक्रिया विलक्षण व अनोख्‍या आहेत. मला आठवते, मी एकदा माझ्या मित्राला हाच प्रश्‍न विचारला होता, तो खूपच रागावून गेला आणि म्‍हणाला 'भरपूर काही चालू आहे, तुला काय सांगू?' त्‍याने त्‍याच्‍या जीवनात एकामागोमाग एक येणा-या संकटांबाबत सांगितले. यामुळे मी सतत विचार करतो की, मी इथपर्यंत कसा पोहोचलो?

५. चहाची दुकाने गप्‍पागोष्‍टींसाठी कुप्रसिद्ध आहेत आणि मालिकेमध्‍ये तुम्‍ही एका चहाच्‍या दुकानाचे मालक आहात. तुमची याच्‍याशी संबंधित काही संस्‍मरणीय घटना आहेत का?

क्रिकेट सामना सुरू असेल तर चहाच्‍या दुकानावर खूपच चर्चा रंगलेल्‍या असतात. चर्चा करणारे तुम्‍हाला एखाद्या गोष्‍टीवर विश्‍वास ठेवण्‍यास भाग पाडतील, ज्‍याबाबत सचिन तेंडुलकरला देखील माहित नसेल. ते म्‍हणतात की भिंतींना कान असतात आणि या चहाच्‍या दुकानाच्या भिंती चर्चांसह रंगलेल्‍या असतात. राजकारणापासून सुरू झालेली चर्चा पत्‍नीच्‍या कामगिरीपर्यंत येऊन संपते. कमी बोलणारी व्‍यक्‍ती देखील या चर्चेमध्‍ये सामावून जाईल आणि ते कसे, पाहणे मजेशीर आहे. असे वाटते की, चर्चा करणा-या व्‍यक्‍तीला जगातील सर्व ज्ञान आहे आणि चहाचे दुकान त्‍याचा मंच बनतो. मला स्‍वत:ला अशा चर्चा करणा-या व्‍यक्‍तींच्‍या गप्‍पा ऐकायला आणि त्‍यांचे निरीक्षण करायला आवडते. चहाच्‍या दुकानावर येणा-या व्‍यक्‍ती देखील अद्वितीय असतात आणि येथे कधीच कोणाला कंटाळा येणार नाही. अशीच एक संस्‍मरणीय घटना आहे, एक वृद्ध व्‍यक्‍ती कडू चहा प्यायल्‍यानंतर माझ्याकडे चमचाभर साखर मागण्‍यासाठी आला होता.

६. तुमची स्‍वप्‍नवत भूमिका कोणती?

माझ्यामधील कलाकाराला आव्‍हान करणारी कोणतीही भूमिका मला साकारायला आवडेल. पण मी विनोदी भूमिकांना प्राधान्‍य देतो, कारण अशा भूमिका काम व धमाल यांमध्‍ये सुरेख संतुलन राखतात. संधी मिळाली तर मला नकारात्‍मक भूमिका साकारायला आवडेल.

७. हवेलीमधील पुरूषमंडळींमध्‍ये घराबाहेर चांगले नाते पाहायला मिळत आहे. हे खरे आहे की अंतर्गत शत्रूता लपवण्‍यासाठी एखादा डावपेच आहे?

प्रेम पण आहे आणि शत्रुत्‍व पण आहे. मिर्झा व रमेश प्रसार मिश्रा (अंबरिश बॉबी) हे भावंडांसारखे वादविवाद करतात. वास्‍तविक जीवनात अंबरिशजी आणि माझ्यामध्‍ये चांगले नाते आहे. आम्‍ही पहिल्‍यांदा सेटवर भेटलो आणि त्वरित एकमेकांशी जुडलो गेलो. ते लखनौचे आहेत आणि मला गरजेच्‍यावेळी मदत करतात. ते अत्‍यंत विचारशील आहेत आणि अगदी मोठ्या भावाप्रमाणे मला माझा सर्वोत्तम अभिनय सादर करण्‍यास प्रोत्‍साहित करतात. पडद्यावर व पडद्यामागे आमच्‍यामध्‍ये चांगले साहचर्य आहे. शेजारी राहणा-या पत्‍नी शांती व सकिना आणि त्‍यांच्या बायकांचे बैल म्‍हणून हिणवले जाणारे पती – रमेश प्रसाद मिश्रा व जफर अली मिर्झा यांच्‍यामधील वादविवाद सादर करणारी ही मालिका प्रेक्षकांसाठी 'चांगल्‍या क्षणाला सर्वात मोठे शत्रू आणि वाईट काळामध्‍ये सर्वात चांगले मित्र' असलेल्‍या या दोन कुटुंबांच्‍या अवतीभोवती फिरणारी मनोरंजनपूर्ण व सर्वसमावेशक कथा सादर करेल.

No comments:

Post a Comment