मुंबई/अहमदनगर, 18 डिसेंबर 2021
केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील लोणी, प्रवरा नगर येथे “सहकार आणि कृषी परिषदे”ला संबोधित केले.
केंद्रीय मंत्री शाह यांनी सहकार चळवळीचे प्रणेते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
केंद्रीय मंत्र्यांनी या प्रसंगी डॉ.विखे पाटील स्मारक रुग्णालयाचे ई-उद्घाटन केले आणि डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा गौरव पुरस्काराचे वितरण केले.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या कार्यक्रमात, हिवरे बाजार ग्राम पंचायतीचे सरपंच पोपटराव पवार तसेच देशी वाणांच्या संवर्धनासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या आणि बीजमाता म्हणून प्रसिध्द असलेल्या राहीबाई पोपेरे या पद्म पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला. शहा म्हणाले की या योग्य व्यक्तींचा सन्मान करण्याचे पद्म पुरस्कार वितरणाचे हे नवे युग सुरु आहे.
अमित शाह यांनी शिर्डी येथील साईबाबा मंदिराला देखील भेट दिली आणि देशात सुख आणि समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना केली.
M.Chopade/S.Chitnis/P.
No comments:
Post a Comment