Friday, 21 January 2022

कायद्यालाही झुकवणारं प्रेम - लॉ ऑफ लव्ह ट्रेलर झाला प्रदर्शित - The love that pacifies the Law… Trailer of the film “Law of Love” released

प्रेमरूपी महासागरात स्वछंदी वावरणारे प्रेमी नेहमीच आपल्याला दिसतात. पण या समाजात आजही असे काही लोकं आहेत जे प्रेम करणाऱ्यांच्या मध्ये "कायदेरूपी" कुंपण घालतात. वेदिका फिल्म क्रिएशन आणि जे. उदय निर्मित "लॉ ऑफ लव्ह" हा सिनेमा असेच काहीसे भाष्य करून जातो. येत्या ४ फेब्रुवारीला हा चित्रपट महाराष्ट्रात  प्रदर्शित होणार असून नुकताच सोशल मीडियाद्वारे याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 
स्मार्ट, डॅशिंग, दोस्तांमध्ये फेमस असा "आदित्य" त्याच्याचं कॉलेज मध्ये असलेल्या "साक्षी" च्या प्रेमात पडतो. साक्षीदेखील सुंदर, जास्त न बोलणारी पण तितकीच कणखर अशी मुलगी. सर्व काही सुरळीत चालू असताना त्या दोघांच्या आड वेगवेगळी संकटे येतात ज्यामुळे त्यांना विरह सहन करावा लागतो. पण अखेर त्यांच्या प्रेमाला समाज कबुली देईल का....? याचे उत्तर चित्रपटगृहात नक्की मिळेल. 
चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत निर्माते जे. उदय असून त्यांच्यासोबत शालवी शाह या अभिनेत्रीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका पार पाडली आहे. जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर, अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार आणि सचिन मस्के तसेच अभिनेत्री प्राची पालवे यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. लॉ ऑफ लव्ह सिनेमाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम असून सिनेमाची २ गाणी नुकतीच प्रदर्शित झाली आहेत. सदर गाण्यांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना सध्या दिसत आहे.
चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल निर्माते आणि अभिनेता जे. उदय सांगतात, "प्रेमाच्या महिन्याची सुरुवात प्रेमाच्या सिनेमाने होते ही  आमच्यासाठी महत्वाची बाब आहे. या चित्रपटामुळे तुमचा 'व्हॅलेंटाईन' नक्कीच छान होईल याची आम्हाला खात्री आहे."

We can always find engrossed lovers voyaging freely in the ocean of love. However, there are also people in society today, who establish a barrier in the form of “law” between the loving pair. The film “Law of Love” from Vedika Film Creation and produced by J. Uday aptly comments on these lines. The film was released in Maharashtra on the 4th February and the trailer of the film has been recently released through social media.
“Aditya”, who is a smart, dashing and famous face among friends falls in love with “Sakshi” from the same college. Sakshi is also a stunningly beautiful, slightly reserved but all the same a very powerfully willed girl. While everything is moving pleasantly, various obstacles cross the path of love for these two and they have to miss each other’s company. The question however, will the society accept their love will be surely answered in the theaters.
Producer J. Uday has played the lead role in the film accompanied by actress Shalvi Shah in the female lead. Senior actors such as Mohan Joshi, Yatin Karyekar, Anil Nagarkar, Ravi Kadam, Yogesh Pawar and Sachin Maske as well as actress Prachi Palwe, have also played important roles in the film. Music for the film has been set by Music director P. Shankaram and two of the songs from the film have been released recently. The songs are currently receiving a positive response from the audiences.
While speaking about the release of the trailer of the film, Producer J. Uday says, “It is important for us that the month of love is starting with a film on love. We are confident that you will be able to fully enjoy your own “Valentine” with this film.

No comments:

Post a Comment