Friday, 24 December 2021

स्टोरीटेल ओरिजनलची बालदोस्तांना नाताळ विशेष भेट! स्टोरीटेल ओरिजनलची 'मिशन मेमरी फेअरी' ऐका अभिनेत्री अनिता दाते यांच्या आवाजात!

 

सर्वांच्या लाडक्या राधिका सुभेदार उर्फ आघाडीच्या अभिनेत्री अनिता दाते यांच्या मखमली आवाजात 'मिशन मेमरी फेअरीया स्टोरीटेल ओरिजनलच्या ऑडिओ सिरीजमध्ये एकापेक्षा एक धम्माल गोष्टी बालदोस्तांना ऐकायला मिळणार आहेत. आर्या नाईक यांनी लिहिलेली 'मिशन मेमरी फेअरी ही दहा भागांची सिरीज बच्चेकंपनीसाठी खास नाताळ निमित्त विशेष भेट असून ‘मॅडी’, ‘सारा’, ड्रॅगो’ या बालदोस्तांच्या शौर्याची साहस कथा त्यासोबत ‘डेंजर विच’च्या कारवाया ‘स्टोरीटेल ओरिजनल’वर ऐकायला गंमत येणार आहे.

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायकोया मालिकेतून घराघरांत पोहोचलेले नाव म्हणजे अनिता दाते-केळकर. या मालिकेतील नागपुरी ठसक्याच्या 'राधिकाआंटीला पाहताना जशी मज्जा आली अगदी तशीच मज्जा 'मिशन मेमरी फेअरीअनितादीदीच्या आवाजात स्टोरीटेलवर ऐकताना येणार आहे. मुळची नाशिकची असलेल्या अनितादीदीचे शिक्षण नाशिकच्या सारडा कन्या विद्यामंदिरात झाले. त्यानंतर पुण्यातील ललित कला केंद्रामध्ये तिने नाट्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. 'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'दार उघडं ना गडे', 'अग्निहोत्र', 'मंथन', 'अनामिका''चला हवा येऊद्या', 'जोगवा', 'सनई चौघडे', 'जोर लागा के हय्या', 'अय्या', 'गंध', 'बालवीर', 'आजोबाअश्या भरपूर मालिका आणि सिनेमांमधून तिने आपले मनोरंजन केले आहे. स्टोरीटेलच्या 'मिशन मेमरी फेअरीया धम्माल सिरीज आवाज देऊन तिने हे नवीन वर्षाचे गिफ्ट सर्व बच्चेकंपनीला दिले आहे.

न सांगता घरातून बाहेर पडलेल्या आपल्या बाबालासारा आणि मॅडी सगळ्या ड्वार्फ टाऊनमध्ये शोधतात. पण तो सापडत नाही. हल्ली बाबा बर्‍याच गोष्टी विसरत असल्यामुळे ते खूप काळजीत असतात. पण त्याच वेळी बाबाला बरं करणारं एखादं औषध मिळेलअसंही सारा-मॅडीला वाटत असतं. बाबाची मेमरी लॉसफक्त मेमरी फेअरीच बरी करू शकते... हे समजल्यावर तिला शोधण्यासाठी सारा आणि मॅडी घरातून पळतात. कसेबसे ते दोघं मेमरी फेअरी रहात असणार्‍या डीपेस्ट डार्केस्ट फॉरेस्टमध्ये पोचतात. मेमरी फेअरीच्या गुहेचा रस्ताही त्यांना मिळतो पण तिथे पोचण्याआधी ते एका विचित्र ट्रॅपमध्ये अडकतात. त्या ट्रॅपमध्ये आता आपला जीव जाणार... असं सारा आणि मॅडीला वाटत असतानाच काहीतरी अनपेक्षित घडतं आणि एका नव्या मित्राच्या सोबतीनं पुन्हा एकदा त्यांचा मेमरी फेअरीपर्येंत पोहोचण्याचा प्रवास सुरू होतो...

बालदोस्तांसाठी अद्भुत आणि सुरस कथा लिहिणाऱ्या आर्या नाईक यांनी 'मिशन मेमरी फेअरीया दहा भागांच्या सिरीजचे लेखन स्टोरीटेल ओरिजनलसाठी केले आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी बच्चेकंपनीसाठी स्टोरीटेल ओरिजनलवर अनेक मजेदार तसेच साहसी कथा लिहिल्या आहेत. यामध्ये 'आरशातली जलपरी', 'राजपुत्र कि राक्षस', 'गुहेतली जादू', 'अर्धवटराव', 'न संपणारी रात्र', 'पिवळी धम्मक जादू', 'हरविलेली स्वप्न', 'अप अप अवे', 'सारा लॉसेस हर ड्रीम्सअश्या अनेक मराठी तसेच इंग्रजी सुरस कथांच्या सिरीज स्टोरीटेलवर मुलांच्या विशेष आवडीच्या ठरल्या आहेत.

'स्टोरीटेलवर ऐकताना 'धम्माल आणणारी ही अप्रतिमसिरीज ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून 'साहित्यश्रवणानंदघेता येईल.

स्टोरीटेलवर हे ऑडिओबुक ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/series/70965-Mission-Memory-Fairy-S01

No comments:

Post a Comment