मुंबई १५ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुरू होणार नवा आठवडा. घरामध्ये रंगणार नवे टास्क… आता या टास्क दरम्यान वादविवाद, भांडण झाली नाही तर टास्क खेळतो आहे असे सदस्यांना वाटणारच नाही ना ! आज बिग बॉसद्वारे देण्यात येणार्या टास्कचा संचालक असणार आहे जय. आणि टास्क दरम्यान होणार जय आणि सोनालीमध्ये हे भांडण. आता नक्की काय झालं ? कशावरून हा वाद वाढला हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा.
सोनालीचे म्हणणे आहे, प्लॅनिंगमध्ये होता तो. उत्कर्ष, गायत्री, मीराने प्लॅनिंग करू दे...सगळ्यांनी करू दे नो प्रॉब्लेम, त्यामध्ये संचालक नाही पाहिजे... विकास त्यावर म्हणाला सगळ्यांनी बघितली आहे ही गोष्ट. दादूस पण या वादामध्ये आपले मत मांडताना दिसणार आहेत. जय त्यावर म्हणाला, Shut Up…Please Shut Up … talk to my bottle… त्यावर सोनाली म्हणाली, तुझ्याबाजूने बोले तेदेखील तुला कळालं नाही. तर आज काय कळणार आहे. बघूया हा वाद अजून किती वाढला...
तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 41 !
जय VS विकास
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “मिशन नॉमिनेशन” हे कार्य
मुंबई १५ नोव्हेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे “मिशन नॉमिनेशन” हे नॉमिनेशन कार्य. आणि या कार्या दरम्यान विकास आणि जयमध्ये चांगलाच राडा बघायला मिळणार आहे. विकासचा आक्षेप जयवर आहे. आता या कार्यामध्ये प्रत्येक सदस्य नॉमिनेशन पासून स्वत: ला कसे वाचवता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये टास्क सुरू असताना जय म्हणताना दिसणार आहे, सोडायचं नाही डॉक्टर त्याला... त्यावर विकास जयला म्हणाला, तू संचालक आहेस ना ? मग संचालकाच काम कर... प्लेयरला सपोर्ट... त्याला पाठवतो मारायला... आणि दोघांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली.
बघूया हा टास्क सदस्य कसं खेळतील ? की रद्द करतील ? तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment