या पितृदिनाला रामजी सकपाळसमोर उभे राहणार सर्वात मोठे आव्हान!
एण्ड टीव्हीवरील मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्बेडकर'मध्ये प्रेक्षकांनी रामजी सकपाळ (जगन्नाथ निवंगुणे) यांनी बाबासाहेबांच्या जीवनाला आकार देण्यामध्ये बजावलेली प्रमुख भूमिका पाहिली आहे. रामजी हे त्यांच्या मुलांसाठी तत्त्वज्ञानी, मार्गदर्शक व उत्तम मेन्टोरचे परिपूर्ण उदाहरण होते. त्यांनी लहान भीमरावांमध्ये (आयुध भानुशाली) शिक्षणाचे महत्त्व रूजवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. रामजी यांचा दृढ विश्वास होता की, स्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी आपण आपल्या अधिकारावर ठाम राहिले पाहिजे. आता, रामजी यांना दुविधा व भावनिक क्षोभ अशा स्थितीचा सामना करावा लागणार आहे. त्यांना एकतर त्यांचा मुलगा बालाच्या मागे खंबीरपणे उभे राहत पाठिंबा द्यावा लागणार आहे किंवा योग्य ते करावे लागणार आहे, ज्यासाठी त्यांना त्याच्या मुलाच्या विरोधात देखील जावे लागेल. बाला (सौद मन्सुरी) राणीला अपमानास्पद विवाहापासून वाचवण्यासाठी तिच्यासोबत पळून जाण्याचे ठरवतो. यामुळे रामजी व त्यांचे कुटुंब विलक्षण स्थितीमध्ये अडकून जातात आणि महाराज व त्याचे अनुयायी यासाठी त्यांनाच दोषी ठरवतात. रामजी कोणता निर्णय घेतील आणि त्याचा बालासोबतच्या त्यांच्या नात्यावर काय परिणाम होईल? वडिल आपल्या मुलाला योग्य व अयोग्याचे स्पष्टीकरण कशाप्रकारे करतील?
या एपिसोडबाबत सांगताना जगन्नाथ निवंगुणे ऊर्फ रामजी सकपाळ म्हणाले, ''रामजींचे सर्व मुलांवर समान प्रेम आहे आणि त्यांनी नेहमीच त्यांना योग्य शिकवण दिली आहे. भीमराव हा प्रबळ इच्छाशक्ती असलेला लहान मुलगा आहे, ज्याचा योग्य गोष्टींना पाठिंबा देण्यावर विश्वास आहे. दुसरीकडे, बालाचे हेतू चांगले आहेत, पण त्याचा मार्ग व कृती नेहमीच योग्य नसतात. यामुळे रामजी व बालामध्ये सतत भांडण होत असतात, ज्यामुळे बालाला वाटते की रामजी त्याला पाठिंबा देत नाहीत आणि नेहमीच भीमरावची बाजू घेतात. बाला राणीसोबत पळून गेल्याने रामजी खडतर स्थितीमध्ये अडकून जातात आणि त्यांना भीमरावाला पाठिंबा द्यावा लागतो. यामुळे बालासोबत त्यांचा दुरावा आणखी वाढतो. रामजी या आव्हानाचा सामना कशाप्रकारे करतील? ते बालाला कशाप्रकारे समजावतील?''
अधिक जाणण्यासाठी पाहत राहा 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्बेडकर' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!
No comments:
Post a Comment