अनोख्या बायपास सर्जरीमुळे पाय वाचला आणि नवी मुंबईमध्ये वस्क्युलर केयरमध्ये नवा मापदंड स्थापित केला
7 सप्टेंबर, 2023: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईने रुग्णांच्या देखभालीत नवे गोल्ड स्टॅंडर्ड स्थापित करत गँगरीनच्या उपचारांमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती केल्याची आज घोषणा केली. ७७ वर्षीय श्री पांडुरंग पै यांना मधुमेह आहे, त्यांच्या पायामध्ये गँगरीनच्या गुंतागुंतीच्या केसवरील उपचार पायाच्या धमनीमध्ये लांब ब्लॉकेजसाठी बायपास सर्जरीचा उपयोग करून केले गेले. नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा गँगरीनच्या केसवरील उपचारांसाठी बायपास सर्जरी केली गेली. सर्जरी यशस्वी झाली आणि फक्त काही दिवसातच हे रुग्ण आपल्या पायांवर उभे राहू शकले, पुढील तीन महिन्यांत त्यांची जखम पूर्णपणे बरी झालेली असेल.
गँगरीन ही अतिशय गंभीर आणि जीवनात खूप समस्या निर्माण करणारी स्थिती आहे. आजच्या काळात मधुमेह, हायपरटेन्शन आणि धूम्रपान यासारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने गँगरीनच्या केसेस देखील सतत वाढत आहेत. हार्ट अटॅकमध्ये ज्याप्रकारे होते, तशाच प्रकारे गँगरीनमध्ये पायातील रक्तवाहिन्यांमध्ये बाधा निर्माण होऊ शकते आणि त्यावर उपचार न केले गेल्यास ऍम्प्युटेशन म्हणजे पाय किंवा पायाचा काही भाग काढून टाकावा लागू शकतो आणि पाय कायमचा गमवावा लागू शकतो. लॅन्सेन्ट डायबिटीस अँड एंडोक्रिनॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या सर्वात नवीन संशोधनानुसार, भारतात मधुमेही रुग्णांची संख्या वाढून १०१ मिलियन (२०१९ मध्ये ती ७० मिलियन होती - आयसीएमआर) झाली आहे. डायबिटीस मॅलेटसचे अनेक गंभीर दुष्परिणाम होतात, यामध्ये पायांच्या समस्यांचा देखील समावेश होतो. या समस्यांमुळे अनेक आर्थिक व आरोग्याशी संबंधित आव्हाने उभी राहतात. पण कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईचे कन्सल्टन्ट, वस्क्युलर आणि एंडोवस्क्युलर सर्जन डॉ पियुष जैन यांच्या नेतृत्वाखाली पूर्णकालीन तज्ञ सेवा उपलब्ध असणाऱ्या हॉस्पिटलच्या मेडिकल टीमच्या प्रयत्नांमुळे ७७ वर्षीय पांडुरंग यांचा पाय वाचवून त्यांचे आयुष्य यशस्वीपणे बदलवण्यात आले आहे. ही केस गँगरीनच्या इतर अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे.
डॉ पियुष जैन यांनी सांगितले, "एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पायाचे बोट कापले गेल्यानंतर हे रुग्ण आमच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये आले आणि तेव्हा त्यांच्या पायाच्या बोटापासून गुडघ्याच्या वरपर्यंत संसर्ग वेगाने वाढत होता. स्थितीचे गांभीर्य पाहता पाय वाचवण्यासाठी पायाचे दुसरे बोट कापावे लागले. आम्ही पायातील रक्ताभिसरणाची तपासणी करण्यासाठी एक एंजियोग्राम देखील केला. एंजियोग्राममधून समजले की पायाच्या धमनीमध्ये मोठे ब्लॉकेज आहे. ब्लॉकेज मोठे असल्यामुळे आम्ही ठरवले की, स्टेन्टपेक्षा बायपास सर्जरी अधिक व्यवहार्य आणि प्रभावी उपाय ठरेल. आम्ही गुडघ्याच्या खालील भागात बायपास केले. नवी मुंबईमध्ये ही अशाप्रकारची पहिलीच सर्जरी आहे."
ही मॅरेथॉन सर्जरी सहा तास सुरु होती. डॉ जैन आणि त्यांच्या टीमने ही गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी अतिशय काळजीपूर्वक काम केले. रुग्णाच्या तब्येतीत खूपच छान सुधारणा दिसून आली आणि फक्त २ ते ३ दिवसात पुन्हा चालू-फिरू लागण्यासाठी सक्षम बनले. सर्जरीनंतर काही आठवड्यात ते चालू-फिरू लागले होते आणि तीन महिन्यांमध्ये त्यांची जखम देखील पूर्णपणे बरी झालेली असेल.
डॉ जैन यांनी सांगितले, "गँगरीनवरील उपचार म्हणून या बायपास सर्जरीचे यश हे दाखवून देते की मधुमेही पायावरील उपचारांसाठी योग्य प्रोटोकॉलचे पालन केले गेले पाहिजे. सर्जरीनंतर रुग्णाला बरे होण्यात मदतीसाठी योग्य पादत्राणे घालण्याचा सल्ला देखील दिला गेला पाहिजे. सामान्यतः, हार्ट स्पेशलिस्ट्स किंवा रेडियोलॉजिस्ट्स या प्रक्रिया हाताळतात पण या प्रक्रियांचे सर्वात चांगले परिणाम दिसून यावेत यासाठी त्या आवश्यक नैपुण्ये आत्मसात असलेल्या प्रशिक्षित वस्क्युलर सर्जनकडून केल्या गेल्या पाहिजेत."
रुग्णाची मुलगी श्रीमती पूजा नायक यांनी हॉस्पिटल व डॉक्टरांचे आभार मानले, त्या म्हणाल्या, "माझ्या वडिलांच्या पायाच्या अंगठ्यामध्ये संसर्ग झाल्यानंतर आम्ही खूप आशेने कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये आलो होतो. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून केली जाणारी देखभाल आणि उपचार यांच्याविषयी आम्हाला खात्री होती. पाय कायमचा गमवावा लागेल अशी भीती ते त्यांना पुन्हा हिंडताना, फिरताना पाहणे...माझ्या वडिलांची रिकव्हरी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. डॉ जैन आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे आम्ही सदैव आभारी राहू."
No comments:
Post a Comment