बाबासाहेबांनी त्यांच्या वाढत्या काळात अनेक अडथळ्यांचा सामना केला, पण अशा सामाजिक अन्यायाविरोधात खंबीरपणे उभे राहिले. असाच एक सामाजिक अन्याय आहे बालमजूरी. त्या काळी असा समज होता की अधिक मुले असतील तर पैसे कमावण्यासाठी अधिक मदत होईल, ज्यामुळे अनेक मुलांचे जीवन धोक्यात आले होते. एण्ड टीव्हीवरील मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर'च्या आगामी एपिसोडमध्ये अशाच प्रकारची एक घटना तरूण भीमरावांना (अथर्व) सामना कराव्या लागलेल्या स्थितीला आणि त्याविरोधात त्यांनी दिलेल्या लढ्याला दाखवते.
रामजी सकपाळ (जगन्नाथ निवंगुणे) रोजच्या समस्या टाळण्यासाठी कुटुंबाची दोन गटात विभागणी करतात. ज्यामुळे भीमराव व रमाबाई (नारायणी महेश वर्णे) यांना दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यामध्ये संघर्ष करावा लागतो. यामुळे रमाची भांवडे छोटी व शंकर यांना कुटुंबामध्ये योगदान देण्यासाठी नोकरी करावी लागते. भीमरावांना हे समजल्यानंतर धक्का बसतो आणि ते त्यांना त्वरित काम थांबवायला सांगतात. यादरम्यान त्यांना समजते की, त्यांच्या चाळीमधील अनेक मुले त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला साह्य करण्यासाठी फटाक्याच्या कारखान्यामध्ये काम करत आहेत. याचा त्यांना खूप राग येतो आणि ते पालकांना समजावण्याचा प्रयत्न करतात की लहानांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिकले पाहिजे. पण नशीबात काही वेगळेच असते. शंकर त्याच कारखान्यामध्ये काम करण्यास सुरूवात करतो आणि जीवाला धोका निर्माण करणा-या घटनेचा सामना करतो. यामुळे भीमराव व रमाबाई यांना खूप त्रास होतो. ते बालमजूरी या दुष्ट प्रथेविरोधात उभे राहण्याचे ठरवतात आणि त्याविरोधात आवाज उठवतात.
तरूण भीमरावांची भूमिका साकारणारा अथर्व या एपिसोडबाबत म्हणाला, ''आगामी एपिसोड सामाजिक अन्यायाचा आणखी एक पैलू म्हणजेच बालमजूरीला दाखवतो. प्रतिकूल स्थितीमुळे शंकरला फटाक्यांच्या कारखान्यामध्ये काम करावे लागते आणि तो जीवाला धोका निर्माण करणा-या घटनेचा सामना करतो. ज्यामुळे भीमराव खूप अस्वस्थ होतात. ते या प्रकरणाचा शेवट करण्याचा ठरवतात आणि त्याविरोधात खंबीरपणे उभे राहतात. बाबासाहेब भारतातील मजुरांचे तारणहार होते आणि त्यांनी अनेक कल्याणकारी धोरणे आखली. महिला आणि बाल कामगार संरक्षण कायदा हा त्यापैकी एक आहे, जो बालमजूरीला प्रतिबंध करतो आणि इतर गोष्टींबरोबरच त्यांच्या कामाच्या स्वरूपाचे नियमन करतो.''
पहा 'एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!
No comments:
Post a Comment