Tuesday 28 June 2022

Themis Medicares VIRALEX®

वायरालेक्स®विषयी टीप

सारांश: कोविड-१९ च्या चौथ्या लाटेबरोबरीनेच पावसाळा सुरु झाल्यामुळे श्वसनाशी संबंधित विषाणू संसर्गात देखील वाढ होत आहेसौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविडवरील तसेच श्वसनमार्गाला होणाऱ्या गंभीर विषाणू संसर्गावरील उपचारांसाठी वायरालेक्स® हे प्रभावी आणि सुरक्षित औषध आहे.

श्वसनमार्गाला होणारे गंभीर विषाणू संसर्ग हे सर्वाधिक वारंवार होणारे विषाणू संसर्ग असून वेगवेगळ्या इतर व्याधींना सर्वात जास्त कारणीभूत ठरणाऱ्या संसर्गांमध्ये देखील त्यांचा समावेश होतो.   पावसाळ्यामध्ये श्वसनसंबंधी विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढते. या काळात डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये देखील श्वसनमार्गाला विषाणू संसर्गाची तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त असते. भरीस भर म्हणजे कोविड १९ अजूनही आहेचौथ्या लाटेमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड १९ च्या केसेसमध्ये वाढ होत असून याची लक्षणे काहीवेळा श्वसनमार्गाला होणाऱ्या विषाणू संसर्गाप्रमाणे दिसून येत आहेत. म्हणूनच श्वसनमार्गाला विषाणू संसर्ग झाल्यास त्यावर तातडीने उपचार सुरु करणे खूप महत्त्वाचे आहे. काहीवेळा तपासणी अहवाल यायला देखील वेळ लागू शकतो. अशा रुग्णांसाठी वायरालेक्स® इनोसिन प्रॅनोबेक्स हे तोंडावाटे घेण्याचेप्रभावी आणि सर्वसामान्यतः सुरक्षित औषध आहे.

वायरालेक्स® - इनोसिन प्रॅनोबेक्स हा कोविड-१९ वरील उपचाराचा नवा पर्याय आहे.  नवे व्हेरियंट्स आले असले तरी हे औषध प्रभावी ठरते. वायरालेक्स®चा फायदा असा की हे औषध फक्त कोविड १९ वर नाही तर श्वसनमार्गाच्या इतर विषाणू संसर्गांवर देखील प्रभावी आहे. हे औषध सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे भारतात करण्यात आलेल्या डबल-ब्लाइंडरँडमाइज्ड प्लेसीबो कंट्रोल (क्लीनिकल संशोधनात याला गोल्ड स्टॅंडर्ड मानले जाते) मल्टीसेंटर ट्रायलमार्फत दाखवून देण्यात आले आहेया औषधाच्या क्लीनिकल प्रतिक्रियेचा व रोगमुक्त करण्याचा वेग जास्त असल्याचे यामध्ये दिसून आले.  कोविड १९ च्या डेल्टा लाटेच्या काळात या तपासण्या करण्यात आल्या होत्या आणि ज्या रुग्णांना वायरालेक्स® औषध दिले गेले त्यांची आजाराची लक्षणे लवकर आणि संपूर्णपणे दूर झाली.

इन्फल्युएंझा आणि कोविड १९म्युकोक्युटेनियस हर्प्सजेनिटल वॉर्ट आणि Subacute Sclerosing Panencephalitis (एसएसपीई) यासारख्या श्वसनाशी संबंधित इतर गंभीर विषाणू संसर्गावरील उपचारांसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डिसीजीआय) वायरालेक्स® - इनोसिन प्रॅनोबेक्सला मान्यता दिली आहे.

इनोसिन प्रॅनोबेक्स हे विषाणूविरोधी कृती करणारे इम्युनोमॉड्युलेटरी एजंट आहे आणि याची सुरक्षितता सिद्ध करण्यात आली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये विषाणू संसर्गांवरील उपचारांमध्ये याचा प्रभावी वापर केला जात आहे. भारतात थेमीस मेडिकेयर लिमिटेडने केलेल्या काटेकोर डबल-ब्लाइंड रँडमाइज्ड नियंत्रित क्लीनिकल चाचण्यांमधून हाती आलेल्या परिणामांनंतर हे औषध कोविड १९ वरील उपचारांसाठी वापरले जाऊ लागले आहे.

कोणत्याही विषाणू संसर्गाविरोधातील लढ्यामध्ये नॅचरल किलर (एनके) पेशी (नैसर्गिक विध्वंसक पेशी) ही शरीराच्या संरक्षणाची सर्वात पुढची व पहिली फळी असते. एनके पेशी विषाणूने संक्रमित पेशींना नष्ट करतात (सेल मेडिएटेड सायटोटॉक्सिसिटी) आणि शरीरामध्ये विषाणूचा प्रसार होण्याला प्रतिबंध घालतात. बर्मिंघम युनिव्हर्सिटी[1] आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी[2]मध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार इनोसिन प्रॅनोबेक्स एनके पेशींची मेडिएटेड सायटोटॉक्सिसिटी दोन प्रकारे मजबूत करते: (१) एनके पेशींची संख्या वाढवली जाते आणि (२) विषाणूने संक्रमित झालेल्या पेशींवर मेटॅबोलिक ऍक्टिव्हेशन आणि एनकेजी२डी (NKG2D) लिगंड एक्स्प्रेशन उत्प्रेरित केले जाते. अशाप्रकारे एनके पेशींकडून संक्रमित पेशी ओळखले जाणे सोपे केले जाते.

सौम्य ते मध्यम तीव्रतेच्या कोविड १९ आणि इतर विषाणू/श्वसनमार्गाच्या संसर्गावरील उपचारांमध्ये वायरालेक्स® त्याच्या इम्युनोमॉड्युलेटरी व विषाणूविरोधी गुणधर्मांसह काम करतेहे गुणधर्म शरीराची नैसर्गिक व ऍडाप्टिव रोग प्रतिकारशक्ती वाढवून विषाणू संसर्गाच्या विरोधात शरीराची संरक्षण क्षमता वाढवतात. रोग प्रतिकारशक्तीला अशाप्रकारे प्रोत्साहन मिळाल्यामुळे रुग्णाला आजाराच्या लक्षणांपासून लवकर बरे वाटते. अशाप्रकारे दुहेरी कृती घडून येत असल्याने हे औषध सहव्याधी असलेल्या व ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे अशा रुग्णांसाठी उपयुक्त ठरते.

वायरालेक्स® हे तोंडावाटे घेण्याचे औषध असून त्याच्या ५०० mg (एमजी) च्या टॅबलेट्स असतात.  नोंदणीकृत वैद्यकीय प्रॅक्टिशनरकडून रीतसर प्रिस्क्रिप्शन असेल तरच हे औषध मिळते.        

1 comment: