Tuesday 29 June 2021

सोन्याची पावलं आपल्या कलर्स मराठीवर ! ५ जुलैपासून : सोम. ते शनि. संध्या : ६.३० वा.

मुंबई २८ जून२०२१ :  एखाद्या घरी मुलगी जन्माला आली असो किंवा मुलीने सासरी माप ओलांडून सून म्हणून गृहप्रवेश केला असो तर असं म्हणतात की, “सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीच घरात आली”.  ही एक भाबडी समजूत असते किंवा आपला विश्वास असतोनवी नवरी सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीप्रमाणे घरात आली आणि सासरच्या अंगणात भरभराट झाली. सूनेच्या येण्याने कुटुंबावर ओढवलेलं मोठं संकट टळलंतिच्या येण्याने विस्कटलेल्या कुटुंबाची घडी पुन्हा एकदा बसू लागली. अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतातकाही घटना आपण प्रत्यक्ष बघत देखील असतो. काहींचा या गोष्टीवर विश्वास असतो, तर काहींचा नसतो. काही म्हणतात योगायोग आहे, तर काही म्हणतात प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे. आपल्या कथेतील भाग्यश्रीची गोष्ट आणि तिचा प्रवास या सगळ्यांहून जरा वेगळा आहे असे म्हणावे लागेल. विधिलिखित कुणाला चुकत नाहीहे अगदी खरं. भाग्यश्रीच्या नशिबात इनामदारांची सून होणं लिहिलेलच होतं म्हणून तिची भेट दुष्यंतशी झाली आणि ते अपघाताने लग्नबंधनात अडकले. पण लग्नानंतर भाग्यश्रीचं आयुष्य पूर्णतः बदललं. तिला ‘वाहिनीसाहेब’ हा मान मिळाला. ज्यामुळे भाग्यश्रीला वाहिनीसाहेब हा मान मिळाला त्या सोन्याच्या पावलांचा आणि भाग्यश्रीचा काय संबंध आहे ? इनामदार घराण्यातील वडीलोपार्जित सोन्याची पावलं याचं काय रहस्य आहे या पावलांच्या पुण्याईवर दुष्यंतचा मुळीच विश्वास नाहीये. भाग्यश्रीचे दैव आणि दुष्यंतचा त्यावरील अविश्वास यामध्ये कोण खरं ठरेल ?

या कथेची निर्मिती ‘पर्पल मॉर्निंग मुव्हीजने केली आहे. ‘सोन्याची पावलंप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ५ जुलैपासून संध्या ६.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

एका छोट्या गावामध्ये मध्यम वर्गीय घरात वाढलेली भाग्यश्री ही अत्यंत महत्वाकांक्षी आणि मेहनती मुलगी आहे. इतरांना आनंद कसा देता येईल याच प्रयत्नात ती असते. ‘आपण आपलं काम करत राहावंएक ना एक दिवस देव त्याचं फळ देईल’ हे भाग्यश्रीच्या जगण्याचे सूत्र आहे. भाग्यश्री दहा वर्षांची असताना तिची आई देवा घरी गेली आणि वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईच्या जाचाला कंटाळलेल्या भाग्यश्रीला आता यातून सुटकेचा एकमेव मार्ग दिसतो आहे आणि तो म्हणजे लग्न. तर, दुसरीकडे इनामदार घराण्याचे शेंडेफळ दुष्यंत इनामदार. अत्यंत देखणाधडाडीचाइतरांना सल्ले देणारामित्रांच्या मदतीला एका हाकेवर धावणारालोकांना मदत करणारा. याच सवयीमुळे त्याची भाग्यश्रीशी ओळख होते आणि अपघाताने भाग्यश्री - दुष्यंतचं लग्न होतं. नियतीमुळेच दोन वेगळी विश्व असलेले भाग्यश्री आणि दुष्यंत एकत्र येतात. एकमेकांचे जोडीदार बनून ते एक नवं विश्व निर्माण करतील इनामदारांच्या घराची सून ते गावाची वाहिनीसाहेब होण्यापर्यंतचा भाग्यश्रीचा हा प्रवास कसा असेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

मालिकेच्या निर्मात्या श्रावणी देवधर म्हणाल्या, “आपण सगळेच जवळपास दीड वर्षापासून अत्यंत कठीण परिस्थितिला तोंड देतो आहे. पण मनोरंजनसृष्टी काही थांबलेली नाही. रसिक प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचे आणि उत्तम विषय देण्याचा आमचा नेहेमी प्रयत्न असतो. कलर्स मराठीवर सुरू होणार्‍या ‘सोन्याची पावलं’ या नवीन मालिकेसाठी आमची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत आहे. ही मालिका माझ्या विशेष जवळची आहे. या मालिकेनिमित्त माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते आहेमाझी लेक सई देखील या मालिकेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. याआधी बरेचसे प्रोजेक्टस प्रोड्यूस केले, पण मालिका करण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे. मालिकेविषयी सांगायचं झालं तर, मालिकेचा विषय अत्यंत वेगळा आहे. ही भाग्यश्री आणि दुष्यंत यांची प्रेमकथा आहे. यांच्या कहाणीची सुरुवातच मुळात अपघाताने होते. भाग्यश्री सोन पावलांनी इनामदारांच्या घरी येते आणि मग तिचा खरा लढा सुरू होतो. यामध्ये तिला दुष्यंतची साथ मिळेल ? त्यांच्या नात्यात प्रेमाचा ओलावा येईल या दोघांचा हा प्रवास बघायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल”.

इनामदारांच्या कुटुंबात सून म्हणून आलेल्या भाग्यश्रीला घरातील काही मंडळींच्या तिरस्काराला सामोरी जावे लागते. वाटेत येणाऱ्या संकटांचा सामना करून इनामदार घराण्याचा उद्धार करणं भाग्यश्रीला जमेल का दुष्यंत हे लग्न मान्य करेल नाईलाजानं ओढवलेल्या या नात्याला प्रेमाचा अंकुर फुटेल भाग्यश्री खूप स्वप्न घेऊन सासरी आली. पण तिच्या स्वप्नांना मायेची साथ,आपुलकीचा ओलावा आणि नात्यातील गोडवा मिळेल कासोन्याच्या पावलांनी तिचं आयुष्य उजळून निघेल का हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहा भाग्यश्री - दुष्यंत यांची जगावेगळी प्रेमकथा सोन्याची पावलं ५ जुलैपासून सोम. ते शनि. संध्या. ६.३० वा.आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment