Monday 23 August 2021

स्टोरीटेलच्या खजिन्यातून बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रेरणादायी आवाजात संपूर्ण ‘शिवचरित्रकथन’

 ‘स्टोरीटेल’वर इतिहासप्रेमी, साहित्यरसिकांसाठी 'खजिन्यावर खजिना'

बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या समर्थ लेखणीतून “राजा शिवछत्रपती” यांचा इतिहास विविध प्रेरणादायी ग्रंथांतून त्यांच्या ओघवत्या शैलीद्वारे मांडला आहे. शिवरायांवरील हे अलौकिक साहित्य प्रत्येक मराठी माणसाने एकदातरी ऐकायलाच हवे. 'स्टोरीटेल' या आघाडीच्या संस्थेने पुढाकार घेत बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणादायी आवाजात १९८३ साली ध्वनीमुद्रित केलेल्या 'संपूर्ण शिवचरित्रकथनाचे' पंधरा भाग खास इतिहास प्रेमी, साहित्यरसिकांसाठी 'ऑडिओबुक'मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. खुद्द बाबासाहेब पुरंदरेंचे ओरिजन सादरीकरण ऐकण्याचा एक विलक्षण नजराना बाबासाहेबांच्या 'शतकोत्सवी' वर्षानिमित्त शिवप्रेमी साहित्यरसिकांना 'स्टोरीटेल'ने दिला आहे.

पंधरा भागांची संपूर्ण 'शिवचरित्रकथन' व्याख्यानमाला बाबासाहेबांच्या प्रेरणादायी आवाजात स्टोरीटेलवर ऐकता येणार आहे. याशिवाय त्यांनी सांगितलेल्या हिरकणी, प्रतापराव गुजर, बुलंद बुरुज अशा ऐतिहासिक सात कथाही स्टोरीटेलवर स्वतंत्रपणे ऐकायला मिळणार आहेत. शिवप्रेमींसोबतच सर्वसामान्य साहित्यप्रेमीही बाबासाहेबांच्या वाणीतून हे 'शिवचरित्रकथन' ऐकताना एकरूप होतात. 'शिवचरित्रकथन'मध्ये शिव पुर्वकाळ, शिव जन्म, बालपण, स्वराज्याची प्रतिस्थापना, स्वराज्य विस्तार, अफझल खान स्वारी, अफझल खान पराभव, पावन खिंड, फिरंगोजी नरसाळ, लाल महालावर छापा, सुरतेवर स्वारी, मिर्झाराजे जयसिंग, अग्र्यातून सुटका, तानाजी, राज्याभिषेक असा शिवकालीन इतिहास बाबासाहेबांच्या रसाळ वाणीतून इतिहासप्रेमींना ऐकायला मिळणार आहे.

‘स्टोरीटेल’ हि स्वीडिश कंपनी असून ती जगातील २१ हुन अधिक देशात आणि २५ हुन अधिक भाषेत ऑडिओबुक प्रकाशित व वितरित करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. सध्या भारतात मराठी, हिंदी, इंग्रजी आदी भाषांसह ११ भारतीय भाषांतील पुस्तके या अँपवर उपलब्ध आहेत. ही ऑडिओबुक्स कधीही कुठेही आणि कितीही ऐकता येऊ शकतात. मराठी मध्ये शिवचरित्र कथन बरोबरच इतिहास प्रेमींसाठी ना स इनामदार यांच्या झेप, झुंज अश्या कादंबऱ्या, गो नि दांडेकर यांच्या पडघवली, पवनाकाठचा धोंडी, कुण्या एकाची भ्रमणकथा, शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय, युगंधर यासारख्या लोकप्रिय कादंबऱ्या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहेत.

'स्टोरीटेल' या अॅपमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांतील दोन लाखांहून अधिक पुस्तके कधीही, कुठेही ऐकण्याची संधी आहे. ज्यामध्ये मराठी साहित्य विश्वातील नामवंत लेखकांपैकी ह. ना. आपटे, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, व. पु. काळे, रणजित देसाई,  साने गुरुजी,  सुनीता देशपांडे, अरूणा ढेरे आदी अनेकांचे सर्वोत्तम साहित्य स्टोरीटेल ऑडिओबुक स्वरूपात उपलब्ध आहे. हे सर्व साहित्य नामवंत अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी,  शुभांगी गोखले, संदीप कुलकर्णी आदींच्या आवाजात स्टोरीटेलवर ऐकायला मिळेल.

स्टोरीटेल इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, आसामी, गुजराती आणि कन्नड या ११ भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक आणि ईबुक्स प्रकाशित करते. मराठीतील हजारो सर्वोत्तम पुस्तके कुठेही कधीही ऐकण्याचे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी आपल्याला स्टोरीटेल ‘गुगल प्ले स्टोअर’ http://bit.ly/2rriZaU आणि ‘iOS अॅप स्टोअर’ https://apple.co/2zUcGkG दोन्हीवर उपलब्ध आहे. 'स्टोरीटेल सिलेक्ट' सब्स्क्रिप्शन प्लानचे मूल्य 'फ्रीडम ऑफर'मध्ये अनुक्रमे रु. 59  आणि रु. रु. 345 अश्या नाममात्र किंमतीत 31ऑगस्ट पर्यंत उपलब्ध होणार आहे. तसेच पुरंदरे प्रकाशन तर्फे 'खजिन्यावर खजिना' या योजनेत ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ सवलतीत रू.700/- मध्ये उपलब्ध होणार असून त्यावर रू.799/- किंमतीचे तीन महिन्यांची स्टोरीटेल अनलिमिटेड ची वर्गणी मोफत उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment