Thursday, 2 June 2022

“ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी”च्या परिचयासह ज्युपिटर वॅगन्स लि.चे इव्ही सेगमेंटमध्ये पदार्पण


ग्रीनपाव्हर मोटर्स या यूएस-कॅनडा स्थित पब्लिसिटी लिस्टेड इव्ही कंपनीच्या सहयोगाने एलसीव्ही, एमसीव्ही आणि एससीव्ही श्रेणींमध्ये ३ ते २० टन रेंजमधला परिचय 

नॅशनल ०१ जून २०२२: पर्यावरण सुलभ परिवहनाची वाढती गरज लक्षात घेऊन ज्युपिटर वॅगन्स लि. (जेडब्ल्यूएल) या वॅगन्स, हाय स्पीड ब्रेक सिस्टिम आणि रेल्वे तसेच इंजिनिअरींग उपकरणांच्या निर्माता असलेल्या महत्वपूर्ण कंपनीने व्यावसायिक इव्ही वाहनांवर लक्ष केंद्रित करणा-या “ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी” (जेइएम)च्या परिचयासोबत इलेक्ट्रिक मोबिलिटी बाजारपेठेत पदार्पण केले आहे. ग्रीनपाव्हर मोटर कंपनी आयएनसी (“ग्रीनपाव्हर”)च्या संपूर्णपणे मालकीच्या असलेल्या इए ग्रीनपाव्हर प्रायव्हेट लिमिटेडसोबत कंपनीने जॉइंट व्हेंचर केले आहे. ग्रीनपाव्हर युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामधली पब्लिसिटी लिस्टेड संस्था आहे. हिचे प्रवासी परिवहन आणि फ्रेट ट्रान्सपोर्ट बाजारपेठांमध्ये इसीव्ही (इलेक्ट्रिक कमर्शिअल व्हेइकल्स)मध्ये प्राविण्य आहे. या जॉइंट व्हेंचरने ग्रीनपाव्हर मोटर्सचे भारतात आगमन होईल, भारतीय आणि इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले जाईल आणि पुढच्या दोन वर्षांमध्ये पॅसेंजर ट्रान्सिट आणि कार्गो बाजारपेठेत उत्पादनांचा परिचय करुन दिला जाईल. आपल्या उत्पादन केंद्राला चीनमधून स्थानांतरीत करुन भारतात आणण्याचा आणि त्यांच्या जागतिक स्तरावरील बाजारपेठांना तेथून निर्यात करण्याचा देखील कंपनीचा मानस आहे.

भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने या काही वर्षांमध्ये लक्षणीय बदल अनुभवले असून देशाच्या उत्पादन जीडीपीमध्ये त्याचे ४९% आणि एकूण जीडीपीमध्ये अंदाजे ७.१% योगदान आहे. आरबीएसए ऍडवाजर्स या सल्लागार संस्थेच्या अहवालाप्रमाणे, भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठ  २०२१ ते २०३०च्या दरम्यान ९० टक्के सीएजीआरच्या अपेक्षेसोबत महत्व मिळवताना आढळत आहे. भारतात एंड-टू-एंड उत्पादन घेण्यासाठी आणि महत्वपूर्ण बाजारपेठांमध्ये ग्राहकांना अडचणविरहित अनुभव देण्याच्या दृष्टिकोनामधून विक्री पश्चात आवश्यकतांपर्यंत विस्तारण करत सेवा सुविधा स्थापित करण्यासाठी जेइएम ग्रीनपाव्हर मोटरसोबत काम करेल.

या भागीदारीमुळे भारतीय बाजारपेठेत एलसीव्ही (लाइट कमर्शिअल व्हेइकल्स), एमसीव्ही (मॅन्युफॅक्चरींग कमर्शिअल व्हेइकल्स) आणि एससीव्ही (हेव्ही कमर्शिअल व्हेइकल्स) श्रेणींचे ३ ते २० टनांपर्यंत रोलिंग आउट पहायला मिळेल. लॉजिस्टिक्स व्यवसाय, इ-कॉमर्स कंपन्या, एमएमसीजीसोबत बी२बीवर कंपनीचे वितरण नेटवर्क लक्ष केंद्रित करेल. दुस-या बाजूला, दुय्यम बाजारपेठ रिटेल चॅनल्सचे बी२सी मार्केटच्या स्वरुपात परिक्षण करेल. पुढच्या तीन वर्षांमध्ये २०० करोड रुपयांची गुंतवणूक करण्याचा कार्पोरेशनचा मनसुबा आहे.

”ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडचा नेहमीच उत्पादन नवीनतमतेच्या व अत्याधुनिकतेच्या अग्रणी स्थानावर राहण्याचा तसेच ई-मोबिलिटी क्षेत्रातल्या गरजा समजून घेण्याचा उद्देश असतो. ’ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी’च्या परिचयासह आम्ही ऊर्जेच्या पारंपारिक स्त्रोतांवर अवलंबून राहणे कमी करुन व्यवसायांमध्ये खर्च कमी करत वाहनांच्या इलेक्ट्रिफिकेशनमध्ये मार्मिकपणे हातभार लावण्याची आमची मनिषा आहे. ग्रीनपाव्हर मोटर्ससोबत आम्ही केलेल्या जेव्हीमुळे, आम्ही दोन्ही संस्थांच्या तंत्रज्ञान संपदेला एक सुरात आणण्यासह इव्ही बाजारपेठांमध्ये सुरक्षा आणि दीर्घकालीनता आणण्याची अपेक्षा करत आहोत. ग्रीनपाव्हर इसीव्हीमुळे आम्हाला व्यवसायाच्या पूर्ण न झालेल्या ब-याच गरजा पूर्ण करण्याची संधी मिळेल.” असे ज्युपिटर वॅगन्स ग्रुपचे संचालक विवेक लोहिया म्हणाले.

ग्रीनपाव्हरचे अध्यक्ष ब्रेंडन रिले म्हणाले, ”भारतीय बाजारपेठेत ग्रीनपाव्हरची इव्ही स्टार कॅब आणि चेसिस आणण्यासाठी ग्रीनपाव्हरने ज्युपिटर वॅगन्स समुहासोबत जॉइंट व्हेंचर केले आहे. आम्हाला ज्युपिटरसोबत काम करण्याची प्रचंड उत्सुकता आहे, यामुळे ग्रीनपाव्हरच्या इव्ही स्टार सीसीच्या राइट-हँड ड्राइव्ह मॉडेलला सिध्द करता येईल आणि जेडब्ल्यूएलच्या वितरण चॅनल्सच्या मततीने ग्राहकांसमोर प्रदर्शन करता येईल. जॉइंट व्हेंचरमुळे दोन्ही समुह दृढ बनतील आणि आम्हाला बाजारपेठेतल्या सर्वोत्तम संधी ओळखता येतील.”

समुदायांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी एक दृष्टिकोन म्हणून अतिशय महत्वपूर्ण आहे. इव्हीची नियुक्ती व्यवसाय आणि समुदायांची वाटून घेतलेली जवाबदारी आहे. इव्ही भविष्य आहेत आणि इव्ही २W आणि ४W बाजारपेठेमध्ये अतिशय कमी काळात प्रसिध्दी मिळवत आहेत; भारतात लवकरच व्यावसायिक इव्हीदेखील परिवहनात अतिशय महत्वाची  भूमिका पार पाडताना दिसतील.

ज्युपिटर वॅगन्स ग्रुपबद्दल:

१०० मॅन-इयर्सपासून एकत्र केलेल्या ज्ञानासोबत विस्तृत निपुणतेने संपूर्ण मोबिलिटी समाधाने देणारी ज्युपिटर वॅगन्स ग्रुप ही एक उदयोन्मुख संस्था आहे.

लीडरशीपची समुहासाठी काही स्वप्ने आहेत: ज्युपिटर क्षेत्रातील सर्वोत्तम दर्जाच्या गुणवत्ता आणि तंत्रज्ञानासह सर्व समाधाने उपलब्ध करुन देणारे ज्युपिटर वन स्टॉप समाधान बनले पाहिजे. समुह: ज्युपिटर अधिकरण, सहयोग आणि तंत्रज्ञाच्या स्थानांतरणामार्फत तंत्रज्ञान स्त्रोत निर्माण करत राहण्यासाठी आपले अस्तित्व सातत्याने दृढ करेल आणि भविष्यात इंजिनिअरींग देणारी सर्वात जलद गतीने प्रगती करणारी संस्था बनण्यासाठी प्रयत्नशील राहिल.

समुह: ज्युपिटरच्या सातत्याने वाढणा-या ऑफरिंग्जमध्ये या विभागासाठी अनेक समाधाने उपलब्ध आहेत: फ्रेट सिस्टिम्स, नॅशनल रेल्वेचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि पॅसेंजर ट्रान्सपोर्ट, अर्बन मास मोबिलिटी सिस्टिम्स उदा. मेट्रो, रेल, सेमी हाय-स्पीड ट्रेन्स, मेट्रो लाइट, रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम्स इ., खाणकाम; बांधकाम; सुरक्षा; लिक्विड/बल्क/गॅस कमॉडिटी टॅंकर्स, फायर टेंडर्स ऍंब्युलेटरी सारख्या विशेष उद्देशांसाठी अवजड ऑटोमोबाईल वाहने आणि अशा खास उद्देशांसाठी असलेली सिव्हीक वाहने इ. समुह: ज्युपिटरकडे रेल्वे मंत्रालय, प्रायव्हेट वॅगन ऍग्रिगेटर्स, लिजिंग  ऍंड लॉजिस्टिक कंपन्या, सुरक्षा मंत्रालय, शिपिंग मंत्रालय, टाटा मोटर्स, वोल्वो इचर मोटर्स, भारत बेन्झ्म, एव्हिया मोटर्स, इ.सारखे क्लाएंट्स आहेत. समुह: ज्युपिटरच्या मालकीच्या उत्पादन सुविधा भारतभर आढळतात. त्या कोलकता, जमशेदपूर, इंदूरच्या समीप आहेत त्याचप्रमाणे जबलपूरमध्ये चार युनिट्स आहेत. समुहाचा एकत्रित महसूल आधीच १००० करोड रु.हून जास्त आहे.

समुह: ज्युपिटरची स्लोवाकियातील ए.एस, क्रेंझ रिपब्लिकचे डाको-सीझेड, स्पेनचे तालेरेस अल्गेरिआ, पोलंडचे फ्रेनोप्लास्ट एस.ए आणि फ्रान्सच्ता लाफ-सीआयएम समुहासारख्या युरोपातल्या अनेक महत्वाच्या कंपन्यांसोबत जागतिक दर्जाच्या यशस्वी भागीदा-या आहेत. ते नियमित तत्वावर उत्तर अमेरिकेला ट्रॅक उत्पादने निर्यात करतात, जी अमेरिकन रेलरोड्सच्या प्रमाणनासह चालते. समुहाने २० फुट हाय क्युब, ४० फुट, भारतीय रेल्वे दार्फ टाइप आणि रेफ्रिजरेटेड आणि इतर विशेषकृत कंटेनर्सचा आंतर्भाव करत सर्व श्रेणींमध्ये आयएसओ मानकांप्रमाणे सर्वसामान्य आणि विशेष प्रकारचे फ्रेट कंटेनर्स निर्माण करण्यावर आणि त्यांचा पुरवठा करण्यावर  नव्याने लक्ष प्रस्थापित केले आहे.

No comments:

Post a Comment