· 'गिनीज बुक रेकॉर्ड्स' विजेती 'द अल्केमिस्ट'
· 'फ्रीडम मंथ'निमित्त आंतरराष्ट्रीय साहित्य आपल्या मातृभाषेत 'स्टोरीटेल' मराठी 'ऑडिओबुक'मध्ये!
'द अलकेमिस्ट' (पोर्तुगीज: O Alquimista) शब्दांचे किमयागार म्हणून जगविख्यात झालेले ब्राझिलियन लेखक पाउलो कोएल्हो यांची सर्वाधिक वाचक लाभलेली ही कादंबरी आहे, जी प्रथम १९८८ मध्ये प्रकाशित झाली होती. मूळतः पोर्तुगीज भाषेत लिहिली गेलेली, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गाजलेली आणि 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये उच्चांकी खपासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी 'स्टोरीटेल मराठी'ने आपल्या साहित्यप्रेमींसाठी खास 'फ्रीडम मंथ' निमित्ताने उपलब्ध केली आहे. जागतिक विक्रम स्थापन करणारं दर्जेदार साहित्य आपल्या मातृभाषेत ऑडिओबुकद्वारे उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा 'स्वातंत्र्य अमृतमहोत्सव' स्टोरीटेल साजरं करीत आहे.
‘द अल्केमिस्ट’ ही वैश्विक पातळीवर प्रचंड गाजलेली बहुचर्चित कादंबरी असून ती साहित्यरसिकांना केवळ भावनावश किंवा अंतर्मुख करण्यापुरतीच मर्यादित नसून 'स्टोरीटेल मराठी ऑडिओबुक' ऐकताना अद्भुत आणि विलक्षण अनुभव देते. विविध देशांतील पंचावन्न पेक्षा अधिक भाषांमध्ये 'द अल्केमिस्ट' कादंबरी अनुवादित झाली आहे. मूळतः पोर्तुगीज भाषेत लिहिल्या गेलेल्या या कादंबरीचे अत्यंत लोभस मराठी रूपांतर लेखिका डॉ. शुचिता नांदापूरकर - फडके यांनी केले आहे.
स्वप्नं साकार करणारी जादूभरी कथा जगप्रसिद्ध साहित्यिक 'पाउलो कोएलो' यांच्या लेखणीतून उतरली आहे. आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देणारी ही कथा आहे. 'कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो,' असा संदेश देणारे हे कथानक आहे. प्रतीकं आणि शकुनांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं, याचं मार्गदर्शन 'द अलकेमिस्ट' ही कादंबरी करते. वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी ही अद्भूत आणि रंजक कादंबरी. 'स्टोरीटेल मराठी ऑडिओबुक'मध्ये संदीप कर्णिक यांच्या बहारदार आवाजात ऐकताना साहित्यरसिक गुरफटून जातात.
स्टोरीटेल इंडियाचे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ म्हणाले, “या महिन्यात आपण अमृतमोहोत्सवी स्वातंत्र्य उत्सव साजरे करीत असताना स्टोरीटेलही आपल्या मातृभाषेत स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जागविणारे विपुल साहित्य आणि त्यासोबत आंतरराष्ट्रीय साहित्यकृतीही आपल्या मातृभाषेतील 'ऑडिओबुक'मध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध करून साहित्यउत्सव साजरा करीत आहे. ऑडिओबुक्स कोणीही, कुठेही आणि केव्हाही ऐकू शकतात. 'फ्रीडम मंथ सेलिब्रेशन' निमित्त अत्यंत माफक दरात साहित्यरसिकांना स्टोरीटेलचे सदस्यत्व दिले जात आहे.
स्टोरीटेल इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, आसामी, गुजराती आणि कन्नड या ११ भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक आणि ईबुक्स प्रकाशित करते. मराठीतील हजारो सर्वोत्तम पुस्तके कुठेही कधीही ऐकण्याचे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी आपल्याला स्टोरीटेल ‘गुगल प्ले स्टोअर’ http://bit.ly/2rriZaU आणि ‘iOS अॅप स्टोअर’ https://apple.co/2zUcGkG दोन्हीवर उपलब्ध आहे. 'स्टोरीटेल सिलेक्ट' सब्स्क्रिप्शन प्लानचे मूल्य 'फ्रीडम ऑफर'मध्ये अनुक्रमे रु. ५९ आणि रु. ३४५ अश्या नाममात्र किंमतीत स्टोरीटेल अॅप उपलब्ध होणार आहे.
Nice post sir .Here a Detail of
ReplyDeletewhat's going on