Wednesday, 18 August 2021

महाराष्ट्राचं लाडकं पुण्याचं सुप्रसिद्ध ‘शौकीन’ मुंबईकरांच्या सेवेत दादरमध्ये!


खास मुंबईकर 'शौकिनां'साठी धनंजय केतकर आणि विराज लेले यांचा 'तांबूल विडा'!

 

'कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना… ' हे गाणं ऐकताच डोळ्यासमोर येतो मस्तपैकी तयार केलेला पानाचा विडा. विड्याच्या पानाचं भारताच्या इतिहासाशी आणि परंपरांशी खूप जुनं नात आहे. आजही भारताच्या प्रत्येक गल्लीत, चौकात किंवा मुख्य भागांमध्ये पानपट्टी हमखास दिसतेच. यावरून हेच कळतं की, विड्याचं पान हे फक्त भारतातल्या नवाब किंवा राजाचंच नाहीतर सामान्य शौकिनांचंही आवडतं आहे. तांबूली किंवा नागवेल नामक वेलीचं हे पान इंग्रजीमध्ये बीटल लीफ, हिंदीमध्ये पानचं पान, तेलगूमध्ये तमालपाकु तर मराठीत याला तांबुल असं म्हटलं जातं. जेवण झाल्यावर तोंडाची चव कायम ठेवण्यासाठी राजा-महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत सामान्य ‘शौकीन’ तरुणाईसुद्धा आजही पान खाणं मस्ट म्हणते. अश्या खास ‘शौकिन’ मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांना आता हे 'शौकीन' पान धनंजय केतकर आणि विराज लेले यांनी मुंबईतील दादर या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे.

आयुष्यात एकदाही पान खाल्ले नाही, असा ‘शौकीन’ शोधूनही सापडणार नाही. पान आणि सुपारीने भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील सांकृतिक, सामाजिक भावविश्व एवढे व्यापले कि आहे, कि त्याशिवाय सर्व सामाजिक व्यवहार बेरंग होवून जातील. पान खाणे हे शौकीन भारतीयांचे प्रमुख वैशिष्ट्य! तोंडात पान, रंगलेले ओठ हे भारतीयत्वाचे प्रतिक म्हटल्यास वावगे ठरू नये. अल्पावधीतच राज्यात विशेष लोकप्रिय झालेला ‘शौकीन’ हा ब्रँड आता खास मुंबईकरांसाठी दादर पश्चिमेच्या रानडे रोड या उच्च- मध्यम वस्तीतमध्ये आजपासून सुरु झाला आहे. दादरच्या ‘शौकीन’चे उदघाटन मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ. शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनसेच्या रिटा गुप्ता, निर्माते - दिग्दर्शक - अभिनेते अजित भुरे, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते संजय मोने,  विनय येडेकर, अतुल परचुरे, सखी परचुरे, अजीत रमेश तेंडुलकर, बीवायपीचे श्रीराम पाध्ये, दिग्दर्शक अजय फणसेकर, धनंजय केतकर, विराज लेले इत्यादी पान शौकीन मान्यवर उपस्थित होते.

पुण्यामधील एका ‘शौकीन’ अवलियाने २००५ साली अस्सल चवीच्या आपल्या पुणेकरांसाठी पाहिलं ‘कम्प्लीट पान शॉप’ सुरु केले. शरद मोरे या ध्येयवेड्या माणसाने सर्वोत्कृष्ट अणि अत्यंत दर्जेदार तंबाखूरहित पानांचा स्वाद खऱ्या पानरसिकांच्या परिवारापर्यंत पोचविण्याचा विडा उचलून हे ‘कम्प्लीट पान शॉप’ सुरु केले. हजारो वर्षांची शाही परंपरा असलेल्या भारतीय पान संस्कृतीचा वारसा आणि स्वाद आपल्यासारख्या पान रसिकांपर्यंत पोहचविण्याचे ध्येय उराशी बाळगत त्यांनी आपला 'शौकीन' हा ब्रँड तयार करीत महाराष्ट्रातील पुणे, पंढरपूर, शिर्डी, खारघर असा विस्तार केल्यानंतर आता ते मुंबईत शिरकाव करीत आहेत. दादरमधील प्रसिद्ध सोन्याचांदीचे व्यापारी धनंजय केतकर आणि विराज लेले या ध्येयवेड्या ‘पान शौकिनांना’ मुंबईकरांसाठी हा विडा उचलण्यास भाग पाडले आहे.

भारतीय संस्कृतीतील पारंपरिक पान सेवनाला आजच्या काळाशी सुसंगत करून घेतलं जातंय, पान खाणं ही जणू पुरुषांचीच मक्तेदारी असल्याचं पूर्वी जाणवायचं. घरातील महिलांना, मुलींना पान खाण्याची इच्छा झाली, तरी ते आणण्यासाठी टपरीवर त्यांना जाता यायचं नाही. त्यासाठी वडील किंवा भाऊच सामान्यपणे जात असत. ‘शौकीन’ने हे स्वरूप बदल असून आमच्या सर्व पान शॉप्समध्ये महिला आणि मुली निर्धास्तपणे येत आहेत. एवढंच नव्हे, तर लहान मुले आणि आजी-आजोबाही पानाचा आस्वाद घेण्यासाठी  ‘शौकीन’मध्ये वळू लागल्याचे ‘शौकीनकार शरद मोरे यांनी याप्रसंगी सांगितलं. मुंबईत आमची शाखा नव्हती, केतकर बंधूंच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे 'शौकीन' यशाचे नवे शिखर गाठणार आहे, असे मोरे सांगतात.

‘शौकीन’ स्पेशलमध्ये चॉकलेट मघई मसाला, व्हॅनिला चॉकलेट, पिस्ता चॉकलेट, स्ट्रॉबेरी चॉकलेट, मँगो चॉकलेट, केशर पिस्ता चॉकलेट, रोस्टेड अल्मन्ड चॉकलेट, ब्लॅक करंट चॉकलेट, साधा पान मध्ये कलकत्ता साधा, कलकत्ता स्पेशल साधा, रामप्यारी( कलकत्ता), मघई साधा, मघई स्पेशल साधा, शौकीन स्पेशल ड्रायफ्रूट मसाला मावा, शौकीन स्पेशल मसाला ( स्पेशल मसाला + ड्रायफ्रूट + ५ प्रकारची चटणी), मसाला (मीठा) मध्ये  कलकत्ता मसाला, मघई मसाला (जोडी ), बनारस मसाला, कलकत्ता मसालामध्ये ड्रायफ्रूट, केशर, मघई मसालामध्ये चॉकलेट, ड्रायफ्रूट, केशर तसेच आईस पान, फायर पान, पुणेरी पान अश्या विविध प्रकारच्या चवींची लज्जत मुंबईकरांना चाखता येणार आहे.

लहानग्यांसाठी मेन्यू कार्डमध्ये बदल

खास लहान मुलांसाठी त्यांना आवडणाऱ्या टेस्टची पाने विकसित केली आहेत. ‘व्हॅनिला चॉकलेट पान’, ‘स्ट्रॉबेरी चॉकलेट’, ‘ड्रायफूट पान’ , ‘चॉकलेट मगई’, ‘ऑरेंज चॉकलेट’ अशी लहानग्यांना आवडणाऱ्या फ्लेवर्सची रेंज आमच्याकडे असणार आहे. इतकंच काय, ‘बर्थ डे सेलिब्रेशन पान’ आणि चक्क ‘फॅमिली पॅक’ही उपलब्ध आहेत. अगदी २० रुपयांपासून तब्बल साडेतीन हजारापर्यंतचं पान पा

No comments:

Post a Comment