Thursday 12 August 2021

स्वातंत्र्य दिनानिमित्त अपोलोची लसीकरणावर 'फ्रीडम ऑफर'

कोवॅक्सीन लसीची फ्रीडम ऑफर १२ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत अपोलो,नवी मुंबईत सुरु राहील

नवी मुंबई, १२ ऑगस्ट २०२१: भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अपोलो हॉस्पिटल्सने अधिक निरोगी राष्ट्रनिर्मितीची प्रतिज्ञा घेतली आहे व त्यासाठी लसीकरण अभियानात पुढचे पाऊल उचलत कोवॅक्सीन लसीसाठी एक विशेष फ्रीडम ऑफर सुरु केली आहे.

कोरोना सुरु होऊन दीड वर्ष लोटले आणि देश अजूनही नॉवेल कोरोना विषाणूच्या विरोधात लढतो आहे.  या विषाणूचा व त्याच्या इतर प्रकारांचा प्रसार रोखण्यासाठीच्या प्रमुख अस्त्रांपैकी एक आहे लसीकरण अभियान आणि लसीकरण करून लोकांना विषाणूच्या संसर्गापासून, त्याच्या प्रसारापासून संरक्षण दिले जाऊ शकते तसेच गंभीररीत्या आजारी पडण्यापासून वाचवले जाऊ शकते.

विशेष फ्रीडम ऑफरअंतर्गत अपोलो हॉस्पिटल्स कोवॅक्सीन लस कोणतेही अतिरिक्त सेवा शुल्क न आकारता १२५० रुपये या विना-नफा किमतीला उपलब्ध करवून देत आहे.  खाजगी रुग्णालयांना या लसीसाठी सरकारने आखून दिलेली किंमत १४१० रुपये (जीएसटी व सेवा शुल्क यांच्यासहित) आहे.

श्री.संतोष मराठे, सीओओ व युनिट हेड, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले, "अधिक निरोगी राष्ट्रनिर्मितीसाठीच्या प्रयत्नांमध्ये अपोलो हॉस्पिटल्स नेहमीच आघाडीवर असते आणि आज जेव्हा आपण सर्वजण कोविड महामारीच्या विरोधात लढत आहोत तेव्हा राष्ट्रीय लसीकरण अभियान यशस्वी व्हावे यासाठी जे-जे करता येईल ते करणे अत्यावश्यक आहे.देशभरात सर्वांचे लसीकरण पूर्ण झाल्यास संसर्ग प्रसाराची साखळी तोडण्यात व हर्ड इम्युनिटी विकसित होण्यात मदत मिळेल. जास्तीत जास्त लोकांनी कोविडविरोधात लसीकरण करवून घ्यावे हा आमचा प्रमुख उद्देश आहे, जेणेकरून ते या आजाराविरोधात संरक्षण उभारू शकतील आणि आपण सर्वसामान्य जीवनाच्या दिशेने अधिक वेगाने जाऊ शकू. यासाठी आम्ही कोणतेही सेवा शुल्क घेत नाही आहोत. आम्हाला आशा आहे की आमच्या या उपक्रमामुळे अनेक लोकांना लसीकरण करवून घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल." 

कोवॅक्सीन लसीची फ्रीडम ऑफर १२ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत सुरु राहील. पहिल्या तसेच दुसऱ्या दोन्ही डोसेससाठी ही ऑफर वैध राहील आणि ज्या व्यक्ती पहिला डोस घेत असतील त्यांना दुसऱ्या डोससाठी देखील हाच दर लागू राहील.

अपोलो लसीकरण केंद्रे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहतील.  सरकारने कोविड लसीकरणासाठी आखून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन याठिकाणी केले जाईल. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्ती १२ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत लसीकरण करवून घेऊ शकतात.    

No comments:

Post a Comment